Difference between revisions 1056381 and 1056507 on mrwiki

डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळा पासूनची आहे. [[जव्हार]] संस्थानचे राजे कै. यशवंतराव मुकणे यांचे वडील राजे मार्तंडराव मुकणे यांनी ही मागणी सर्वप्रथम [[इ.स. १९३२]] मध्ये  ब्रिटिश सरकारकडे केली होती. परंतु ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांनी [[इ.स. १९४२]] मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी [[चले जाव आंदोलन]] सुरू केल्याने या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर [[इ.स. १९५२]] आणि इ.स. १९५७ या काळात लोकसभेत पहिल्या लोकसभेतील खासदार कै. यशवंतराव मुकणे, कै. गोदुताई उर्फ [[गोदावरी परुळेकर]] यांनी आवाज उठवला. जव्हार येथील साप्ताहिक ‘कालतरंग’चे संपादक दयानंद मुकणे हे जव्हार-नाशिक रेल्वेमार्गाबाबत प्रयत्न करत असताना कल्याणजवळच्या बदलापूर येथे राहणारे गुलाम मुस्तफा रब्बानी कुवारी यांच्‍याशी त्‍यांची भेट झाली. त्यांच्यात झालेल्या चर्चेतून ठाणे जिल्ह्याचा अविकसित भाग जोडण्यासाठी एक नवा रेल्वेमार्ग विकसित करण्याची कल्पना पुढे आली. मुस्तफा कवारी यांनी बदलापूर-मुरबाड-वाडा-जव्हार आणि मुरबाड-अहमदनगर अशा दोन रेल्वे  मार्गांचे नकाशे व तसा प्रस्ताव तयार केले. मुकणे व कुवारी यांनी [[लालबहादूर शास्त्री]] रेल्वेमंत्री असताना हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला. १९७८ मध्ये खासदार कै.रामभाऊ म्हाळगी, जव्हारचे स्वातंत्र्यसैनिक कै.रेवजीभाई चौधरी, कै. बबनराव तेंडुलकर, पत्रकार कै. दयानंद मुकणे, आदिवासींच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या नेत्या कै.गोदुताई परुळेकर, आदींनी या रेल्वेमार्गाचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर कॉ. सैफुद्दीन चौधरी, प्रभाकर संझगिरी, कॉ.[[अहिल्या रांगणेकर]], आमदार ल.शि. कोम, शिवाय दामू शिंगडा, शंकर नम, चिंतामण (contracted; show full)

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}


^http://epaper.esakal.com/esakal/20091221/5474481243174116724.htm
^http://epaper.esakal.com/eSakal/20100225/5400017815088012676.htm