Difference between revisions 1336187 and 1336188 on mrwiki

{{साचा:मुखपृष्ठ सदर लेख उमेदवार}}{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = अ‍ॅन फ्रँक
| चित्र = Anne Frank.jpg
| चित्र_रूदी = 200px
| चित्र_शीर्षक = मे, इ.स. १९४२मधील अ‍ॅन फ्रँक
| जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रँक (Annelies Marie Frank)
| जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}}
| जन्म_स्थान = [[फ्रांकफुर्ट|फ्रांकफुर्ट आम माइन]], [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]]
(contracted; show full)

१ ऑगस्ट, इ.स. १९४४च्या तिच्या शेवटच्या नोंदीपर्यंत ती नियमीतपणे दैनंदिनी लिहीत होती.

== अटक ==
[[File:Hut-AnneFrank-Westerbork.jpg|thumb|alt=Taken from outside the reconstruction of a barracks, the photo shows a [[barbed wire]]fence, and beyond it a grassy area with a small timber hut|ऑगस्ट ते सप्टेंबर इ.स. १९४४ पर्यंत अ‍ॅनला ठेवण्यात आलेल्या तात्पुरच्या छावणीची करण्यात आलेली पुनर्बांधणी]]


दिनांक [[४ ऑगस्ट  ]], [[इ.स. १९४४]]च्या सकाळी अचानक ''आख्तरहाएस''वर जर्मन पोलिसांनी<ref group="टीप">ग्रून पोलिझि ({{lang-de|Grüne Polizei}} - हिरवे पोलिस) - इ.स. १९३६ ते इ.स. १९४५ दरम्यानची गणवेशधारी जर्मन पोलिस सेना. यांच्या हिरव्या गणवेशामुळे त्यांना ''हिरवे पोलिस'' म्हटले जात असे. यांचे अधिकृत नाव ''ऑर्डनंगपोलिझी'' ({{lang-de|Ordnungspolizei}}) होते.</ref> छापा घातला. एका अज्ञात खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे हा छापा घातला गेला. त्या खबऱ्या कोण होता ते अजूनही प्रकाशात आकळलेले नही आहे. <!-- {{sfn|Barnauw|van der Stroom|2003}} --> या छाप्याचे नेतृत्व [[कार्ल सिल्बरबाउर]] याने केले होते. फ्रँक कुटुंब, व्हान पेल्स कुटुंब आणि फ्रिट्झ फेफर यांना [[गेस्टापो]]<ref group="टीप">गेस्टापो ({{lang-en|Gestapo}}) - जर्मनी व जर्मनीच्या जिंकलेल्या युरोपातील प्रमुख गुप्त पोलिस सेना.</ref> मुख्यालयात नेण्यात आले. तेथे त्यांची चौकशी केली गेली व त्यांना रात्रभर तेथे ठेऊन घेतले. ५ ऑगस्टला त्यांना वेटरिंगस्खान्स({{lang-de|Weteringschans}}) येथील खच्चून भरलेल्या ''ह्युस व्हान बेवारिंग''({{lang-de|Huis van Bewaring}}) या तुरुंगात पाठवले गेले. दोन दिवसांनंतर त्यांना [[वेस्टरबॉर्क संक्रमण छावणी]]त पाठवले गेले. या छावणीतून तेव्हापर्यंत जवळपास १ लाख डच व जर्मन ज्यू लोक इतर छळछावण्यात पाठवले गेले होते. लपून बसल्यामुळे त्यांना गुन्हेगार ठरवले गेले व त्यांना शिक्षेसाठी बनविलेल्या बराकींमध्ये सश्रम कारावासात<ref group="श">सश्रम कारावास ({{lang-en|hard labour}} - हार्ड लेबर)</ref> रहावे लागले.{{sfn|म्यूलर|१९९९|p=२३३}}

व्हिक्टर कुग्लर आणि योहान्स क्लिमन यांना अटक केली गेली आणि शासनाचे शत्रू म्हणून [[अ‍ॅमर्सफूर्ट]] येथे कैदेत टाकण्यात आले. क्लिमनला सात ठवड्यांनंतर सोडून दिले गेले मात्र कुग्लर युद्धाच्या शेवटापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सश्रम कारावासात होता.{{sfn|म्यूलर|१९९९|p=२९१}} मीप खीस व बेप वोस्कुइजची उलटतपासणी घेण्यात आली व त्यांना धमकावले गेले मात्र त्यांना अटक झाली नाही. दुसऱ्या दिवशी ते ''आख्तरहाएस''वर परत आले. तिथे त्यांना अ‍ॅनची दैनंदिनी सापडली, तसेच त्यांनी काही छायाचित्रे गोळा केले. अ‍ॅन परत आल्यावर आपण ते तिला परत करू असा निर्धार मीपने केला. [[७ ऑगस्ट, ]], [[इ.स. १९४४]] रोजी ती परत कार्ल सिल्बरबाउरला जाऊन भेटली व त्याला पैसे देऊन कैद्यांना सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यासिल्बरबाउरने त्याला नकार दिला. {{sfn|म्यूलर|१९९९|p=२७९}}

== छळछावणीत रवानगी व मृत्यू ==

३ सप्टेंबर, इ.स. १९४४ रोजी त्यांना वेस्टरबॉर्कवरून [[आउश्वित्झ छळछावणी]]त पाटविण्यात आले. वेस्टरबॉर्कवरून आउश्वित्झला गेलेला तो शेवटचा गट होता. तीन दिवसांच्या प्रवासानंतर ते आउश्वित्झला पोहोचले. त्याच्या रेल्वेत मार्गो व अ‍ॅनची अ‍ॅम्स्टरडॅमच्या ज्यूइश लाएसियममधील मैत्रिण [[ब्लोइम एव्हर्स-एम्देन]] हीपण होती. <!--{{sfn|Morine|2007}} --> ब्लोइमला ते अनेकदा आउश्वित्झमध्ये दिसत <!-- {{sfn|Bigsby|2006|p=235}} --> आणि तिच्य(contracted; show full)
{{आख्तरहाएसमधील व्यक्ती}}

{{DEFAULTSORT:फ्रँक, अ‍ॅन}}
[[वर्ग:होलोकॉस्ट]]
[[वर्ग:ज्यू व्यक्ती]]
[[वर्ग:अ‍ॅन फ्रँक|*]]
[[वर्ग:इ.स. १९४५ मधील मृत्यू]]