Difference between revisions 1007464 and 1007524 on mrwiki

{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = अ‍ॅन फ्रॅंक
| चित्र = Anne Frank.jpg
| चित्र_रूदी = 200px
| चित्र_शीर्षक = मे, इ.स. १९४२मधील अ‍ॅन फ्रॅंक
| जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रॅंक (Annelies Marie Frank)
| जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}}
| जन्म_स्थान = फ्रॅंकफर्ट आम माइन, [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]]
(contracted; show full)291}} --> मेइप गेइस व बेप वोस्कुइजची उलटतपासणी घेण्यात आली व त्यांना धमकावले गेले मात्र त्यांना अटक झाली नाही. दुसऱ्या दिवशी ते ''अ‍ॅख्टरह्युइस''वर परत आले. तिथे त्यांना अ‍ॅनची दैनंदिनी सापडली, तसेच त्यांनी काही छायाचित्रे गोळा केले. अ‍ॅन परत आल्यावर आपण ते तिला परत करू असा निर्धार मेइपने केला. ७ ऑगस्ट, इ.स. १९४४ रोजी ती परत कार्ल सिल्बरबाउरला जाऊन भेटली व त्याला पैसे देऊन कैद्यांना सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्याला नकार दिला. <!--{{sfn|Müller|1999|p=279}} -->


== छळछावणीत रवानगी व मृत्यू ==

३ सप्टेंबर, इ.स. १९४४ रोजी त्यांना वेस्टरबॉर्कवरून [[आउश्वित्झ छळछावणी]]त पाटविण्यात आले. वेस्टरबॉर्कवरून आउश्वित्झला गेलेला तो शेवटचा गट होता. तीन दिवसांच्या प्रवासानंतर ते आउश्वित्झला पोहोचले. त्याच्या रेल्वेत मरगॉट व अ‍ॅनचा अ‍ॅम्स्टरडॅमच्या ज्यूइश लाएसियममधील मित्र ब्लोइम एव्हर्स-एम्देन हापण होता. <!--{{sfn|Morine|2007}} --> ब्लोइमला ते अनेकदा आउश्वित्झमध्ये दिसत <!-- {{sfn|Bigsby|2006|p=235}} --> आणि त्याच्या एडिथ, मरगॉट व अ‍ॅनबद्दलच्या आठवणी इ.स. १९८८मधील माहितीपट "अ‍ॅन फ्रॅंकचे शेवटचे सात महिने" ({{lang-en|The Last Seven Months of Anne Frank}} दिग्दर्शक : विली लिंडवर) व इ.स. १९९५मधील बी.बी.सी. माहितीपट "आठवणीतील अ‍ॅन फ्रॅंक" ({{lang-en|Anne Frank Remembered}}) यात चित्रित केल्या गेल्या आहेत. <!--{{sfn|Enzer|Solotaroff-Enzer|1999|p=176}} {{sfn|Laeredt|1995}} -->

आउश्वित्झ लोकांना रेल्वेतून काढून त्यातील पुरुषांना स्त्रियांपासून व मुलांपासून बळजबरीने वेगळे केले गेले. ऑटो फ्रॅंकला त्याच्या कुटुंबापासून हिसकावून दूर केले गेले. रेल्वेतील १,०१९ प्रवाशांपैकी ५४९ प्रवाशांना तडक विषारी वायूच्या कोठडीत पाठवून मारण्यात आले. त्यामध्ये १५ वर्षापेक्षा लहान असलेल्या सर्व मुलांचा समावेश होता. अ‍ॅनने तीन महिन्यांपूर्वीच १५ वर्षे पूर्ण केले असल्याने ती यातून वाचली. वाचलेल्या लोकांत ती सर्वात तरूण होती. तिला नंतर याबद्दल कत्तलीबद्दल कळाले, पण शेवटपर्यंत ''अ‍ॅख्टरह्युइस''मधले सर्वजण या कतलीतून वाचले होते हे तिला माहित नव्हते. तिचे वडील पन्नाशीच्या वरचे होते व शारिरिकदृष्ट्या तितके बळकट नव्हते, त्यामुळे त्यांना बहुदा मारले असावे असा तिने निष्कर्ष काढला. <!-- {{sfn|Müller|1999|pp=246–247}} -->

== पारिभाषिक शब्दसूची ==
{{संदर्भयादी|2|group="श"}}

== तळटीपा ==
{{संदर्भयादी|group="टीप"}} 

== नोंदी ==
{{संदर्भयादी}}
(contracted; show full)[[tl:Anne Frank]]
[[tr:Anne Frank]]
[[uk:Анна Франк]]
[[vec:Ana Frank]]
[[vi:Anne Frank]]
[[wa:Anne Frank]]
[[war:Anne Frank]]
[[zh:安妮·弗蘭克]]