Difference between revisions 1083719 and 1083728 on mrwiki

खुलं खुलं आभाळ तसा..</br>
मीही खुला खुला..</br>
दारं, खिडक्या, भिंती यांची..</br>
सवय झाली तुला..</br>
:***</br>
कवी-ज्ञानेश वाकुडकर</br>
(१०/०६/२०१२)<ref>हे काव्य क्वोट करण्या करीता फेसबुक संदेशाच्या माध्य्मातून .काव्याचे कवी श्री.ज्ञानेश्वर वाकुडकर यांची अनुमती घेतली आहे.</ref>

==नाव आडनाव==
''माझ्यावरील टिकाकारांच्या टिकेस आदर म्हणून'' मी माझे नाव विजय आणि आडनाव सरदेशपांडे येथे नमुद करतो. '''खुलं खुलं आभाळ तसा..मीही खुला खुला..दारं, खिडक्या, भिंती यांची..सवय झाली तुला..?'''  या कवी ज्ञानेश वाकुडकरांच्या ओळींवर श्रद्धा असलेला मी, नाव लपवण्याकरिता टोपण नाव घेईन असे माझ्या वर टिकाकारांना वाटते? (''काय प्रतिक्रीया द्यावी ?''). मी माहितगार हे नाव टोपणनाव प्रसिद्धी पराङमुखतेकरीता स्विकारले होते.या गोष्टीलाही बरीच वर्षे झाली.  

त्या माझ्या आदरणीय टिकाकारांनी, आपली टिका कशा प्रकारच्या पुर्वग्रहांनी किंवा हेतुपुरस्सरते ग्रस्त आहे, या बद्दल स्वत:चे स्वत:च ''(घाई नाही, काही वर्षांनी, केले तरी चालेल)'' पण आत्मपरिक्षण जरूर करावे. . माहितगारवरच्या टिकेचे परिमार्जन किंवा माहितगारवर होणारा अन्याय दूर करण्या साठी म्हणून नव्हे, तर अशा प्रकारे आपल्या वागण्यातून, आपल्याला इतरांवर अन्याय करण्याची अगदी सवयच लागून गेली असेल तर, आपल्यातला सदगृहस्थ जागा व्हावा या सदिच्छेनेच.

अर्थात सदस्यांनी मनातील गैरसमज पुर्वग्रह काही क्षणा करिता दुर ठेऊन, नाव जाहीर करण्याकरिता नावांच्या जाहीर चर्चा करण्याकरिता विकिपीडिया हे फेसबुक नव्हे  हे लक्षात घ्यावयास हवे.विकिपीडिया सारख्या मुक्त संकेतस्थळावर व्यक्तिगत पूर्वग्रह आणि पार्श्वभूमी दूर ठेऊन; ज्ञान माहिती आणि कृतींना निष्पक्षपणे, एखाद्दा नाण्याच्या परस्पर विरोधी बाजूंची पण मांडणी करावी लागू शकते.अशी मांडणी करताना काही लोकांचे पुर्वग्रह दुखावल्यास वैचारीक देवाण घेवाण करून, गोष्टी मनातील गैरसमज, किल्मीषे , मोकळेपणाने दूर करून घेण्याची गरज असते. आपले पुर्वग्रह अथवा हितसंबंध दुखावले म्हणून व्यक्तिगत असभ्यता आणि चारीत्र्यहनानाचा मार्ग न्याय्य ठरतो का ? हे ज्याचे त्याने आपापल्या मनाला विचारावे. स्वत:तील सदगृहस्थास संधी देऊन सकारात्मक आणि रचनात्मक कार्य अंगिकारावे. 



कुणी मला विचारकी मराठी विकिपीडिया मला सर्वोपरी आहे का ? माझे उत्तर प्रामाणिकपणे मराठी भाषेपेक्षा आणि माझ्या देशा पेक्षा अधिक नाही.मराठी भाषेचा ज्ञानकोशीय विकास व्हावा म्हणून  मराठी विकिपीडिया हे एक चांगले साधन आहे.मराठी विकिपीडिया चे प्रत्येक व्यक्तिकडून ज्ञान जमाकरून प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय आहे  .हे ध्येय गाठण्याकरिता कार्यशाळा इत्यादींच्या माध्यमातून मराठी विकिपीडिया  पुढे न्यावा याची जेव्हा निकड व्यक्त होऊ लागली, तेव्हा मी माझ्या मातृभाषेवरील प्रेमापोटी दूर राहण्याचे टाळून पुढे आलो आणि त्यातही लवकरात लवकर, गोष्टी नविन पिढीच्या आणि शैक्षणिक क्षेत्राच्या अधीन करून दूर जाण्याचे ध्येय ठेवले.

सामाजिक काम टोपणनावाने करता येत नाही तेव्हा आवश्यक तिथे आणि गरजे पुरतेच मी माझे नाव प्रसिद्धी पराङमुखतेचा आग्रह दूर ठेऊन  वापरले किंवा वापरावे लागले. टिकाकारांचे बरेच प्रकार असतात . काही जणांना दुसऱ्यातील व्यंग हेरण्याचे कौशल्य येते (.

ह्या मंडळींनां इतरांच्या चांगल्या गोष्टी त्यांना दिसत नाहीत असे नाही,क्रेडीट देऊ इच्छित नाहीत असे नाही.किंवा वाईट चिंततात असे नाही.    या व्यंग शोधणाण्याचे कौशल्य असलेल्या व्यक्तींचे दोन वेगळे उपप्रकार असतात एक प्रकार असतो जो व्यंग शोधून विनोद/व्यंगचित्र इत्यादी हास्य निर्मिती साधतो .चांगल्या गोष्टीचे क्रेडीट बिडीट देण्यात वेळ गेला तर हास्यरसाच्या निर्मीतीत अडथळा येऊ शकतो. 



दुसरा उपप्रकार असतो Satire (पहा [[en:Satire]])  लिहिणाऱ्यांचा  हि मंडळी सुद्धा बऱ्याचदा व्यंग शोधून  टिका  (आणि नाट्यछटा व्यंगचित्रे इतर कला सुद्धा) करत असतात. Satire ची मंडळी सुद्धा जीथे व्यंग दिसते त्यातील चांगल्याला क्रेडीट वगैरे द्यायचे बऱ्याचदा पुढे ढकलतात, कारण लेखनाचा ओघ आणि त्याही पेक्षा टिकेची धार टिकवायची असते. यात Satire  टिकाकाराच्या सोबतीला त्याचा एखाद्दा विषयाचा गाढा अभ्यास असेल, सर्व बाजू माहित असून समिक्षणात्मक क्षमता असेल तर त्यास उत्तर देण्याकरिताही तेवढाच व्यासंगी टिकाकार किंवा समीक्षकाची गरज भासते.



बहुसंख्य लोक अशा Satire   टिकाकारांचा पटलेला भाग घेतात न पटलेला सोडून देऊन सामान्य जिवनाचे मार्गक्रमण करतात, बाकीची अल्पसंख्य पटल्यामुळे किंवा न पटल्यामुळे निरूत्तर पण पुर्गग्रहांनी वेढून अस्वस्थ झालेल्या मंडळींचे अशा टिकाकारांच्या बाजूने अथवा विरोधात  मोहोळ उठताना दिसते त्यातील थोडे काही लोक हळवे लोक स्वत:चे पुर्वग्रहांना अथवा हितसंबंधांना लागलेले धक्के सहन न होऊन असभ्यता, चारीत्र्यहनन आणि इतर [[उपद्रव मुल्य|उपद्रव मुल्याचा]] उपयोगाच्या भरीस पडतात   .. विकिपीडियाच्या दृष्टीने उपयूक्त, इथे एक चिनी लघू कथा सांगतो. एकदा एका चिनी एका विशीष्ट प्रकारातील मार्शल आर्ट गुरू कडे एक व्यक्ति येते .ती व्यक्ती त्या गुरूला स्वत: अवगत केलेल्या मार्शल आर्टच्या एका प्रकारातील   आपल्या क्षमते बद्दल बरेच काही सांगते आणि मला तुमच्या प्रकारचे मार्शल आर्ट शिकवाल का ? म्हणून विचारते . हा चिनी गुरू शांतपणे नकार देतो . तर ती व्यक्ति तुम्ही मला का शिकवू इच्छित नाही ? म्हणून विचारते . तो चिनी गुरू समोरच्या चहाच्या केटलीतन एक चहाचा कप शिगोशीग भरतो.   



(मराठीत Satire ला व्याजोक्ति, उपरोधिका,उपहासिका इत्यादी शब्द वापले आहेत पण Satire या शब्दाच्या छटेला ते न्याय देतात का माहित नाही. [[en:Satire]] हा इंग्रजी विकिपीडियावरील लेख याची छान माहिती देतो, माझ्यावर जे टिका करतात त्यांनी तो आवर्जुन एवढ्याकरता वाचावा की माझ्या लेखनाच्या स्ट्राँग बाजूंचा तुमचा अभ्यास चांगला व्हावा आणि तुम्हाला असभ्य आणि चारीत्र्यहननात्मक टिकेचा आधार न घेता  माझ्यावर कठोर टिका करता यावी.)  (लेखन चालू)



(contracted; show full)

कोणतेही नवे प्रकल्प अथवा लेखन करण्यास माझ्या पूर्वसंमतीची आवश्यकता नसते, स्वतःहून पुढाकार घेण्याचे स्वागतच असते, काहीवेळा काही बाबी मराठी विकिपीडिया समुदायाच्या सहमतीने होतात यात प्रचालकीय स्तराचा सहसा काहिही हस्तक्षेप नसतो . इतर प्रचालकांचे पद हिरावण्याचे माझ्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. प्रचालकांसंदर्भातील विनंत्या संदर्भात असलेले प्रस्ताव सर्वानुमते प्रचालकांना निवेदन चावडीवर करत जावे.

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==प्रयोग==
==babel==
{{#babel: en-1| mr-0}}