Difference between revisions 1209186 and 1209193 on mrwiki

डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळा पासूनची आहे. [[जव्हार]] संस्थानचे राजे कै. यशवंतराव मुकणे यांचे वडील राजे मार्तंडराव मुकणे यांनी ही मागणी सर्वप्रथम [[इ.स. १९३२]] मध्ये  ब्रिटिश सरकारकडे केली होती. परंतु ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांनी [[इ.स. १९४२]] मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी [[चले जाव आंदोलन]] सुरू केल्याने या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर [[इ.स. १९५२]] आणि इ.स. १९५७ या काळात लोकसभेत पहिल्या लोकसभेतील खासदार कै. यशवंतराव मुकणे, कै. गोदुताई उर्फ [[गोदावरी परुळेकर]] यांनी आवाज उ(contracted; show full) दुर्दैवाने [[लालू प्रसाद यादव]] यांच्या रेल्वे मंत्री पदाचा कालावधी पुढील अर्थसंकल्पाआधीच संपला. तरीही ॲड. मुकणे निराश झाले नाहीत या वेळी मात्र त्यांनी न चुकता रेल्वे अर्थसंकल्प तयार होण्याआधीच नवनियुक्त केद्रीय रेल्वे मंत्री [[ममता बॅनर्जी]] यांची भेट घेण्याचे ठरविले आणि त्यानुसार [[राजाराम मुकणे]] यांनी १७ डिसेंबर २००९ रोजी रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांना दिल्ली येथे आदिवासी भागात रेल्वे मार्ग सुरु करण्यासाठी लेखी निवेदन दिले.<ref>[http://epaper.esakal.com/esakal/20091221/5474481243174116724.htm]
 {{मृत दुवा}} १७ डिसेंबर २००९ रोजी रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांना ॲड. [राजाराम मुकणे] यांनी लेखी निवेदन दिले.</ref>  केवळ आश्वासनाचा इतिहास असलेल्या या प्रश्नाचा पाठपुरावा करून ॲड. [[राजाराम मुकणे]] आणखी एक आश्वासन घेऊन दिल्लीहून परतले. व्यवसायाने वकील असल्याने मुकणे यांनी  [[ममता बॅनर्जी]] यांच्याकडे  या विषयाचे उत्तम सादरीकरण केले त्यामुळे या वेळी मात्र ॲड. [राजाराम मुकणे] यांच्या मागणीची रेल्वेमंत्री [[ममता बॅनर्जी]] यांनी दखल घेतली<ref>[http://epaper.esakal.com/eSakal/20100225/5400017815088012676.htm] (contracted; show full)

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}


^http://epaper.esakal.com/esakal/20091221/5474481243174116724.htm
^http://epaper.esakal.com/eSakal/20100225/5400017815088012676.htm