Revision 1008808 of "शेती आणि पशुपालन" on mrwikiशेती आणि पशुपालन घटक: ५ इयता: ३ री विषय: इतिहास
संयोजक: लक्ष्मण कुंडलिक वाठोरे (अध्यापक)
विद्या मंदिर मालाईवाडा ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर पिन -४१५१०१ .
मातीत बी पेरले की,रोप उगवते ,हे आपल्याला माहीत आहे .
पण अश्मयुगातील माणसाला सुरवातीला हे माहीत नव्हते .
निसर्गात अपोआप उगवलेले धान्य,कंदमुळे,फळे तो खात असे.
जमिनीवर सांडलेले धान्याचे दाणे मातीत रुजतात.त्यांना
अंकुर फुटतात .रोपे वाढतात. त्यांना कणसे येतात .हे सारे
माणसाच्या हळूहळू लक्षात आले. या गोष्टी वर्षाच्या ठरावीक
भागात म्हणजे ऋतूत होतात, हेसुद्धा त्यांच्या लक्षात आले.मग
माणसाने धान्याचे दाणे पेरण्यास सुरवात केली.
नांगरणी,पेरणी,कापणी अशा गोष्टी माणूस शिकला.अर्थात
या सर्व गोष्टी त्याला एकदम समजल्या नाहीत.त्या समजण्यासाठी
शेकडो वर्ष लागली,पिढानपिढ्या शेती करण्यातून या गोष्टींविषयीचे
माणसाचे ज्ञान वाढत राहिले.
शेतीचे काम फारच कष्टाचे होते.शेतीची बरीचशी कामे स्त्रिया
करत असत,या कामांतून माणसाला स्वत: पिकवलेले धान्य मिळू
लागले.
या वेळेपर्यंत माणूस आणखी एका गोष्ट शिकला होता,ती
म्हणजे पशुपालन.पशुपालन.पशुपालन याचा अर्थ प्राणी पाळणे.कुत्रा,
गाय,बैल,म्हैस,शेळी,मेंढी,गाढव,घोडा,उंट असे काही
प्राणी पाळायला माणसाने सुरवात केली.या प्राण्यांना आपण
पाळीव प्राणी म्हणतो. माणूस या प्राण्यांची धेखाभाल करू लागला.
काळजी घेऊ लागला.
माणसाला शिकारीसाठी आणि राखण करण्यासाठी कुत्र्याचा
उपयोग होऊ लागला.शेतीच्या कामात बैलाचा उपयोग होऊ
लागला.माणूस काही पाळीव प्राण्यांचे मांस खात असे.त्यांच्या
कातडीचा माणसाला कपड्यांसाठी उपयोग होत असे.उबदार
कपड्यांसाठी मेंढ्यांची लोकर उपयोगी पडत असे.बैल,गाढव,
घोडा,उंट अशा प्राण्यांचा उपयोग माणसाने वाहतुकीसाठीही करून
घेतला.
माणूस आता प्राण्यांच्या मदतीने शेती करू लागला. त्यामुळे
अधिक जमीन लागवडीखाली आणता आली. मोठ्या प्रमाणात
पिके घेणे शक्य झाले.माणूस धान्य साठवू लागला त्याला
आता भटकंती करण्याची गरज उरली नाही .तो शेताजवळ घरे
बांधून राहू लागला. अनेक कुटुंबे ,त्यांची घरे आणि शेते मिळून
गाव तयार झाले.लोकवस्ती वाढू लागली.गावे मोठी होऊ
लागली.शेतीमुळे माणसाला राहण्याच्या पद्धतीत खूप बदल
घडून आला.
उपक्रम:-तुमच्या घरातील कुंडीत किंवा परसबागेत दाणे टाका व खालील
गोष्टींचे निरीक्षण करा.
अंकुर फुटणे,रोप वाढणे,पाने फुटणे.
..............................................................................................
website- http://laxmanwathore.hpage.com
facebook name-"Adarsh shala"
googel serch- adarshshala.blogspot.in
Email- [email protected]
[email protected]
[email protected]
contact-9403876784
link- type "Adarsh shala"
send-9970875984
....................................................................................................All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?oldid=1008808.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|