Difference between revisions 1006448 and 1006524 on mrwiki

{{पानकाढा|कारण = विकिसाठी उल्लेखनीय मजकूर नाही}}
     गोष्टीची सुरुवात विषय: इतिहास घटक: १ इयता: ३ री.
 संयोजक: लक्ष्मण कुंडलिक वाठोरे  (अध्यापक)  विद्या मंदिर मालाईवाडा 
  ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर पिन -४१५१०१ .
    रात्रीचे आकाश चांदन्यांमुळे किती छान दिसते. चंद्रामुळे त्याची 
शोभा आणखी वाढते.आपल्याला दिसतो त्यापेक्षा चंद्र खूप मोठा आहे 
आणि खूप खूप दूर आहे .एकदा काय झाले, अंतराल्यानातून दोन माणसे 
चंद्रावर गेली. त्यांना चंद्रावरून दूरवर निळसर रंगाचा एक गोल दिसला .
तो  निळसर गोल म्हणजे आपली पृथ्वी.आपण पृथ्वीवर राहतो. पृथ्वीवर
 झाडे ,प्राणी ,पक्षी आणि माणसे आहेत .त्यांना सजीव म्हणतात .
पृथ्वीवर सर्व सजीव काही एकदम निर्माण झाले नाहीत .
   पहिले सजीव पाण्यात निर्माण झाले ,आपल्याला डोळ्यांना न 
दिसण्याइतके ते लहान होते .त्यांना हात ,पाय ,डोळे असे अवयव नव्हते .
खूप वर्षांनी पाण्यात तसेच जमिनीवर राहू शकणारे प्राणी निर्माण झाले .
बेडूक हा त्यांपैकीच एक प्राणी होय .पुढे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी ,पक्षी 
,आणि वनस्पती निर्माण झाल्या .काही प्राणी तर हत्तीपेक्षाही भलेमोठे होते ,
पण हळू हळू ते नष्ट झाले जमिनीखाली खोलवर त्यांच्या हाडांचे सांगाडे सापडले आहेत .
   त्यानंतर हजारो वर्षाचा काळ उलटला .माकडासारखा एक प्राणी निर्माण झाला .
त्याला शेपूट मात्र नव्हते .माकडापेक्षा त्याचे डोके मोठे होते .पाठीत बाक होता .
तो दोन पायावर चालायचा .त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते .त्यांच्या अंगावर 
खूप केस होते .त्याच्या भुवया जाड होत्या .नाक बसके होते .जबडा रुंद होता .
वर्षामागून वर्ष गेली त्यांच्या शरीराची ठेवण हळूहळू बदलत गेली . तो ताठपणे
 चालू लागला .आजच्या माणसासारखा दिसू लागला .माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे .
पण इतर प्राण्यापेक्षा तो वेगळा आहे .माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे .
सर्व प्राण्यांपेक्षा त्याचा मेंदू मोठा असतो .
    इतर प्राणी चार पायांवर चालतात .माणूस मात्र दोन पायांवर चालतो .
त्यामुळे त्याचे दोन हात मोकळे राहतात .माणसांच्या हाताचा अंगठा सहज हालू शकतो .
तो उरलेल्या बोटांच्या समोर येऊ शकतो ,म्हणून इतर प्राण्यांपेक्षा माणसाला वस्तू 
सहजपणे पकडता येतात .नवनव्या वस्तू तयार करता येतात .
    माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी असला .तरी तो सर्वापेक्षा 
बलवान मात्र नाही .हत्ती किंवा वाघ यांच्या इतकी शक्ती 
माणसाच्या अंगात नसते .घोडा किंवा हरणं इतक्या वेगाने 
माणसाला पाळता येत नाही.पक्षांप्रमाणे हवेत उडता येत नाही ,
पण बुद्धीच्या आणि प्रयत्नांच्या जोरावर हे सर्व करण्याची युक्ती 
त्याने केली .हत्यारे,अवजारे,यंत्रे अशा गोष्टी माणसाने तयार 
केल्या .त्याने वेगाने धावणारी वाहने तयार केली .माणसाला पंख 
नसले ,तरी विमानात बसून तो आकाशात उडू शकतो .
   माणूस इतर प्राण्यांपेक्षा आणखी एका बाबतीत वेगळा आहे ,
तो पृथ्वीवर कोठेही राहू शकतो .थंड प्रदेशात तो लोकरीचे किंवा 
कातड्याचे कपडे घालतो,तर उष्ण प्रदेशात सुती कपडे घालतो .
नद्यांचे पाणी अडवून धरणे बांधतो .डोंगर फोडून रस्ते काढतो .
घरे बांधतो .
   माणूस अनुभवांतून शिकत राहतो .भाषेचा वापर करून तो 
आपले अनुभव इतरांना सांगतो.आपले विचार मांडतो .भावना 
व्यक्त करतो.आपल्याला मिळालेले ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत 
पोचवतो .
 अशा माणसाची गोष्ट आपण शिकणार आहोत.माणसाची 
गोष्ट म्हणजे कोण्या एकाच माणसाची गोष्ट नाही .ती सर्व स्त्री -
पुरुषांची आणि मुलामुलींची गोष्ट आहे.म्हणजेच ती सगळ्या 
मानवजातीची खरी गोष्ट आहे.अशा खऱ्याखुऱ्या गोष्टीला 
माणसाचा इतिहास म्हणतात.

उपक्रम:-वेगाने धावणारी कोणकोणती वाहने माणसाने तयार केली ? या वाहनांच्या 
चित्रांचा संग्रह तयार करा.