Difference between revisions 1053417 and 1054229 on mrwiki

{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग = 
| नाव = संजय सोनवणी 
| चित्र = Sanjay_Sonawani.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = 
| पूर्ण_नाव = संजय सोनवणी
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1964|14|8}} 
| जन्म_स्थान = [[जळगाव]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र =  लेखन, संपादन, प्रकाशन, व्याख्याता, व्यावसायिक 
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], 
| कारकीर्द_काळ = [[इ.स. १९८०]] - चालू
| प्रमुख_चित्रपट = मराठी: [[चित्रपट|अमानुष-एक थरार ‌]]
| प्रमुख_पुस्तके = आणि पानिपत, नीतिशास्त्र 
| वडील_नाव = देविदास सोनवणी  
| आई_नाव =  इंदुमती सोनवणी
| पती_नाव = 
| पत्नी_नाव = पुष्पा सोनवणी
| अपत्ये = सोनल सोनवणी, अनिकेत सोनवणी
| संकेतस्थळ = http://sanjaysonawani.blogspot.in/
| तळटिपा = 
}}

'''संजय सोनवणी''' (जन्म १४ ऑगस्ट १९६४): 
हे मराठीतील एक साहित्यिक, ब्लॉगर आहेत. संजय सोनवणी यान्ची  सामाजिक प्रश्नांवरची भूमिका अनेकदा वादग्रस्तही ठरली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेला त्यांचा [[नीतिशास्त्र]] हा नैतिक समस्यांबद्दलचा चिंतनपर ग्रंथ प्रसिद्ध आहे. कथा, कादम्बरी, कविता असे चौफेर लेखन  त्यांनी केले आहे.

==जीवन== 

[[महाराष्ट्र]], [[जळगाव]] जिल्ह्यात संजय सोनवणींचा जन्म श्री. देविदास सोनवणी आणि सौ. इंदुमती सोनवणी या दांपत्याच्या घरी झाला. वडील श्री देविदास सोनवणी हे प्राथमिक शिक्षक होते. जगुरुगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून बी. कॉम ही पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. येथे त्यांनी [[दै. आज का आनंद]]  या हिंदी वृत्तपत्रात पत्रकारितेचे काम करत एम.कॉम ही पदवीही प्रथम श्रेणीत प्राप्त केली. त्यानंतर काही काळ त्यांनी [[क्राइम रिपोर्टिंग]]  केले. {{संदर्भ हवा}} गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि नक्षलवादाने ग्रस्त भागात त्यांनी काही काळ  धातु-भुकटी कारखाना चालविला. संशोधन करत धातु-भुकटी विज्ञानात (Powder metallurgy) भर घातली. ५००० रुपयांच्या भांडवलावर त्यांनी सुरुवात केली होती. त्यांनी लेह (लडाख) येथेही फळप्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रयत्न केला. पुष्प प्रकाशन लि. या संस्थेमार्फत त्यांनी ८५०पेक्षा अधिक पुस्तके प्रसिद्ध केली. [[वाशिंग्टन सॉफ्टवेयर लि.]] या कंपनीमार्फत त्यांनी  स्वतःचे स्वामित्व हक्क असणारी २८ उत्पादने जागतिक बाजारपेठेत आणली. {{संदर्भ हवा}} 

==साहित्य प्रवास== 

सोनवणींनी ११  वर्षांचे असताना "फितुरी" हे नाटक लिहिले.  वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी लिहिलेली पहिली बालकादंबरी (नरभक्षकांच्या बेटावर) मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केली. त्यांच्या  कथा तत्कालीन मासिकांतूनही प्रसिद्ध होत राहिल्या. राज्य शासनाच्या अनुदानाने त्यांचा पहिला कवितासंग्रह "प्रवासी" प्रसिद्ध झाला. सव्यसाची, मृत्युरेखा, रक्त हिटलरचे, बीजिंगच्या वाटेवर, क्लिओपात्रा इ.  त्यांच्या कादंबऱ्या इंग्रजीत अनुवादित झाल्या.  कल्की, शून्य महाभारत, कुशाण, ओडीसी आणि यशोवर्मन या त्यांच्या तत्त्वचिंतनात्मक कादंबऱ्यां आहेत. कुशाणचा अनुवाद इंग्रजीत "Last of the wanderers" या नावाने आणि यशोवर्मनचा "The Jungle" या नावाने प्रसिद्ध झाला. त्यांची  राणी शीबाला केंद्रीभूत धरून लिहीलेली "The Awakening"  ही  इंग्रजी कादंबरी प्रसिद्ध आहे.  या कादंबरीचा मराठी अनुवादही आहे. त्यांच्या "पर्जन्य सूक्त" या काव्याचा इंग्रजीत अनुवाद झाला आणि त्यातील निवडक ८ कवितांना संगीतबद्ध करून त्याची ध्वनीफीतही प्रसिद्ध झाली. त्यांची "असुरवेद" ही अलीकडेच प्रसिद्ध झालेली सांस्कृतिक थरारकथा आहे. त्यांची "...आणि पानिपत" ही कादंबरी. सर्वधिक गाजली. ही मराठीतील पहिली subaltern कादंबरी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेला त्यांचा [[नीतिशास्त्र]] हा नैतिक समस्यांबद्दलचा चिंतनपर ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. त्यातील काहींचे प्रयोगही झाले. 

==सन्शोधन== 
त्यांनी विश्वनिर्मितीबाबतचा स्वतंत्र भारतीय सिद्धान्त मांडला.  तो "अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती" या शीर्षकाने प्रसिद्ध झाला. त्यांनी धर्मेतिहासावर "हिंदू धर्माचे शैव रहस्य" आणि "विठ्ठलाचा नवा शोध" हे ग्रंथ सिद्ध केले. अलीकडेच त्यांचा "महार कोण होते?" हा महार समाजाचा पुरातन इतिहास उलगडून दाखवणारा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.

==वाद-विवाद==
(contracted; show full)===संकीर्ण===
* किर्लोस्कर ते अन्य अनेक मासिकांत शंभरेक वैचारिक लेख.

==बाह्य दुवे==
*[http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_08.html संजय सोनवणी यांनी अनिता पाटील यांना दिलेले उत्तर]
*[http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_9158.html पु. ल. देशपांडे यांच्यावरील टीकेला सोनवणी यांचे उत्तर]

[[वर्ग : मराठी ब्लॉगर]]