Revision 1007121 of "हत्यारे बनवणारा माणूस विषय: इतिहास घटक: २ इयता: ३ री" on mrwikiहत्यारे बनवणारा माणूस विषय: इतिहास घटक: २ इयता: ३ री
संयोजक: लक्ष्मण कुंडलिक वाठोरे (अध्यापक) विद्या मंदिर मालाईवाडा ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर पिन -४१५१०१ .
माणसाची गोष्ट हजारो
वर्षापूर्वी सुरु झाली .त्या
काळातील माणसाची
राहणी आपल्या राहणीपेक्षा
अगदी वेगळी होती .सर्वत्र
घनदाट जंगल होते .माणूस
जंगलात राहत असे .जंगली
प्राण्यांपासून स्वत:चा बचाव
करण्यासाठी त्याच्याजवळ
काही साधन नव्हते.पळून
जाऊन तरी स्वत:चा बचाव
कसा करणार ? माणसापेक्षा
वेगाने पाळणारे प्राणी त्याला
सहज गाठू शकत .झाडांवर
उंच चढून बसणे हा एक
मार्ग होता, पण रात्रंदिवस
झाडावर बसून कसे
भागणार ? जगण्यासाठी
त्याला अन्न तर हवेच ना"
शेती कशी करायची हेदेखील त्याला त्या काळी माहित नव्हते.
त्यामुळे अन्नाच्या शोधात त्याला भटकावे लागे. अन्न गोळा
करणे हि त्याची महत्वाची गरज होती .
माणूस फळे आणि कंदमुळे खात असे .जनावरांचे कच्चे
मांसही खात असे. नुसत्या हातांनी या गोष्टी मिळवणे अवगड
होते.त्यासाठी त्याला काही हत्यारांचा गरज भासली .या गरजेतूनच
त्याचे लक्ष दगड, लाकूड,हाडे यांसारख्या गोष्टींकडे गेले.त्यांचा
वापर करण्यास त्याने सुरुवात केली. सापळे तयार करून त्यांमध्ये
तो प्राणी पकडत असे. तसेच दगड मारून तो प्राण्यांची शिकार
करू लागला , तेव्हा त्याच्या लक्षात आले ,की जड दगड लांबवर
फेकता येत नाहीत .गोल गोटे किंवा ओबडधोबड दगडांनी शिकार
करणे अवगड जाते .हे ध्यानात आल्यावर त्याने दगडाला
गरजेप्रमाणे आकार द्यायला सुरुवात केली.आकार दिल्यावर तो
दगड केवळ दगड उरला नाही, तर दगडाचे हत्यार बनले.
दगडांना आकार देण्यासाठी माणूस दगडांचाच वापर करत
असे .दोन दगड एकमेकांवर आपटून तो दगड फोडत असे .त्याचे
छिलके काढत असे.तासात असे .सुरुवातीला त्याने केलेली
दगडांची हत्यारे अगदी ओबडधोबड होती.पुढे वर्षानुवर्षांच्या
अनुभवांतून तो अधिक धारदार, सुबक व अणकुचीदार हत्यारे
तयार करू लागला. कोणते दगड हत्यारे करण्यास योग्य आहेत ,
हे त्याला या प्रत्नांतूनच कळू लागले. खणण्यासाठी ,कापण्यासाठी
व फेकून मारण्यासाठी उपयोगी पडतील असे वेगवेगळे आकार तो
दगडांना देऊ लागला. सहज हातात पकडता येतील, दूरवर फेकता
येतील अशी निरनिराळ्या प्रकारची हत्यारे त्याने तयार केली .
माणूस अणकुचीदार आकार दिलेले दगड लाकडी दंड्यात
बसवू लागला. त्याचा भाल्यासारखा उपयोग करू लागला. त्यामुळे
दूर अंतरांवरून जनावरांची शिकार करणे त्याला शक्य झाले .
भाला, धनुष्यबाण अशा हत्यारांच्या सहाय्याने शिकार करणे
आणखी सोपे झाले .मासेमारीसाठीही भाल्याचा उपयोग होऊ
लागला.कुऱ्हाड,कुदल.सुरी यांसारखी दगडी हत्यारे ही तो वापरू
लागला.जमिनीतील कंदमुळे काढणे ,झाडे तोडणे ,वेली कापणे
यांसाठी माणसाला हत्यारे उपयोगी पडू लागली .पुढे शेतीच्या
कामासाठी सुद्धा त्याने विविध अवजारे तयार केली .
माणसाने हत्यारे व अवजारे तयार करण्यासाठी दगडांप्रमाणे
इतर काही वस्तूंचा वापर केला .त्यांमध्ये जनावरांची हाडे ,शिंगे ,
माशांचे काटे अशा गोष्टी होत्या .त्यांपासून त्याने दाभण,बाणांची
टोके गळ यांसारखी काही अवजारे तयार केली .
पूर्वीच्या मानवाने तयार केलेली हत्यारे व अवजारे जगभर
सापडली आहेत .भारतात सुद्धा ती सापडली आहेत .
दगडी हत्यारे तयार करून माणसाने प्रगतीचे पहिले पाउल
टाकले .दगडाला 'अश्म' असे म्हणतात ,म्हणूनच या काळाचा
उल्लेख "अश्मयुग " या नावाने केला जातो .
उपक्रम:-१.घरात विविध गोष्टींची दुरुस्ती करण्यासाठी कोणती हत्यारे वापरली
जातात ,त्याची माहिती मिळावा .
२. शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची माहिती मिळावा .All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?oldid=1007121.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|