Difference between revisions 1055249 and 1055250 on mrwiki

आधुनिक शिक्षण भगिरथ पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील
                                                                          [[सदस्य:प्रा.द.म.डांगे|प्रा.द.म.डांगे]] ([[सदस्य चर्चा:प्रा.द.म.डांगे|चर्चा]]) १६:१६, २५ सप्टेंबर २०१२ (IST)प्रा. द.म.डांगे
                                                                         डी.पी.भोसले कॉलेज, कोरेगाव.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी गंगाबाई मातेच्या पोटी झाला. पायगौंडा पाटील हे भाऊराव यांच्या पित्याचे नाव. मुळातच भाऊराव पाटील यांचे घराणे जैन धर्मिय असल्याने लहानपणापासून त्यांच्या घरात कडवी शिस्त होती. मात्र वडिल महसूल विभागात कार्यरत असल्याने घरी अनेक शेतकरी, शेतमजुरांची ये-जा असे. नोकरीच्या निमित्ताने भटकंती ठरलेली होती. तेंव(contracted; show full)्मवीर अण्णांच्या कार्याची महती लक्षात घेऊन  भारत सरकारने त्यांना १९५९ साली ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन गौरव केला.  तर पुणे विद्यापीठाने १९५९ मध्येच शिक्षण क्षेत्रातील  डी.लिट. ही अतिउच्च पदवी प्रदान केली. तर जनतेने त्यांना ‘कर्मवीर’ ही सन्मानाची पदवी बहाल केली. तेंव्हापासून भाऊराव पाटील इतिहासात ‘कर्मवीर अण्णा’ या नावांनी ओळखले जाऊ लागले. अशा या थोर शिक्षण महर्षिंची पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये ९ मे १९५९ रोजी प्राणज्योत मालवली. 
अशा या थोर शिक्षण भगिरथास त्यांच्या एकशे पंचविसाव्या जयंती निमित्त शतश: प्रणाम !