Difference between revisions 1008252 and 1008254 on mrwiki

अग्नीचा वापर विषय: इतिहास घटक: ४ इयता: ३ री
 संयोजक: लक्ष्मण कुंडलिक वाठोरे  (अध्यापक) 
 विद्या मंदिर मालाईवाडा ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर पिन -४१५१०१ .
    
 {{पानकाढा}}     जंगलात काही वेळा वाळलेले गवत उष्णतेने पेट घेते .तसेच 
कधीतरी झाडांच्या फांद्या एकमेकींवर घासून आग लागते.ती 
पसरत जाते.अशा आगीला वणवा म्हणतात .अश्मयुगातील माणूस 
असे वणवे पाहायचा.इतर प्राण्यांप्रमाणेच माणसाला आगीची 
भीती वाटायची .आग पाहून तो बुचकळ्यात पडायचा .
       अश्मयुगातील माणूस सुरवातीला आगीपासून दूर राहत असे;
पण आगीचा चटका लागतो, तसाच आगीमुळे अंधार नाहीसा 
होतो, हे माणसाच्या लक्षात आले. विस्तवाला हात लागला तर 
हात भाजतो ,पण शेकोटीजवळ बसले तर ऊब मिळते, हेही 
       माणसाच्या लक्षात आले .हे समजल्यामुळे त्याची आगीची भीती 
कमी झाली. एवढेच नव्हे, तर आपल्याला काही गरजांसाठी माणूस 
अग्नीचा वापर करू लागला.
        अग्नीच्या प्रकाशामुळे माणसाने गुहेतील अंधार दूर केला. माणूस 
दगडांचे दिवे वापरून लागला. या दिव्यांत प्राण्यांची चरबी व 
गवताची वात तो जाळत असे. थंडीच्या वेळी ऊब मिळवण्यासाठी 
त्याने अग्नीचा उपयोग केला, पण माणसाने अग्नी गुहेत नेला  तरी 
कसा?
        पेटलेल्या आगीत लाकडे टाकून अग्नी टिकवता येतो, पेटते 
लाकूड एका जागेवरून दुसरीकडे नेता येते,हे माणूस अनुभवाने 
शिकला. जाळ पाहून जनावरे दूर पळतात, हे त्याने पहिले . त्यामुळे 
स्वत:च्या रक्षणासाठी त्याने अग्नीचा उपयोग केला. गुहेच्या तोंडाशी 
अग्नी पेटता ठेवून माणूस गुहेत निर्धास्तपणे राहू लागला.
       आगीत भाजले गेलेले प्राणी व कंदमुळे माणसाने खाल्ली.
ती त्याला अधिक रुचकर लागली असावी .माणूस कंदमुळे व 
मांस भाजून खाऊ लागला.
       अग्नीचा उपयोग माणूस करू लागला खरा, पण अग्नी निर्माण 
कसा करावा हे त्याला माहित नव्हते.
        वणव्यातून पेटते लाकूड उचलून माणूस ते गुहेत नेत असे,
पण यात अनेक अडचणी होत्या. वणवा सतत पेटत नसे .गुहेपासून 
तो कधी खूप दूर असे. त्यामुळे गुहेकडे नेताना वाटेत विस्तव 
विझून जाई, म्हणून गुहेतील शेकोटी विझू नये असा प्रयत्न माणूस 
करत असे. हे काम फार त्रासाचे होते,म्हणून अग्नी निर्माण 
करण्याच्या खटपटीत तो होता . 
        हत्यारे तयार करताना माणूस गारगोटीचा दगड वापरत असे.
त्यासाठी दगड एकमेकांवर आपटावे लागत. असे करताना त्या 
दगडांमधून ठिणग्या बाहेर पडत. या ठिणग्या वाळलेल्या पाचोळ्यावर 
पडल्या,की तो पेट घेतो, माणसाने पाहिले. अशा रीतीने 
माणसाला अग्नी निर्माण करण्याचे तंत्र सापडले.
        आता माणूस गरज लागेल तेव्हा अग्नी पेटवायचा .गरज 
संपल्यावर पाणी किंवा माती टाकून तो विझवायचा.
       अग्नी ही माणसाच्या हाती आलेली मोठी शक्ती ठरली. माणूस 
मातीची भांडी पक्की करण्यासाठी अग्नीचा वापर करू लागला.
पुढे धातूंचा शोध लागल्यावर धातू वितळवण्यासाठी त्याने अग्नीचा 
वापर केला. त्यामुळे त्याला अनेक वस्तू व यंत्रे तयार करता 
आली. अग्नीचा वापर करून माणसाने खूप प्रगती केली .
  उपक्रम:-अश्मयुगातील माणसाने अग्नीचा वापर विविध कामांसाठी केला. आज 
आपण अग्नीचा वापर कोणकोणत्या कामांसाठी करतो, त्याची यादी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करा.

..............................................................................................
 website-  http://laxmanwathore.hpage.com
facebook name-"Adarsh shala"
Email- [email protected]
[email protected]
contact-9403876784
link- type "Adarsh shala"
send-9970875984
 ....................................................................................................