Difference between revisions 1055286 and 1055287 on mrwiki

याच विकीवर [[भाऊराव पाटील]] या मथळ्याचा एक लेख आहे. तो लेख आणि प्रस्तुत लेख यांच्या समन्वयाने एक अधिक चांगला लेख तयार करता येईल. 

प्रस्तुत लेखात शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या चुका मानवी दुरुस्तीपलीकडे आहेत. त्या चुका आधी यांत्रिक शुद्धलेखनचिकित्सक वापरून कमीतकमी केल्यास बरे होईल. 

लेख लिहिताना त्यांत टाळण्याजोगी सर्व विशेषणे गाळलेली असावीत ही विकिपीडियाची (आणि कुठल्याही ज्ञानकोशाची) अनिवार्य गरज असते. प्रस्तुत लेखाचा तर मथळाच विशेषणांनी बुजबुजलेला दिसतो आहे.  

त्यास्तव, हा लेख मथळ्यासकट पुसून टाकावा, आणि आधीच्या [[भाऊराव पाटील]] या लेखात सुयोग्य भर टाकावी.....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) १७:३८, २५ सप्टेंबर २०१२ 
(IST)

==व्यक्तिनावाआधी पद्म==

पद्म [[पुरस्कार]] मिळालेल्या व्यक्तीच्या नावाआधी [[पुरस्कार|पुरस्काराचे नाव]] उपाधीसारखे जोडता येत नाही.  यासाठी [[पुरस्कार]] या लेखातील आरंभीचा मजकूर वाचावा...[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) १७:४३, २५ सप्टेंबर २०१२ (IST)