Revision 1005340 of "सदस्य:Mahitgar" on mrwiki

खुलं खुलं आभाळ तसा..</br>
मीही खुला खुला..</br>
दारं, खिडक्या, भिंती यांची..</br>
सवय झाली तुला..</br>
:***</br>
कवी-ज्ञानेश वाकुडकर</br>
(१०/०६/२०१२)<ref>हे काव्य क्वोट करण्या करीता फेसबुक संदेशाच्या माध्य्मातून .काव्याचे कवी श्री.ज्ञानेश्वर वाकुडकर यांची अनुमती घेतली आहे.</ref>



प्रचालकांना करावयाच्या विनंत्या सुयोग्य पानावर ([[विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन]] ) जाव्यात म्हणून हे पान काही काळाकरता अर्धसुरक्षीत आहे.
*[[सदस्य:Mahitgar/मनुष्य जन तो तेने कहिए,जे पीड़ पराई जाणे रे ]]	 

नमस्कार,
	 

आपले माझ्या पानावर स्वागत आहे.नवीन सदस्यांना सहाय्य,सहाय्य पानांची निर्मिती आणि नविन सद्स्यांना येणार्‍या अडचणींचे अध्ययन या मराठी विकिपीडिया संदर्भाने आवडीच्या गोष्टी आहेत.अलिकडे माझा अधिकतम वेळ मराठी विकिपीडियाकरता फिल्डवर्क मध्ये देण्याचे ठरविलेले आहे सोबतच अलिकडे माझा बर्‍या पैकी वेळ मराठी विकि प्रकल्पांचे सहाय्य विषयक पॉवरपॉईंट सादरिकरणे बनवण्यावर व्यतीत होत असतो. त्यामुळे त्वरीत विकिपीडिया जाणत्या सदस्यांकडून त्वरीत सहाय्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपल्या सहाय्य विंनंत्या [[विकिपीडिया:मदतकेंद्र]] येथे कराव्यात.
	 

माझ्या चावडीवरील सर्व चर्चा वाचून होतातच असे नाही. तेव्हा कृपया आपल्या प्रचालन संबधीत विनंत्या शक्यतोवर [[विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन]] येथे कराव्यात.

माझ्याकडे प्रचालक आणि स्विकृती आधीकारी या मराठी विकिपीडिया समुदायाने दिलेल्या बिरुदावल्या असल्यातरी,विकिपीडियावर अधिकाधीक गोष्टी सदस्यांनी स्वतः किंवा आपापसात चर्चा करून पुढाकार घेऊन सक्रीयपणे धसास लावणे अभिप्रेत आहे.मराठी विकिपीडियाचे इतर बरेच बंधुप्रकल्प आणि सहप्रकल्प आहेत मी धरून बरेचदा प्रचालक मंडळी इतर प्रकल्पातही महत्वपूर्ण कामे करण्यात व्यस्त असू शकते.चावडी वरील चर्चांकडे प्रचालकांचे काही वेळा लक्ष न गेल्यास अथवा उत्तर देण्यास वेळ न होऊ शकल्यस गैरसमज करून घेणे टळावे. माझी विवीध लेखांमधील मजकुर संपादने आणि मतप्रदर्शने सर्वसामान्य सभासदांप्रमाणे समजावीत.
	
जो पर्यंत इतर सदस्य आणि प्रचालक काम करत असतात आणि अगदीच इमर्जंसी स्थिती नसते तो पर्यंत हस्तक्षेप करणे मी सहसा टाळत आलो आहे.अपवाद फक्त प्रताधिकार विषयक उल्लंघन आढळल्यास ते काढण्यात सक्रीय आढळू शकतो,खरे तर हेही काम पूर्न पणे सर्व सदस्यांच्या अखत्यारीतच येते, विकिपीडियाच्या धोरणामुळे तसे करण्या वाचून बर्‍याचदा प्रत्यवाय नसतो गैर समज बाळगू नयेत.

कोणतेही नवे प्रकल्प अथवा लेखन करण्यास माझ्या पूर्वसंमतीची आवश्यकता नसते, स्वतःहून पुढाकार घेण्याचे स्वागतच असते, काहीवेळा काही बाबी मराठी विकिपीडिया समुदायाच्या सहमतीने होतात यात प्रचालकीय स्तराचा सहसा काहिही हस्तक्षेप नसतो . इतर प्रचालकांचे पद हिरावण्याचे माझ्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. प्रचालकांसंदर्भातील विनंत्या संदर्भात असलेले प्रस्ताव सर्वानुमते प्रचालकांना निवेदन चावडीवर करत जावे.

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==प्रयोग==
==babel==
{{#babel: en-1| mr-0}}