Revision 1006586 of "अॅन फ्रॅंक" on mrwiki{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = अॅन फ्रॅंक
| चित्र = Anne Frank.jpg
| चित्र_रूदी = 200px
| चित्र_शीर्षक = मे इ.स. १९४२मधील अॅन फ्रॅंक
| जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रॅंक (Annelies Marie Frank)
| जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}}
| जन्म_स्थान = फ्रॅंकफर्ट आम माइन, [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]]
| मृत्यू_दिनांक = मार्च १९४५ (वय १५)
| मृत्यू_स्थान = बर्गन-बेलसन छळछावणी, लोवर सॅक्सोनी, नाझी जर्मनी
| राष्ट्रीयत्व= १९४१पर्यंत वायमार प्रजासत्ताक, त्यानंतर कुठलेच राष्ट्रीयत्व नाही.
| प्रसिद्ध_साहित्यकृती = ''[[द डायरी ऑफ अ यंग गर्ल]]'' (१९४७)
<!--
| प्रभाव= [[Cissy van Marxveldt]]{{sfn|Müller|1999|pp=143, 180–181, 186}}
| धर्म = Judaism
-->
| स्वाक्षरी_चित्र = Anne Frank signature.svg
}}
'''अनीस अॅन मारी फ्रॅंक''' (१२ जून इ.स. १९२९ - मार्च १९४५) ही [[हॉलोकॉस्ट|हॉलोकॉस्टला]] बळी गेलेली एक ज्यूधर्मीय होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यूधर्मीयांवर होत असलेल्या अत्याचारांपासून लपण्यासाठी अॅन व तिचे कुटुंब एका घरात लपून राहिले होते, त्या काळात तिने लिहिलेली दैनंदिनी ''[[द डायरी ऑफ अ यंग गर्ल]]'' या नावाने प्रसिद्ध झाली. त्यावर अनेक नाटके तसेच चित्रपटे बनविण्यात आले आहेत.
[[वायमार प्रजासत्ताक|वायमार प्रजासत्ताकामधील]]<ref group="टीप">[[वायमार प्रजासत्ताक]] - पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत बनलेले प्रजासत्ताक.</ref> फ्रॅंकफर्ट आम माइन (इंग्लिश: Frankfurt am Main) या शहरात तिचा जन्म झाला. पण ती आयुष्यातील बराचसा काळ [[अॅम्स्टरडॅम]], [[नेदरलॅंड्स]] येथे राहिली. ती जन्माने जर्मन होती मात्र [[नाझी जर्मनी|नाझी जर्मनीच्या]] काळातील ज्यूद्वेशी<ref group="टीप">[[ज्यूविरोध|ज्यूद्वेश]] - (इंग्लिश: anti-Semitic) दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यूधर्मीय लोकांवरील नाझी पुरस्कृत द्वेश व अत्याचार.</ref> [[नुरेमबर्ग कायदे|नुरेमबर्ग कायद्यामुळे]] फ्रॅंक परिवाराचे जर्मन राष्ट्रीयत्व काढून टाकले गेले. मरणोत्तर तिची दैनंदिनी प्रकाशित झाल्यामुळे ती जगभरात प्रसिद्ध झाली.
इ.स. १९३३मध्ये नाझी पक्षाने जर्मनीत सत्ताग्रहण केले. याच वर्षी फ्रॅंक कुटुंब जर्मनीतून अॅम्स्टरडॅमला स्थायिक झाले. मात्र इ.स. १९४०पर्यंत नाझी जर्मनीने नेदरलॅंड्सवर सत्ता मिळवली. त्यामुळे ते अॅम्स्टरडॅममध्येच अडकले. जुलै १९४२मध्ये ज्यूंची छळवणूक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यापासून वाचण्यासाठी फ्रॅंक कुटुंब ॲनचे वडील [[ऑटो फ्रॅंक]] यांच्या कार्यालयाच्या इमारतीतील दडलेल्या खोल्यांमध्ये लपले. तिथे असतांना अॅनच्या तेराव्या वाढदिवशी तिला एक कोरी वही मिळाली होती, त्यातच तिने १२ जून इ.स. १९४२ ते १ ऑगस्ट १९४४पर्यंतची दैनंदिनी नोंदवली. ते दोन वर्षे तिथेच होते, पण त्यांना विश्वासघाताने पकडण्यात आले व [[नाझी छळछावणी|नाझी छळछावणीत]]<ref group="श">[[छळछावणी]] - इंग्लिश: concentration camps(कॉन्सनट्रेशन कॅम्प)</ref> पाठवण्यात आले. अॅन व तिची मोठी बहीण [[मॅरगॉट फ्रॅंक|मॅरगॉट]] यांना नंतर बर्गन-बेलसन छळछावणीत पाठवले गेले व तिथे इ.स. १९४५मधील मार्चमध्ये दोघीही प्रलापक ज्वराने<ref group="श">[[प्रलापक ज्वर]] - इंग्लिश: typhus (टायफस)</ref> मरण पावल्या.
केवळ ऑटो फ्रॅंक यातून वाचले. युद्धानंतर अॅमस्टरडॅमला परल्यावर त्यांना अॅनची दैनंदिनी मिळाली. त्यांच्या प्रयत्नांमुळे इ.स. १९४७मध्ये ती दैनंदिनी पुस्तकरूपात प्रकाशित झाली. मूळ डच भाषेत लिहिलेल्या त्या दैनंदिनीचे इ.स. १९५२मध्ये इंग्रजीत भाषांतर झाले. नंतर अनेक भाषांमधून भाषांतर केले गेले. मराठीमध्ये [[मंगला निगुडकर]] यांनी या पुस्तकाचे भाषांतर केले आहे.
== सुरुवातीचे दिवस ==
[[File:AnneFrankMerwedeplein.jpg|thumb|alt=A four story, brick apartment block showing the building's facade, with several windows and an internal staircase leading into the block.|इ.स. १९३४ ते इ.स. १९४२ पर्यंत फ्रॅंक कुटुंब राहत असलेली इमारत.]]
अॅन फ्रॅंकचा जन्म १२ जून इ.स.१९२९ रोजी [[फ्रॅंकफर्ट]], जर्मनी येथे झाला. ती [[ऑटो फ्रॅंक]] (इ.स. १८८९ - इ.स. १९८०) व [[एडिथ फ्रॅंक|एडिथ फ्रॅंक-हॉलंडर]] यांची दुसरी मुलगी होती. तिच्या मोठ्या बहिणीचे नाव [[मर्गोट फ्रॅंक]] (इ.स. १९२६ - इ.स. १९४५) होते. फ्रॅंक कुटुंब पुरोगामी विचारसरणीचे होते, ते ज्यूधर्माचे सर्व सण व रिवाज मानत नसत. ते राहत असलेल्या फ्रॅंकफर्टच्या भागात अनेक ज्यूधर्मीय व इतर धर्माचे लोक राहत. एडिथ जास्त श्रद्धाळू पालक होती तर ऑटो यांना विद्वतप्रचूर गोष्टींमध्ये जास्त रस होता. त्यांच्याजवळ अनेक विषयांवरील पुस्तकांचा संग्रह होता. दोन्ही पालकांनी मुलींना लेखन-वाचन करण्यास प्रोत्साहन दिले.
१३ मार्च इ.स. १९३३ मध्ये फ्रॅंकफर्ट नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्या [[अडॉल्फ हिटलर]]च्या [[नाझी पक्ष|नाझी पक्षाचा]] विजय झाला. ज्यूविरोधी मोर्चे लगेचच चालू झाले. यामुळे आपण जर्मनीतच राहिलो तर आपले काय होईल याची भिती फ्रॅंक कुटुंबाला वाटू लागली. नंतर त्याच वर्षी एडिथ मुलींना घेऊन एडिथची आई रोझा हॉलंडर हिच्याकडे [[आखेन]] येथे राहण्यास गेली. ऑटो फ्रॅंक फ्रॅंकफर्टमध्येच राहिले. नंतर त्यांना अॅम्स्टरडॅममध्ये आपली कंपनी काढण्याचा एक प्रस्त्वाव मिळाला. त्यामुळे व्यवसायाची घडी नीट बसविण्यासाठी व कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी ते अॅम्स्टरडॅमला गेले. इ.स. १९३३ ते इ.स. १९३९च्या काळात सुमारे ३ लाख लोक जर्मनी सोडून निघून गेले.
== तळटीपा ==
{{संदर्भयादी|group="टीप"}}
== पारिभाषिक शब्दसूची ==
{{संदर्भयादी|group="श"}}
[[वर्ग:होलोकॉस्ट]]
[[af:Anne Frank]]
[[am:አና ፍራንክ]]
[[ar:آنا فرانك]]
[[arz:انا فرانك]]
[[be:Ганна Франк]]
[[be-x-old:Ганна Франк]]
[[bg:Ане Франк]]
[[bn:অ্যানা ফ্র্যাংক]]
[[br:Anne Frank]]
[[bs:Anne Frank]]
[[ca:Anna Frank]]
[[cs:Anna Franková]]
[[cy:Anne Frank]]
[[da:Anne Frank]]
[[de:Anne Frank]]
[[el:Άννα Φρανκ]]
[[en:Anne Frank]]
[[eo:Anne Frank]]
[[es:Ana Frank]]
[[et:Anne Frank]]
[[eu:Anne Frank]]
[[fa:آنه فرانک]]
[[fi:Anne Frank]]
[[fo:Anne Frank]]
[[fr:Anne Frank]]
[[fy:Anne Frank]]
[[ga:Anne Frank]]
[[gl:Anne Frank]]
[[he:אנה פרנק]]
[[hr:Anne Frank]]
[[hu:Anne Frank]]
[[id:Anne Frank]]
[[is:Anna Frank]]
[[it:Anna Frank]]
[[ja:アンネ・フランク]]
[[jv:Anne Frank]]
[[ka:ანა ფრანკი]]
[[ko:안네 프랑크]]
[[la:Anna Frank]]
[[lb:Anne Frank]]
[[lmo:Anna Frank]]
[[lt:Ana Frank]]
[[lv:Anna Franka]]
[[mg:Anne Frank]]
[[mk:Ана Франк]]
[[ml:ആൻ ഫ്രാങ്ക്]]
[[mn:Аннэ Франк]]
[[nl:Anne Frank]]
[[nn:Anne Frank]]
[[no:Anne Frank]]
[[pap:Anne Frank]]
[[pl:Anne Frank]]
[[pt:Anne Frank]]
[[ro:Anne Frank]]
[[ru:Франк, Анна]]
[[sh:Anne Frank]]
[[simple:Anne Frank]]
[[sk:Anna Franková]]
[[sl:Ana Frank]]
[[so:Anne Frank]]
[[sq:Anne Frank]]
[[sr:Ана Франк]]
[[sv:Anne Frank]]
[[ta:ஆன் பிராங்க்]]
[[th:อันเนอ ฟรังค์]]
[[tl:Anne Frank]]
[[tr:Anne Frank]]
[[uk:Анна Франк]]
[[vec:Ana Frank]]
[[vi:Anne Frank]]
[[wa:Anne Frank]]
[[war:Anne Frank]]
[[zh:安妮·弗蘭克]]All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?oldid=1006586.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|