Difference between revisions 1196692 and 1350045 on mrwiki{{माहितीचौकट अभिनेता | पार्श्वभूमी_रंग = | नाव = संजय सोनवणी | चित्र = Sanjay_Sonawani.jpg | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = | पूर्ण_नाव = संजय सोनवणी | जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1964|14|8}} | जन्म_स्थान = [[जळगाव]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] | कार्यक्षेत्र = लेखन, संपादन, प्रकाशन, व्याख्याता, व्यावसायिक | राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], | कारकीर्द_काळ = [[इ.स. १९८०]] - चालू | प्रमुख_चित्रपट = मराठी: [[चित्रपट|अमानुष-एक थरार ]] | प्रमुख_पुस्तके = आणि पानिपत, नीतिशास्त्र | वडील_नाव = देविदास सोनवणी | आई_नाव = इंदुमती सोनवणी | पती_नाव = | पत्नी_नाव = पुष्पा सोनवणी | अपत्ये = सोनल सोनवणी, अनिकेत सोनवणी | संकेतस्थळ = http://sanjaysonawani.blogspot.in/ | तळटिपा = }} '''संजय सोनवणी''' (जन्म १४ ऑगस्ट १९६४): हे मराठीतील एक साहित्यिक, ब्लॉगर आहेत. संजय सोनवणी यांची सामाजिक प्रश्नांवरची भूमिका अनेकदा वादग्रस्तही ठरली आहे. कथा, कादंबरी, कविता असे चौफेर लेखन त्यांनी केले आहे. ==जीवन== [[महाराष्ट्र]], [[जळगाव]] जिल्ह्यात संजय सोनवणींचा जन्म श्री. देविदास सोनवणी आणि सौ. इंदुमती सोनवणी या दांपत्याच्या घरी झाला. वडील श्री देविदास सोनवणी हे प्राथमिक शिक्षक होते. संजयने राजगुरुगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून बी. कॉम ही पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. येथे त्यांनी एम.कॉम ही पदवी प्राप्त केली. गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि नक्षलवादाने ग्रस्त भागात त्यांनी काही काळ धातु-भुकटी कारखाना चालविला. ५००० रुपयांच्या भांडवलावर त्यांनी सुरुवात केली होती. त्यांनी लेह (लडाख) येथेही फळप्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रयत्न केला. पुष्प प्रकाशन लि. या संस्थेमार्फत त्यांनी ८५०पेक्षा अधिक पुस्तके प्रसिद्ध केली. {{संदर्भ हवा}} ==साहित्य प्रवास== ⏎ ⏎ सोनवणींनी ११ वर्षांचे असताना "फितुरी" हे नाटक लिहिले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी लिहिलेली पहिली बालकादंबरी (नरभक्षकांच्या बेटावर) मेहता पब्लिशिंग हाउऊसने प्रकाशित केली. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अनुदानाने त्यांचा पहिला कवितासंग्रह "प्रवासी" प्रसिद्ध झाला. सव्यसाची, मृत्युरेखा, रक्त हिटलरचे, बीजिंगच्या वाटेवर, क्लिओपात्रा इ. त्यांच्या कादंबऱ्र्या इंग्रजीत अनुवादित झाल्या. कल्की, शून्य महाभारत, कुशाण, ओडीसी आणि यशोवर्मन या त्यांच्या तत्त्वचिंतनात्मक कादंबऱ्र्यां आहेत. कुशाणचा अनुवाद इंग्रजीत "Last of the wanderers" या नावाने आणि यशोवर्मनचा "The Jungle" या नावाने प्रसिद्ध झाला. त्यांची राणी शीबाला केंद्रीभूत धरून लिहीिलेली "The Awakening" ही इंग्रजी कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीचा मराठी अनुवादही आहे. त्यांच्या "पर्जन्य सूक्त" या काव्याचा इंग्रजीत अनुवाद झाला आणि त्यातील निवडक ८ कवितांना संगीतबद्ध करून त्याची ध्वनीिफीतही प्रसिद्ध झाली. त्यांची "असुरवेद" ही अलीकडेच प्रसिद्ध झालेली सांस्कृतिक थरारकथा आहे. त्यांची "...आणि पानिपत" ही कादंबरी सर्वावधिक गाजली. ही मराठीतील पहिली subaltern कादंबरी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेला त्यांचा [[नीतिशास्त्र]] हा नैतिक समस्यांबद्दलचा चिंतनपर ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. त्यातील काहींचे प्रयोगही झाले. ==संशोधन== त्संजय सोनवणी यांनी विश्वनिर्मितीबाबतचा स्वतंत्र सिद्धान्त "अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती" नामक स्वप्रकाशित पुस्तकात मांडला आहे. आधुनिक दुर्बिणींनी केलेल्या निरीक्षणांमधूनही या सिद्धांन्ताला पाठींिबा मिळालेला नाही. कोणत्याही मानांकित खगोल-जर्नल, प्रकाशनांमधे संशोधक आणि अभ्यासकांनी या सिद्धांम्ताची दखल घेतल्याचंे दिसत नाही. त्सोनवणी यांनी धर्मेतिहासावर "हिंदू धर्माचे शैव रहस्य" आणि "विठ्ठलाचा नवा शोध" हे ग्रंथ सिद्ध केले. अलीकडेच त्यांचा "महार कोण होते?" हा महार समाजाचा पुरातन इतिहास उलगडून दाखवणारा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. वैदिक धर्म-संस्कृतीचे उगमस्था्न या विषयावरचे Origins of the Vedic Religion and Indus-Ghuggar Civilisation हा सोनावणी यांचा ग्रंथ २०१५ साली प्रकाशित झाला.⏎ ⏎ ==वाद-विवाद== संजय सोनवणी आणि [[अनिता पाटील]] यांचे ब्लॉगवरून वैचारिक भांडण झाले. [[अनिता पाटील]] यांच्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या [[साने गुरुजी]], [[पु. ल. देशपांडे]] [[कुसुमाग्रज]] आदि नामवंत मराठी साहित्यिकांच्या समीक्षा लेखांवर सोनवणी यांनी टीका करणारे लेख स्वतःच्या ब्लॉगवर लिहिले. त्याला [[अनिता पाटील]] यांनी उत्तर दिले. अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरील एक लेखक रवींद्र तहकिक यांनीही सोनवणी यांच्या लेखावर उत्तर दिले. सोनवणी आणि [[अनिता पाटील]] हे दोन्ही ब्लॉगर पुरोगामी विचारांचे असले, तरी त्यांच्यात खूप वैचारिक मतभेद आहेत. ==पुरस्कार== पुरस्कारांसाठी लेखकाने पुस्तके पाठवणे हा लेखकाचा अपमान आहे असे त्यांचे मत असल्याने त्यांनी स्वतःवर आणि त्यांच्या प्रकाशकांवर "पुरस्कारांसाठी पुस्तके पाठवायची नाहीत." असे बंधन घातल्यामुळे त्यांना एकही साहित्य पुरस्कार मिळालेला नाही. औद्योगिक विश्वातील कामगिरीमुळे मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय व्यवसाय उत्कृष्टता ते इंदिरारत्न असे जवळपास ८ पुरस्कार मिळालेले आहेत. ==प्रकाशित साहित्य== ===थरार-कादंबऱ्र्या=== * अंतिम युद्ध (२ आवृत्त्या) * अपहरण (४ आवृत्त्या) * पराभव (३ आवृत्त्या) * ब्लडी आयलंड * महाद्वार (२ आवृत्त्या) * मृत्युरेखा (५ आवृत्त्या) * रक्तराग (२ आवृत्त्या) * वॉरटाइम (२ आवृत्त्या) * विश्वनाथ (२ आवृत्त्या) * शिल्पी (२ आवृत्त्या) ===सांस्कृतिक थरार=== ⏎ ⏎ * असुरवेद (२ आवृत्त्या) ===वैद्यकीय कादंबऱ्र्या=== ⏎ ⏎ * थेंब...थेंब मृत्यू...(३ आवृत्त्या) ===राजकीय थरार=== ⏎ ⏎ * डेथ ऑफ द प्राइममिनिस्टर (४ आवृत्त्या) * बीजिंग कॉन्स्पिरसी (२ आवृत्त्या) * ब्लॅकमेल, * रक्त हिटलरचे, (३ आवृत्त्या) ===राजकीय उपहास=== ⏎ ⏎ * आभाळात गेलेली मानसं (३ आवृत्त्या) * गुड्बाय प्राइममिनिस्टर ===ऐतिहासिक कादंबऱ्र्या=== ⏎ ⏎ * अखेरचा सम्राट (२ आवृत्त्या) *...आणि पानिपत * कुशाण (२ आवृत्त्या) * क्लिओपात्रा (७ आवृत्त्या * महाराजा [[यशवंतराव होळकर]] ===तत्त्वज्ञानात्मक कादंबऱ्र्या=== ⏎ ⏎ * कल्की (३ आवृत्त्या) * यशोवर्मन (४ आवृत्त्या) * शून्य महाभारत (२ आवृत्त्या) ===सामाजिक कादंबऱ्र्या=== ⏎ ⏎ * अखेरचे वादळ (३ आवृत्त्या) * काळोख (२ आवृत्त्या) * खळबळत्या सागरकाठी (२ आवृत्त्या) * खिन्न रात्र (३ आवृत्त्या) * विकल्प (३ आवृत्त्या) * सव्यसाची (२ आवृत्त्या) ===पौराणिक कादंबऱ्र्या=== * अश्वत्थामा (६ आवृत्त्या) * ओडीसी (३ आवृत्त्या) ===वैज्ञानिक संशोधनात्मक पुस्तक=== * अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती ===तत्त्वज्ञान=== * नीतिशास्त्र * ब्रह्मसूत्ररहस्य ===इतिहास संशोधन=== * Origins of the Vedic Religion and Indus-Ghuggar Civilisation (इंग्रजी) * भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते: महाराजा यशवंतराव होळकर * महार कोण होते? उद्गम:संक्रमण:झेप * विठ्ठलाचा नवा शोध * हिंदू धर्माचे शैव रहस्य ⏎ ⏎ ===सामाजिक/वैचारिक=== ⏎ ⏎ * कॉर्पोरेट व्हिलेज: एक गांव:एक कंपनी:एक व्यवस्थापन, * दहशतवादाची रूपे * प्रेम कसे करावे? * ब्राह्मण का झोडपले जातात? * ब्राह्मण पूर्वी कोण होते? * भारतीय ब्राह्मणांचे भवितव्य * मुंबई २६/११...पूर्वी आणि नंतर * सद्दाम हुसेन: एक झंझावात ===काव्य संग्रह=== * पर्जन्यसूक्त * प्रवासी * संतप्त सूर्य ===नाटके=== ⏎ ⏎ * गड्या तू माणूसच अजब आहेस * त्या गावाचं काय झालं? * मीच मांडीन खेळ माझा * रात्र अशी अंधारी * राम नाम सत्य है * विक्रमादित्य⏎ ⏎ ===बाल/किशोर साहित्य=== ⏎ ⏎ * नरभक्षकांच्या बेटावर विजय * अंतराळात राजू माकड * दुष्ट जोनाथनचे रहस्य * रत्नजडित खंजिराचे रहस्य * रानदेवीचा शाप * रे बगळ्यांनो * साहसी विशाल * सैतान वज्रमुख * सोन्याचा पर्वत ===इंग्रजी पुस्तके=== ⏎ ⏎ * The Awakening * Dancing with the Rains * Death of the prime minister * Heart of the Matter (Full length play) * The Jungle * Last of the wanderers * The mattalions * Monsoon Sonata (Poetry) * On the brink of Death * Origins of the Vedic Religion and Indus-Ghuggar Civilisation ⏎ * Raging Souls ⏎ ⏎ ⏎ ⏎ ===चित्रपटकथा=== * अखेरचे वादळ (निर्माणाधीन) * अमानुष: एक थरार ⏎ ⏎ ===संगीतविषयक पुस्तके=== * इट्स माय ड्रीम (संगीत-गीत) * ओ जानेजां (गीत-संगीत. गायक- नितीन मुकेश) * मनात माझ्या (गीत-संगीत-गायन) ⏎ ⏎ ⏎ ⏎ ===संकीर्ण=== * किर्लोस्कर तेआणि अन्य अनेक मासिकांत शंभरेक वैचारिक लेख. ==बाह्य दुवे== *[http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_08.html संजय सोनवणी यांनी अनिता पाटील यांना दिलेले उत्तर] *[http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_9158.html पु. ल. देशपांडे यांच्यावरील टीकेला सोनवणी यांचे उत्तर] [[वर्ग : मराठी ब्लॉगर]] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1350045.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|