Difference between revisions 1033984 and 1033985 on mrwikiडॉ. तात्याराव लहाने. मुंबईच्या जे.जे.रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमूख . लातुर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेडेगावात जन्मलेल्या तात्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षणही इथेच झाले.पुढे स्वतःच्या हुशारीने आणि शिक्षकांच्या मदतीने त्यांना डॉक्टर कसे होता आले ते त्यांच्याच शब्दात ऐकणे जास्त योग्य होईल. त्यानंतर त्यांची दोन्ही मुत्रपिंडे निकामी होणे,त्यांच्याच आईने त्यांना एक मुत्रपिंड दान करणे आणि आता त्याच जोरावर आणि पुण्याईवर आयुष्यभर रुग्णांची सेवा करण्याचे व्रत अंगी बाणवणे हे सगळे अतिशय मनाला भिडणारे आहे. आजवर तात्यांनी एक लाखावर नेत्रशस्त्रक्रिया केलेल्या आहेत. ⏎ ⏎ <ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा =http://mr.upakram.org/node/422 | शीर्षक =डॉ.तात्याराव लहाने! एक मोठ्ठा माणूस! | भाषा =मराठी | प्रकाशक =[[http://mr.upakram.org/node/422 ]] | दिनांक =१७ जुन , इ.स. २००७ | ॲक्सेसदिनांक =३१ जुलै, इ.स. २०१२ }}</ref> == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भसूची}}मी एके दिवशी दुपारी नेहमीप्रमाणे बाह्यरुग्ण विभागात बसलो होतो. माझ्याकडे हेमंत नावाचा पंचविशीच्या आसपासचा एक रुग्ण आला. तो अंध होता. मी चौकशी केली असता असे समजले की, तो दिपवाळीला फटाके वाजवत होता. एक फटाका फुटला नाही म्हणून तो फटाका लावलेल्या व फटाका रोवण्यासाठी वाळूने अर्ध्या भरलेल्या बकेटात पाहत होता, तेवढ्यात फटाक्याचा आवाज झाला. तोंड बाहेर काढण्याअगोदर त्याच्या तोंडावर व डोळ्यात असंख्य कण गेले. मी हेमंतची तपासणी केली. त्याच्या डोळ्याबाहेर व डोळा जागोजागी फुटून डोळ्याच्या आत असंख्य वाळूचे कण गेले होते. त्यामुळे बुबुळ पूर्ण पांढरे पडले होते व आतील भिंगात असंख्य कण जाऊन मोतीबिंदूचे अनेक तुकडे झाले होते. डोळ्याच्या पाठीमागील पडद्यावर कण लागल्याने तो फाटून रक्त साठले होते. क्षणिक आनंदासाठी हेमंत आंधळा झाला होता. माझे मित्र लक्ष्मण म्हामुणकर या मुलाच्या नातेवाईकांना घेऊन मला भेटण्यास आले. मी त्यांना हेमंतची परिस्थिती समजावून सांगून आता तो पाहू शकणार नाही, असे सांगितले. तसेच त्यांना खाजगीत घेऊन जाण्याचीही परवानगी दिली. नातेवाईकांचा आमच्या उपचारावर इतका विश्वास होता की, हेमंतला दिसेल असेच त्यांना वाटत होते. आम्ही हेमंतच्या सर्व तपासण्या केल्या व दृष्टी येणे अशक्य गोष्ट असल्याचे आमच्या लक्षात आले. पुन्हा नातेवाईकांना तसे समजावून सांगितले. आम्ही सुरुवातीलाच मोठे मोठे खडे काढले होते. काही दिवसांनी हेमंतच्या डाव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून डोळ्याच्या बाहेरील भागावर रुतून बसलेले खडे काढण्याचा निर्णय घेतला. खूप खडे काढले. डोळा खूप ठिकाणी फुटला होता. बुबुळात भरपूर खडे होते. आतील खडे काढणे शक्य नव्हते. काही दिवसांनी डोळ्यात झालेला मोतीबिंदू व त्यामागील खडे काढण्याची शस्त्रक्रिया केली. मागील पडदा दिसत नव्हता; पण जेथे छिद पडले होते ते लेसरने बंद केले. अचानक अंधत्व आल्याने हेमंतच्या जीवनात पूर्ण अंध:कार निर्माण झाला होता. त्यालाही माझ्या हाताला यश येईल, असे मनोमन वाटत असे. माझ्यावरील त्याच्या या विश्वासाने मी मात्र फारच विचारात पडलो होतो. दुसरी शस्त्रक्रिया करून डोळ्यात हवा टाकली होती. ती हवा मला आधार देत होती. मी रोज सकाळी हेमंतला डोळ्यातली हवा कमी झाल्यास दृष्टी येईल की नाही ते कळेल, असे सांगून तो दिवस पुढे नेत होतो. दृष्टी आली नाही, तर त्याला ते कसे सांगावे हा प्रश्ान् माझ्यासमोर होता. शस्त्रक्रियेचा चौथा दिवस उजाडला व त्याला दिसत नाही याची खात्री करण्यासाठी मी माझी दोन बोटे हेमंतच्या समोर धरून विचारले ''किती बोटे आहेत?'' आणि आश्चर्य घडले. हेमंतने सांगितले दोन बोटे आहेत. मी पुन्हा चार-पाच फुटावरून बोटे दाखविली आणि मला कळले की, हेमंतला थोडी का होईना दृष्टी प्राप्त झाली आहे. हेमंतला आनंद होणे नैसगिर्कच होते; पण माझ्या सर्व चमूलाही अतिशय आनंद झाला. हेमंत त्याचे नातेवाईक, देशमुख व लक्ष्मण म्हामुणकर यांच्या माझ्यावरील दुर्दम्य श्रद्धेमुळे हेमंतला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली असे मला वाटते. मलाही हेमंतला दृष्टी यावी असे सारखे वाटत होते. या श्रद्धेपोटी मी डॉक्टरची भूमिका करतानाच हेमंतच्या नातेवाईकांच्या रांगेत सहभागी झालो होतो, हे हेमंतला दिसू लागल्यावर मला झालेल्या आनंदाने मला जाणवले. सगुण-निर्गुण लिहावयास सुरुवात केल्यानंतर मी नाशिकच्या एका रुग्णालयाच्या उद्घाटनाला गेले होतो. तेथील सभागृहात हे सर्व लेख फार मोठे झेरॉक्स करून लावले होते. तसेच माझे विचार ऐकण्यासाठी खूप लोक आले होते. मी इतक्या प्रेमाची स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. कार्यक्रमानंतर माझ्या सहीसाठी व हातात हात मिळविण्यासाठी रांग लागली होती. हे प्रेम पाहून मी भारावून गेलो. माझा पिंड आध्यात्मिक नाही. मी मनुष्यसेवाच ईश्वरसेवा म्हणून रुग्णांची सेवा करत आलो आहे. सगुण-निर्गुण सारखे आध्यात्मिक लिखाण मी यापूवीर् कधीच केले नव्हते. पंचवीस वषेर् रुग्णांच्या सेवेत गेली. त्यांची सेवा करताना वषेर् कशी गेली हे कळलेही नाही. तसेच सेवा करता करता माझ्या शरीरातील आजार मी विसरून गेलो. हे सेवेचे सार्मथ्य आहे. लिहिण्याची सवय नसल्याने काही चुकले असेल तर वाचकांनी क्षमा करावी. यथाशक्ती व मला जसे कळले तसे एवढ्या मोठ्या प्रगल्भ विषयावर लिहिण्याचा प्रयत्न केला; पण या इतक्या साध्या विचारांना आपण जे भरभरून प्रेम दिले, त्याच्या जोरावर पुढील रुग्णसेवेची वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन व सार्मथ्य मिळाले. असेच प्रेम राहू द्या. तुम्हाला माझ्या भेटीला येण्याची गरज पडू नये, अशी ईश्वरचरणी प्रार्थना; कारण मी डॉक्टर आहे. आपणास निरोगी जीवन मिळो ही प्रार्थना. <ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2765659.cms | शीर्षक =मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा | भाषा =मराठी | प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]] | दिनांक =८ फेब्रुवारी, इ.स. २००८ | ॲक्सेसदिनांक =३१ जुलै, इ.स. २०१२ }}</ref> == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भसूची}} == बाह्य दुवे == * [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2765659.cms महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रातील तात्याराव लहानेवरील लेख: मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1033985.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|