Revision 1012098 of "उस्मानाबाद जिल्हा" on mrwiki

{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव         = उस्मानाबाद जिल्हा
|स्थानिक_नाव            = उस्मानाबाद जिल्हा
|चित्र_नकाशा            = MaharashtraOsmanabad.png
|अक्षांश-रेखांश         =  
|राज्याचे_नाव           = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव           = [[औरंगाबाद विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव                = [[उस्मानाबाद]]
|तालुक्यांची_नावे               = [[उस्मानाबाद तालुका|उस्मानाबाद]] • [[तुळजापूर तालुका|तुळजापूर]] • [[उमरगा तालुका|उमरगा]] • [[लोहारा तालुका|लोहारा]] • [[कळंब तालुका (उस्मानाबाद)|कळंब]] • [[भूम तालुका|भूम]] • [[वाशी तालुका|वाशी]] • [[परांडा तालुका|परांडा]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी            = ७,५१२
|लोकसंख्या_एकूण         = १६,६०,३११
|जनगणना_वर्ष            = २०११
|लोकसंख्या_घनता         = २२१
|शहरी_लोकसंख्या         = 
|साक्षरता_दर            = ७६.३३%
|लिंग_गुणोत्तर          = १.०८
|प्रमुख_शहरे            = 
|जिल्हाधिकार्यांचे_नाव          =डॉ.प्रवीण गेडाम
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे        = [[उस्मानाबाद (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे      = [[उमरगा विधानसभा मतदारसंघ]] • [[उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ]] • [[तुळजापूर विधानसभा मतदारसंघ]] • [[परांडा विधानसभा मतदारसंघ]]
|खासदारांची_नावे                = 	[[पद्मसिंह बाजीराव पाटील]]
|पर्जन्यमान_मिमी                = ६००
|संकेतस्थळ                      = http://osmanabad.nic.in/
}}

{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=उस्मानाबाद}}

'''उस्मानाबाद जिल्हा''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ कि.मी<sup>2</sup> आहे. त्यातील २४१ कि.मी<sup>2</sup> भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६(इ.स.२००१) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. जिल्ह्यातील 'तुळजापूर' येथील 'तुळजाभवानी' मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. 


== '''जिल्ह्याचे भौगोलिक स्थान''' ==
अक्षांश : १७.३५ ते १८.४० उत्तर
रेखांश : ७५.१६ ते ७६.४० पूर्व.

उस्मानाबाद जिल्हा हा मराठवाडयात त्याच्या नैर्‌ऋत्येला आहे. हा जिल्हा समुद्रसपाटीपासून ६०० मी. उंचीवर असून पूर्णपणे दख्खनच्या पठारात येतो. ह्या जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा नद्यांची पात्रे येतात.
उस्मानाबादच्या नैर्‌ऋत्येला [[सोलापूर जिल्हा]], वायव्येला [[अहमदनगर जिल्हा]], उत्तरेला [[बीड जिल्हा]], पूर्वेला [[लातूर जिल्हा]], व दक्षिणेला [[कर्नाटक|कर्नाटकातील]] बिदर व गुलबर्गा हे जिल्हे आहेत.

== '''जिल्ह्याचे हवामान''' ==
जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढला असून हवामान मुख्यत: कोरडे आहे. पावसाळ्याचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो. सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिलिमीटर. आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते. डिसेंबर-जानेवारी शीत हवामानाचा काळखंड  असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते. उन्हाळ्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते.
ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत. 


== '''जिल्ह्यातील तालुके''' ==
* [[उस्मानाबाद तालुका|उस्मानाबाद]],
* [[तुळजापूर तालुका|तुळजापूर]], 
* [[उमरगा तालुका|उमरगा]], 
* [[लोहारा तालुका|लोहारा]], 
* [[कळंब तालुका (उस्मानाबाद)|कळंब]], 
* [[भूम तालुका|भूम]], 
* [[वाशी तालुका|वाशी]] व 
* [[परांडा तालुका|परांडा]]

== जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ==

* [[तुळजापूर]] हे देशातील प्रसिद्ध देवस्थान आहे. [[तुळजाभवानी]] हे [[शिवाजी|छत्रपती शिवाजी]] यांचे कुलदैवत होते. हे भवानीमातेचे मंदिर उस्मानाबादपासून २५ कि.मीवर., सोलापूरपासून ४१ तर ते है्दराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथून ४० कि.मी.वर आहे. 
* [[कळंब (निःसंदिग्धीकरण)|कळंब]] हे जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.वर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे मंदिर आहे.
* [[परांडा]] हे ऐतिहासिक ठिकाण किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे.
* इतर पर्यटनस्थळे- संत गोरोबा मंदिर, धाराशिव लेणी, [[नळदुर्ग]] किल्ला, परांदा किल्ला, कुंथलगिरी येथील जैन मंदिर.
तसेच तेर (ता. उस्मानाबाद) येथील पुराण वस्तू संग्राहलय प्रसिद्ध आहे येथे उत्खननात सापडलेल्या  अनेक प्राचीन वस्तू आहेत उदा. तरंगणारी वीट

== वाहतूक ==
	राष्ट्रीय महामार्ग क्र. 9 - हैदराबाद ते मुंबई  आणि  राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 - गदग (कर्नाटक) ते बडोदा (गुजरात) हे दोन राष्ट्रीय महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातात पैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 हा उस्मानाबाद शहरातून जातो 

	उस्मानाबाद शहर रेल्वे ने जोडले आहे उस्मानाबाद हे लातूर रोड ते मिरज जंक्शन या रेल्वेमार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. उस्मानाबाद येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर,पंढरपूर, मिरज, लातूर, नांदेड,परभणी, परळी वैजनाथ, अकोला नागपूर, हैदराबाद, निजामाबाद, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत 

	उस्मानाबाद जिह्यात एस. टी. ची उत्तम वाहतूक आहे. उस्मानाबाद च्या मुख्य बस स्थानकापासून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांकडे जाण्यासाठी एस. टी. बसेस (निम आराम तसेच परिवर्तन बसेस) उपलब्ध आहेत. उस्मानाबाद बसस्थानका वरून धावणारी तुळजापूर-उस्मानाबाद-औरंगाबाद हायकोर्ट एक्सप्रेस हि महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एस.टी. बस म्हणून ओळखली जाते 
	उस्मानाबाद येथून अन्य राज्यातील मुख्यालये आणि प्रमुख शहरे  पणजी, बंगलोर, हुबळी, विजापूर, हैदराबाद, सुरत आदी ठिकाणी जाण्यासाठी  एस.टी.च्या निम आराम तसेच परिवर्तन बसेस उपलब्ध आहेत

== संदर्भ ==
* [http://osmanabad.nic.in उस्मानाबाद एन.आय.सी]
* [http://osmanabad.nic.in/html/temple.html तुळजाभवानी मंदिराची माहिती]

{{महाराष्ट्रातील जिल्हे}}

[[वर्ग:उस्मानाबाद जिल्हा]]

[[bpy:ওসমানাবাদ]]
[[ca:Districte d'Osmanabad]]
[[en:Osmanabad district]]
[[es:Distrito de Osmanabad]]
[[hi:उस्मानाबाद जिला]]
[[it:Distretto di Osmanabad]]
[[new:उस्मानाबाद जिल्ला]]
[[nl:Osmanabad (district)]]
[[no:Osmanabad (distrikt)]]
[[pl:Osmanabad (dystrykt)]]
[[pnb:ضلع عثمانآباد]]
[[ru:Османабад (округ)]]
[[sv:Osmanabad (distrikt)]]
[[te:ఉస్మానాబాద్]]
[[vi:Osmanabad (huyện)]]