Difference between revisions 1049187 and 1049511 on mrwiki

या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.

....................................
हा लेख आणि त्यावरील माहिती तपासली. लेखासोबत दिलेले सर्व संदर्भ तपासले. ते योग्य आहेत, असे दिसून आले. याही पुढे जाऊन हा लेख ज्या वर्गातील आहे, त्या वर्गाची म्हणजेच मराठी ब्लॉगर हा वर्गही तपासला. अनेक मराठी ब्लॉग तपासले. त्यात  असे आढळून आले की, अनेक ब्लॉगर स्वत:चे छायाचित्र लावण्याऐवजी काही तरी प्रतिकचिन्ह घेऊन त्याचे छायाचित्र वापरतात. इंग्रजीतील ब्लॉगरही ही पद्धत वापरतात असे दिसून आले आहे. विशेषत: स्त्रिया स्वत:ची छायाचित्रे टाकण्याचे टाळातत, असे दिसून आले आहे. नेटवरील छायाचित्रांचा गैरवापर होण्याचा धोका असतो, हे एक कारण त्यामागे आहे. त्यामुळे या लेखावर ‘खोटे ज्ञान पसरविण्या'संबंधी जो आरोप करण्यात आला आहे, तो चुकीचा असल्याचे स्पष्ट होते.