Revision 1056359 of "विजय गोखले (डॉक्टर)" on mrwiki

डॉक्टर विजय गोखले हे सनबीम इन्फो, पाय सोल्यूशन्स आणि स्टर्लिंग सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे तांत्रिक दिग्दर्शक आहेत. त्यांच्याकडे आयुर्वेदातली बी.ए.एम.एस. ही पदवी आहे. त्याशिवाय त्यांनी ज्योतिषशास्त्र या विषयाचा भरपूर अभ्यास केला व नाटक(दिग्दर्शन, अभिनय) या क्षेत्रात काम केले.  डॉ.विजय गोखलेसरांनी पुण्यात  वैद्यकीय क्लासेस सुरू केले, आणि नंतर संगणक क्षेत्रात भरारी मारली.<ref> २२ फेब्रुवारी २०११, पुणे परिचय - सौ.वसुधा कर्दळे. [http://puneparichay.com/PuneParichay/22Feb2011/normal/page4.htm एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व : डॉ.विजय गोखले] (२७ सप्टेंबर २०१२ ला जसे बघितले तसे)</ref> आज सर कॉम्पुटरचे खासगी क्लासेस घेतात, त्याची कोणतीही जाहिरात ते करत नाहीत.	

सरांना भरपूर धार्मिक वाङ्‌मय मुखोद्‌गत आहे.  	
	  	
==संगणक क्षेत्र==		

११ वर्षापासून सर संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत.<ref>http://sterlingsys.com/profile.html</ref>संगणकाबद्दल कोणतेही ज्ञान नसताना स्व-मेहनतीवर त्यांनी अवघ्या दीड वर्षात संगणकाचे उत्तम ज्ञान संपादन केले. 'विरॅमिक्स' नावाची ऑपरेटिंग सिस्टिम ते बनवत आहेत. त्यांनी 'ॲपल' चा 'फायनल कट स्टुडिओ' हा पाच परीक्षा असलेला कोर्स विशेष प्रावीण्यासह पूर्ण केला आहे. असे करणारे ते भारतातीलच नव्हे तर भारतीय उपखंडातील एकमेव व्यक्ती आहेत. 'फायनल कट स्टुडिओ' हे चित्रपटांच्या संपादनासाठी वापरले जाणारे सर्वोत्कृष्ट सोफ्टवेअर मानले जाते.<ref> २२ फेब्रुवारी २०११, पुणे परिचय - सौ.वसुधा कर्दळे. [http://puneparichay.com/PuneParichay/22Feb2011/normal/page4.htm एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व : डॉ.विजय गोखले] (२७ सप्टेंबर २०१२ ला जसे बघितले तसे)</ref>या सोफ्तवेअर ची पहिली परीक्षा उत्तीर्ण  होणारे फक्त ३१ भारतीय आहेत. आणि दुसरी परीक्षा उत्तीर्ण होणारे डॉ. विजय गोखले हे एकमेव भारतीय आहेत.

==संदर्भ यादी==
{{reflist}}