Difference between revisions 1007530 and 1007985 on mrwiki{{माहितीचौकट साहित्यिक | नाव = अॅन फ्रॅंक | चित्र = Anne Frank.jpg | चित्र_रूदी = 200px | चित्र_शीर्षक = मे, इ.स. १९४२मधील अॅन फ्रॅंक | जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रॅंक (Annelies Marie Frank) | जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}} | जन्म_स्थान = फ्रॅंकफर्ट आम माइन, [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]] (contracted; show full) == छळछावणीत रवानगी व मृत्यू == ३ सप्टेंबर, इ.स. १९४४ रोजी त्यांना वेस्टरबॉर्कवरून [[आउश्वित्झ छळछावणी]]त पाटविण्यात आले. वेस्टरबॉर्कवरून आउश्वित्झला गेलेला तो शेवटचा गट होता. तीन दिवसांच्या प्रवासानंतर ते आउश्वित्झला पोहोचले. त्याच्या रेल्वेत मरगॉट व अॅनच ाी अॅम्स्टरडॅमच्या ज्यूइश लाएसियममधील मिैत्र िण [[ब्लोइम एव्हर्स-एम्देन]] हाीपण होताी. <!--{{sfn|Morine|2007}} --> ब्लोइमला ते अनेकदा आउश्वित्झमध्ये दिसत <!-- {{sfn|Bigsby|2006|p=235}} --> आणि त्यािच्या एडिथ, मरगॉट व अॅनबद्दलच्या आठवणी इ.स. १९८८मधील माहितीपट "अॅन फ्रॅंकचे शेवटचे सात महिने" ({{lang-en|The Last Seven Months of Anne Frank}} दिग्दर्शक : विली लिंडवर) व इ.स. १९९५मधील बी.बी.सी. माहितीपट "आठवणीतील अॅन फ्रॅंक" ({{lang-en|Anne Frank Remembered}}) यात चित्रित केल्या गेल्या आहेत. <!--{{sfn|Enzer|Solotaroff-Enzer|1999|p=176}} {{sfn|Laeredt|1995}} --> आउश्वित्झ लोकांना रेल्वेतून काढून त्यातील पुरुषांना स्त्रियांपासून व मुलांपासून बळजबरीने वेगळे केले गेले. ऑटो फ्रॅंकला त्याच्या कुटुंबापासून हिसकावून दूर केले गेले. रेल्वेतील १,०१९ प्रवाशांपैकी ५४९ प्रवाशांना तडक विषारी वायूच्या कोठडीत पाठवून मारण्यात आले. त्यामध्ये १५ वर्षापेक्षा लहान असलेल्या सर्व मुलांचा समावेश होता. अॅनने तीन महिन्यांपूर्वीच १५ वर्षे पूर्ण केले असल्याने ती यातून वाचली. वाचलेल्या लोकांत ती सर्वात तरूण होती. तिला नंतर याबद्दल कत्तलीबद्दल कळाले, पण शेवटपर्यंत ''अॅख्टरह्युइस''मधले सर्वजण या कतलीतून वाचले होते हे तिला माहित नव्हते. तिचे वडील पन्नाशीच्या वरचे होते व शारिरिकदृष्ट्या तितके बळकट नव्हते, त्यामुळे त्यांना बहुदा मारले असावे असा तिने निष्कर्ष काढला. <!-- {{sfn|Müller|1999|pp=246–247}} --> वाचलेल्या इतर स्त्रियांसोबत तिलापण नग्न करून निर्जंतुक<ref group="श">निर्जंतुकिकरण - ({{lang-en|disinfection}} - डिसइंफेक्शन)</ref> करण्यात आले. तिचे सर्व केस कापण्यात आले व तिच्या हातावर तिचा ओळखक्रमांक<ref group="श">ओळखक्रमांक - ({{lang-en|identification number}} - आयडेंटिफिकेशन नंबर)</ref> गोंदवण्यात<ref group="श">गोंदवणे - ({{lang-en|to tattoo}} - टु टॅटू)</ref> आला. दिवसा स्त्रियांकडून गुलामगिरी करून घेतली जात असे. अॅनला दगड एकिकडून दुसरीकडे वाहून न्यावे लागत, किंवा हिरवळीचे गठ्ठे करावे लागत. रात्री त्यांना दाटीवाटीने बराकींमध्ये झोपावे लागे. काही प्रत्यक्षदर्शींना अॅन अलिप्त व दुःखी दिसली, तर इतरांना ती धैर्यशील बनली होती असे वाटले. तिच्या लाघवी व आत्मविश्वासपूर्ण स्वभावामुळे तिला अनेकदा राशनामध्ये तिच्यासाठी व तिच्या आई-बहिणीसाठी जादा ब्रेड मिळत असे. छावणीत अनेक रोग पसरत आणि काही काळातच अॅनच्या त्वचेवर खरूज<ref group="श">खरूज - ({{lang-en|scabies}} - स्केबीज) - पुरळे येणे</ref> उगवले. त्यामुळे फ्रॅंक बहिणींना छावणीतल्या रुग्णालयात टाकण्यात आले. मात्र रुग्णालय नेहमी अंधारे व उंदरांनी भरलेले होते. इकडे एडिथने खाणे बंद केले व तिच्या हिश्श्याचे ब्रेड ती अॅन व मरगॉटला रुग्णालयाच्या भिंतीखालील छिद्रातून देऊ लागली.<!-- {{sfn|Müller|1999|pp=248–251}} --> [[File:Anne frank memorial bergen belsen.jpg|thumb|alt=A Memorial for Margot and Anne Frank shows a Star of David and the full names and birthdates and year of death of each of the sisters, in white lettering on a large black stone. The stone sits alone in a grassy field, and the ground beneath the stone is covered with floral tributes and photographs of Anne Frank|मरगॉट व अॅनचे [[बर्गन-बेलसन छळछावणी]]च्या जागेवरील स्मारक. सोबत अॅनची छायाचित्रे.]] ऑक्टोबर, इ.स. १९४४ मध्ये एडिथ, अॅन व मरगॉटला [[उप्पर सिलेसिआ|उप्पर सिलेसिआतील]] लिबौ अर्बैत्सलेगर({{lang-de|Arbeitslager}}) श्रमछावणीत<ref group="श">श्रमछावणी - ({{lang-en|labor camp}} - लेबर कॅम्प)</ref> पाठविण्यात येणार होते. मात्र अॅनच्या अंगावर खरूज झालेले असल्यामुळे तिचे तिकडे जाणे रद्द केले गेले. एडिथ व मरगॉट यांनीसुद्धा अॅनसोबतच राहणे स्विकारले. ब्लोइम मात्र त्यांच्याशिवाय तिकडे गेली. <!--{{sfn|Laeredt|1995}} --> २८ ऑक्टोबरला [[बर्गन-बेलसन छळछावणी]]त नेण्यासाठी बायकांची निवड चालू केली गेली. आठ हजाराहून अधिक स्त्रियांना तिकडे पाठवले गेले. त्यात अॅन, मरगॉट व ऑगस्टे व्हान पेल्सचा समावेश होता. पण एडिथला मागेच ठेवण्यात आले आणि जानेवारी, इ.स. १९४५मध्ये ती उपासमारीने मरण पावली. <!-- {{sfn|Müller|1999|p=252}} --> तिकडे बर्गन-बेलसन छळछावणीत येणाऱ्या कैद्यांना सामावण्यासाठी तंबू ठोकण्यात आले होते. कैद्यांची गर्दी वाढल्यामुळे तिथे रोगराईने मरण पावणाऱ्यांची संख्या वेगाने वाढू लागली. अॅनची तिथे तिच्या दोन जुन्या मैत्रिणी, [[हनेली गोस्लर]] व [[नानेट ब्लित्झ]] यांच्याशी ओझरती भेट घडली. त्यांना छावणीच्या दुसऱ्या भागात ठेवले होते. त्या दोघीही छावणीतून जिवंत परतल्या. छावणीच्या कुंपणापलिकडून अॅनशी झालेले थोडेसे बोलणे त्यांनी नोंदवून ठेवले आहे. अॅन खूप कृश झाल्याचे व थरथरत असल्याचे ब्लित्झला जाणवले. गोस्लरने नोंदवले आहे की, तेव्हा ऑगस्टे अॅन व मरगॉटसोबत होती आणि गंभीररित्या आजारी असलेल्या मरगॉटची ऑगस्टे काळजी घेत होती. मरगॉट बिछान्याबाहेरही पडू शकत नसल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष दिसली नव्हती. अॅनने त्या दोघींना सांगितले की, तिच्या मते तिचे दोन्ही पालक बहुदा मरण पावले आहेत व त्यामुळे तिला आता जगण्याची इच्छा राहिली नाही आहे. गोस्लरच्या मते इ.स. १९४५च्या जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला ही भेट झाली असावी. <!-- {{sfn|Müller|1999|p=255}} --> मार्च, इ.स. १९४५मध्ये छावणीत प्रलापक ज्वराची साथ पसरली व त्यात सुमारे १७,००० कैद्यांचा मृत्यू झाला. <!-- {{sfn|Müller|1999|p=261}} --> प्रत्यक्षदर्शींच्या मते आजारात मरगॉट तिच्या बिछान्यावरून खाली पडली व त्या धक्काने तिचा मृत्यू झाला. काही दिवसांनंतर अॅनही साथीत मरण पावली. तिच्या मृत्यूची नेमकी तारीख कळू शकली नाही आहे मात्र यानंतर काही अठवड्यातच, १५ एप्रिल, इ.स. १९४५ला ब्रिटिश सेना छावणीपर्यंत पोहोचली व त्यांनी कैद्यांना मुक्त केले.<!--{{sfn|Stichting, "Typhus"|p=5}} --> साथीचा प्रसार रोखण्यासाठी छळछावणीच्या मुक्तीनंतर छावणीला पेटवून देण्यात आले. अॅन व मरगॉटला ज्या सामुहिक कबरींमध्ये<ref group="श">सामुहिक कबर - ({{lang-en|mass grave}} - मास ग्रेव्ह)</ref> पुरण्यात आले होते, ती जागाही अद्याप अज्ञातच राहिली आहे.<!-- {{sfn|US Holocaust Memorial Museum}} --> ऑटो फ्रॅंक आउश्वित्झच्या कैदेतून बचावले. अॅम्स्टरडॅमला परल्यावर जान व मेइप गेइसने त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले. त्यांनी आपल्या परिवाराला हुडकण्याचा प्रयत्न चालू केला. त्यांना कळाले की त्यांची पत्नी, एडिथ, आउश्वित्झमध्येच मरण पावली आहे. पण त्यांना मनोमन वाटत होते की, त्यांच्या मुली वाचल्या असाव्यात. पण काही अठवड्यांनंतर त्यांना कळाले की, अॅन व मरगॉटही बर्गन-बेलसन छावणीत मरण पावल्या आहेत. अॅनच्या मैत्रिणींबद्दल माहिती काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना कळाले की, तिच्या अनेक मैत्रिणींनाही मारून टाकण्यात आले आहे. [[सुझान लेडरमन|सुझान ''सान्ने'' लेडरमन]], जिचा अॅनच्या दैनंदिनीत अनेकदा उल्लेख होता, तिला, तिच्या आई-वडिलांसोबत विषारी वायूच्या कोठडीत मारण्यात आले होते. तिची मोठी बहीण, बार्बरा, जी मरगॉटची जवळची मैत्रीण होती, मात्र यातून वाचली होती. <!-- {{sfn|Lee|2000|pp=211–212}} --> इ.स. १९३०च्या दशकातच जर्मनी सोडून इंग्लंड, स्वित्झरलॅंड व अमेरिकेला गेलेल्या अॅन व मरगॉटच्या काही मैत्रिणी तसेच ऑटो व एडिथची माहेरची लोकं मात्र यातून बचावले.⏎ ⏎ == पारिभाषिक शब्दसूची == {{संदर्भयादी|2|group="श"}} == तळटीपा == {{संदर्भयादी|group="टीप"}} == नोंदी == {{संदर्भयादी}} (contracted; show full)[[tl:Anne Frank]] [[tr:Anne Frank]] [[uk:Анна Франк]] [[vec:Ana Frank]] [[vi:Anne Frank]] [[wa:Anne Frank]] [[war:Anne Frank]] [[zh:安妮·弗蘭克]] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1007985.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|