Revision 1005601 of "चर्चा:गोष्टीची सुरुवात" on mrwiki

गोष्टीची सुरुवात
घटक: १ इयता:- ३ री. संयोजक: लक्ष्मण कुंडलिक वाठोरे  (अध्यापक)  विद्या मंदिर मालाईवाडा ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर पिन -४१५१०१ .
    रात्रीचे आकाश चांदन्यांमुळे किती छान दिसते. चंद्रामुळे त्याची शोभा आणखी वाढते. आपल्याला दिसतो त्यापेक्षा चंद्र खूप मोठा आहे आणि खूप खूप दूर आहे .

    एकदा काय झाले, अंतराल्यानातून दोन माणसे चंद्रावर गेली. त्यांना चंद्रावरून दूरवर निळसर रंगाचा एक गोल दिसला .तो  निळसर गोल म्हणजे आपली पृथ्वी.
आपण पृथ्वीवर राहतो. पृथ्वीवर झाडे ,प्राणी ,पक्षी आणि  माणसे आहेत .त्यांना सजीव म्हणतात .    पृथ्वीवर सर्व सजीव काही एकदम निर्माण झाले नाहीत .
    पहिले सजीव पाण्यात निर्माण झाले ,आपल्याला डोळ्यांना न दिसण्याइतके ते लहान होते .त्यांना हात ,पाय ,डोळे असे अवयव नव्हते .
खूप वर्षांनी पाण्यात तसेच जमिनीवर राहू शकणारे प्राणी निर्माण झाले .बेडूक हा त्यांपैकीच एक प्राणी होय .पुढे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी ,पक्षी ,आणि वनस्पती निर्माण झाल्या .काही प्राणी तर हत्तीपेक्षाही भलेमोठे होते ,पण हळू हळू ते नष्ट झाले जमिनीखाली खोलवर त्यांच्या हाडांचे सांगाडे सापडले आहेत .
     त्यानंतर हजारो वर्षाचा काळ उलटला .माकडासारखा एक प्राणी निर्माण झाला .त्याला शेपूट मात्र नव्हते .माकडापेक्षा त्याचे डोके मोठे होते .पाठीत बाक होता .तो दोन पायावर चालायचा .त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते .त्यांच्या अंगावर खूप केस होते .त्याच्या भुवया जाड होत्या .नाक बसके होते .जबडा रुंद होता .वर्षामागून वर्ष  गेली त्यांच्या शरीराची ठेवण हळूहळू बदलत गेली . तो ताठपणे चालू लागला .आजच्या माणसासारखा दिसू लागला .