Difference between revisions 1034105 and 1044583 on mrwiki

डॉ. तात्याराव लहाने. मुंबईच्या जे.जे.(जमशेदजी जिजीभॉय) रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमुख आहेत. लातूर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेडेगावात जन्मलेल्या तात्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षणही तेथेच झाले. पुढे स्वतःच्या हुशारीने आणि शिक्षकांच्या मदतीने ते डॉक्टर झाले.  प्रतिकूल परिस्थितीशी लढत, सतत पैशाची चणचण सहन करत ते डॉक्‍टर झाले. ते सरकारी नोकरीत लागले; पण तेथील तुटपुंज्या पगारात भागवता भागवता मेटाकुटीला आल्यामुळे खासगी प्रॅक्‍टिस सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात तीव्रतेने येत होता. पण १९९१ मध्ये अगदी लहान वय(contracted; show full)ले. त्यामुळे भारतातीलच नव्हे, तर परदेशांतील कोणत्याही शासकीय, निमशासकीय अथवा खासगी रुग्णालयात झाल्या नसतील एवढ्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया डॉ. लहाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या तीस वर्षांमध्ये केल्या आहेत. मोतीबिंदूच्या एक लाख चाळीस हजारांहून अधिक शस्त्रक्रिया करण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. हे अशक्‍य काम कसे शक्‍य झाले, याबद्दल विचारल्यावर डॉ. लहाने अगदी साधे सोपे उत्तर देतात, ""मी माझे काम करत राहिलो. रुग्णांच्या माझ्यावरील विश्‍वासामुळेच ही कामगिरी मी करू शकलो.'' 


===कर्मचाऱ्यांचेही सहकार्य  ===
डॉ. लहाने यांनी आतापर्यंत तब्बल १ कोटी १० लाख रुग्णांची तपासणी केलेली आहे.  त्यांपैकी १ लाख ४१ हजार वृद्धांवर मोतिबिंदूंच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.  आजपर्यंत ४७७ मोफत नेत्रशस्त्रक्रिया शिबिरे, आणि त्यापैकी१७५ विनाटाक्‍याच्या शस्त्रक्रियांची शिबिरे त्यांनी घेतलेली आहेत. बाबा आमटे यांच्या आनंदवनात १४ नेत्रशस्त्रक्रिया शिबिरे घेऊन त्यातून दीड हजार कुष्ठरुग्णांना नवी दृष्टी दिली. जन्मतः अंध असलेल्या दहा हजार व्यक्तींवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीवनात रंग भरला. अगदी वयाने २० दिवसांच्या बाळापासून ते १०२ वर(contracted; show full)

===कार्याचा सन्मान करणारे पुरस्कार ===
नेत्रशल्यचिकित्सा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव म्हणून डॉ. लहाने यांना आतापर्यंत ‘मराठवाडा गौरव पुरस्कार', ‘लातूर गौरव पुरस्कार', ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार', ‘जीवनगौरव पुरस्कार' अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २००७ मध्ये डॉ. लहाने यांनी आपली एक लाखावी शस्त्रक्रिया पार पाडली. त्यांचा हा विक्रम पाहून २००८ मध्ये भारत सरकारने त्यांना "पद्मश्री' बहाल केली. 


;कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून बदल घडवला:  
असे म्हणतात, की दुसऱ्यापेक्षा स्वतःला बदलणे हे जास्त सोपे असते. मात्र लहाने यांनी स्वतःप्रमाणेच त्यांच्या स्टाफच्या मनोवृत्तीतही आमूलाग्र बदल घडवून आणला. घड्याळ्याच्या काट्यावर काम करणे मान्य नसल्याने डॉ. लहाने दिवसाचे १६ ते १८ तास काम करतात. शासकीय सुट्या असोत वा शनिवार-रविवार, ते कायम कामात व्यग्र दिसतात. लहाने यांचे कामाप्रती हे समर्पण आणि निष्ठा पाहून त्यांच्या स्टाफला शेवटी बदलावेच लागले. एवढेच नव्हे, तर "जे. जे.'चा नेत्रविभाग आज इथल्या प्रत्येक विभागासाठी एक रोल मॉडेल बनला आहे. "खरे तर(contracted; show full)| ॲक्सेसदिनांक =७ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>

== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भसूची}}

== बाह्य दुवे ==
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2765659.cms महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रातील तात्याराव लहानेवरील लेख:  मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा]