Difference between revisions 1006611 and 1006796 on mrwiki

{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = अ‍ॅन फ्रॅंक
| चित्र = Anne Frank.jpg
| चित्र_रूदी = 200px
| चित्र_शीर्षक = मे, इ.स. १९४२मधील अ‍ॅन फ्रॅंक
| जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रॅंक (Annelies Marie Frank)
| जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}}
| जन्म_स्थान = फ्रॅंकफर्ट आम माइन, [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]]
(contracted; show full) ज्यूविरोधी मोर्चे लगेचच चालू झाले. यामुळे आपण जर्मनीतच राहिलो तर आपले काय होईल याची भिती फ्रॅंक कुटुंबाला वाटू लागली.  नंतर त्याच वर्षी एडिथ मुलींना घेऊन एडिथची आई रोझा हॉलंडर हिच्याकडे [[आखेन]] येथे राहण्यास गेली. ऑटो फ्रॅंक फ्रॅंकफर्टमध्येच राहिले. नंतर त्यांना अ‍ॅम्स्टरडॅममध्ये आपली कंपनी काढण्याचा एक प्रस्त्वाव मिळाला. त्यामुळे व्यवसायाची घडी नीट बसविण्यासाठी व कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी ते अ‍ॅम्स्टरडॅमला गेले. इ.स. १९३३ ते इ.स. १९३९च्या काळात सुमारे ३ लाख लोक जर्मनी सोडून निघून गेले.


ऑटो फ्रॅंक यांनी ''ओपेट्का वर्क्स'' काम सुरू केले. त्यांची कंपनी पेक्टिन नावाचा फळांचा अर्क विकत असे. त्यांनी अ‍ॅम्स्टरडॅममधील ''मेरवेडेप्लेइन'' (मेरवेडे चौक) येथे घर घेतले. इ.स. १९३४ च्या फेब्रुवारी महिन्यात मुली व एडिथ अ‍ॅम्स्टरडॅमला आले. त्यांनी मरगॉटला सार्वजनिक शाळेत दाखल केले आणि अ‍ॅनला मॉंटेसरी शाळेत घातले. मरगॉटला गणितात रस होता तर अ‍ॅनला लेखन आणि वाचनात. त्या काळातील अ‍ॅनची मैत्रीण हन्नेली गोस्लर अ‍ॅनबद्दल सांगते की, अ‍ॅन नेहमी काहीतरी लिहित असे मात्र ते हाताने लपवून ठेवत असे व त्याबद्दल बोलत नसे. त्या दोघी बहिणी एकमेकांपासून खूप वेगळ्या होत्या. मरगॉट सुसंकृत, अबोल आणि अभ्यासू होती तर अ‍ॅन स्पष्टवक्ती, उत्साही आणि बहिर्मुख होती.

इ.स. १९३८ मध्ये फ्रॅंकने पेक्टाकॉन नावाची दुसरी कंपनी सुरू केली. ही कंपनी औषधी वनस्पती, पिकलिंग साल्ट{{मराठी शब्द सुचवा}} आणि मसाल्याच्या पदार्थांची घाउक विक्री करत असे. मसाल्याच्या पदार्थांचा जाणकार म्हणून ऑटोने [[हर्मन वान पेल्स]] याला कंपनीत नौकरी दिली होती. तोसुद्धा जन्माने ज्यू होता व जर्मनीतील [[ओस्नाब्रुक]] येथून आपल्या कुटुंबासोबत पळून आला होता. इ.स. १९३९ मध्ये एडिथची आईपण त्यांच्यासोबत राहायला आली व जानेवारी, इ.स. १९४२मधील तिच्या मृत्यूपर्यंत ती तिथेच होती.

मे, इ.स. १९४०मध्ये जर्मनीने नेदरलॅंड्सवर हल्ला केला व नेदलॅंड्स पादांकृत केले. नवीन सरकारने अनेक भेदभावपूर्ण कायदे लागू करून ज्यूंचे छळ करणे चालू केले. त्यांना ज्यू म्हणून नावनोंदणी करणे बंधनकारक केले तसेच ज्यूंचे वांशिक विभक्तीकरण<ref group="श">[[वांशिक विभक्तीकरण]] - इंग्लिश: Racial segregation (रेशियल सेग्रीगेशन) - वंशानुसार लोकांचे विभाजन करणे.</ref> केले. फ्रॅंक बहिणींची शाळेत प्रगती होत होती, त्यांचे अनेक मित्र-मैत्रिणी बनले होते. मात्र ज्यू मुलांना केवळ ज्यू शाळेतच घातले पाहिजे, या शासनाच्या हुकुमनाम्यामुळे त्यांना त्यांना शाळेतून काढून ज्यूधर्मीय लायसियम (शाळा) मध्ये दाखल केले गेले. तिथे अ‍ॅन व [[जॅकलीन वान मार्सेन]]सोबत मैत्री झाली. एप्रिल, इ.स. १९४१मध्ये पेक्टाकॉन कंपनी एक ज्यू-कंपनी म्हणून जप्त केली जाऊ नये म्हणून ऑटोने पावले उचलली. त्यांनी त्यांचा पेक्टाकॉनमधील वाटा त्यांचा मित्र [[जोहान्स क्लिमन]] याच्या नावावर हलवला आणि संचालकाच्या पदाचा राजीनामा दिला. काही काळानंतर कंपनी रद्द करून कंपनीची सर्व मालमत्ता [[जान गाइस]] याच्या ''गाइस आणि कंपनी'' मध्ये हलवली. डिसेंबर, इ.स. १९४१मध्ये ऑटो यांनी ऑप्टेका वाचविण्यासाठीपण हेच केले. यामुळे त्या दोन्ही कंपन्याचे काम चालू राहिले व ऑटो फ्रॅंक यांना थोडेसेच पण परिवार चालविण्यासाठी पुरेसे पैसे मिळत गेले.

== तळटीपा ==
{{संदर्भयादी|group="टीप"}} 

== पारिभाषिक शब्दसूची ==
{{संदर्भयादी|group="श"}}

[[वर्ग:होलोकॉस्ट]]
[[वर्ग:ज्यू व्यक्ती]]

[[af:Anne Frank]]
[[am:አና ፍራንክ]]
[[ar:آنا فرانك]]
[[arz:انا فرانك]]
[[be:Ганна Франк]]
[[be-x-old:Ганна Франк]]
[[bg:Ане Франк]]
[[bn:অ্যানা ফ্র্যাংক]]
[[br:Anne Frank]]
[[bs:Anne Frank]]
[[ca:Anna Frank]]
[[cs:Anna Franková]]
[[cy:Anne Frank]]
[[da:Anne Frank]]
[[de:Anne Frank]]
[[el:Άννα Φρανκ]]
[[en:Anne Frank]]
[[eo:Anne Frank]]
[[es:Ana Frank]]
[[et:Anne Frank]]
[[eu:Anne Frank]]
[[fa:آنه فرانک]]
[[fi:Anne Frank]]
[[fo:Anne Frank]]
[[fr:Anne Frank]]
[[fy:Anne Frank]]
[[ga:Anne Frank]]
[[gl:Anne Frank]]
[[he:אנה פרנק]]
[[hr:Anne Frank]]
[[hu:Anne Frank]]
[[id:Anne Frank]]
[[is:Anna Frank]]
[[it:Anna Frank]]
[[ja:アンネ・フランク]]
[[jv:Anne Frank]]
[[ka:ანა ფრანკი]]
[[ko:안네 프랑크]]
[[la:Anna Frank]]
[[lb:Anne Frank]]
[[lmo:Anna Frank]]
[[lt:Ana Frank]]
[[lv:Anna Franka]]
[[mg:Anne Frank]]
[[mk:Ана Франк]]
[[ml:ആൻ ഫ്രാങ്ക്]]
[[mn:Аннэ Франк]]
[[nl:Anne Frank]]
[[nn:Anne Frank]]
[[no:Anne Frank]]
[[pap:Anne Frank]]
[[pl:Anne Frank]]
[[pt:Anne Frank]]
[[ro:Anne Frank]]
[[ru:Франк, Анна]]
[[sh:Anne Frank]]
[[simple:Anne Frank]]
[[sk:Anna Franková]]
[[sl:Ana Frank]]
[[so:Anne Frank]]
[[sq:Anne Frank]]
[[sr:Ана Франк]]
[[sv:Anne Frank]]
[[ta:ஆன் பிராங்க்]]
[[th:อันเนอ ฟรังค์]]
[[tl:Anne Frank]]
[[tr:Anne Frank]]
[[uk:Анна Франк]]
[[vec:Ana Frank]]
[[vi:Anne Frank]]
[[wa:Anne Frank]]
[[war:Anne Frank]]
[[zh:安妮·弗蘭克]]