Revision 1084054 of "सदस्य:Mahitgar" on mrwiki

खुलं खुलं आभाळ तसा..</br>
मीही खुला खुला..</br>
दारं, खिडक्या, भिंती यांची..</br>
सवय झाली तुला..</br>
:***</br>
कवी-ज्ञानेश वाकुडकर</br>
(१०/०६/२०१२)<ref>हे काव्य क्वोट करण्या करीता फेसबुक संदेशाच्या माध्य्मातून .काव्याचे कवी श्री.ज्ञानेश्वर वाकुडकर यांची अनुमती घेतली आहे.</ref>

==नाव आडनाव==
''माझ्यावरील टिकाकारांच्या टिकेस आदर म्हणून'' मी माझे नाव विजय आणि आडनाव सरदेशपांडे येथे नमुद करतो. '''खुलं खुलं आभाळ तसा..मीही खुला खुला..दारं, खिडक्या, भिंती यांची..सवय झाली तुला..?'''  या कवी ज्ञानेश वाकुडकरांच्या ओळींवर श्रद्धा असलेला मी, नाव लपवण्याकरिता टोपण नाव घेईन असे माझ्या वर टिकाकारांना वाटते? (''काय प्रतिक्रीया द्यावी ?''). मी माहितगार हे नाव टोपणनाव प्रसिद्धी पराङमुखतेकरीता स्विकारले होते.या गोष्टीलाही बरीच वर्षे झाली.  

त्या माझ्या आदरणीय टिकाकारांनी, आपली टिका कशा प्रकारच्या पुर्वग्रहांनी किंवा हेतुपुरस्सरते ग्रस्त आहे, या बद्दल स्वत:चे स्वत:च ''(घाई नाही, काही वर्षांनी, केले तरी चालेल)'' पण आत्मपरिक्षण जरूर करावे . माहितगारवरच्या टिकेचे परिमार्जन किंवा माहितगारवर होणारा अन्याय दूर करण्या साठी म्हणून नव्हे, तर अशा प्रकारे आपल्या वागण्यातून, आपल्याला इतरांवर अन्याय करण्याची अगदी सवयच लागून गेली असेल तर, आपल्यातला सदगृहस्थ जागा व्हावा या सदिच्छेनेच.

अर्थात सदस्यांनी मनातील गैरसमज पुर्वग्रह काही क्षणा करिता दुर ठेऊन, नाव जाहीर करण्याकरिता नावांच्या जाहीर चर्चा करण्याकरिता विकिपीडिया हे फेसबुक नव्हे  हे लक्षात घ्यावयास हवे.विकिपीडिया सारख्या मुक्त संकेतस्थळावर व्यक्तिगत पूर्वग्रह आणि पार्श्वभूमी दूर ठेऊन; ज्ञान माहिती आणि कृतींना निष्पक्षपणे, एखाद्दा नाण्याच्या परस्पर विरोधी बाजूंची पण मांडणी करावी लागू शकते.अशी मांडणी करताना काही लोकांचे पुर्वग्रह दुखावल्यास वैचारीक देवाण घेवाण करून,  मनातील गैरसमज, किल्मीषे , मोकळेपणाने दूर करून घेण्याची गरज असते. आपले पुर्वग्रह अथवा हितसंबंध दुखावले म्हणून व्यक्तिगत असभ्यता आणि चारीत्र्यहनानाचा मार्ग न्याय्य ठरतो का ? हे ज्याचे त्याने आपापल्या मनाला विचारावे. स्वत:तील सदगृहस्थास संधी देऊन सकारात्मक आणि रचनात्मक कार्य अंगिकारावे. 



कुणी मला विचारेल की मराठी विकिपीडिया मला सर्वोपरी आहे का ? माझे उत्तर प्रामाणिकपणे मराठी भाषेपेक्षा आणि माझ्या देशा पेक्षा अधिक नाही.मराठी भाषेचा ज्ञानकोशीय विकास व्हावा म्हणून  मराठी विकिपीडिया हे एक चांगले साधन आहे.मराठी विकिपीडिया चे प्रत्येक व्यक्तिकडून ज्ञान जमाकरून प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय आहे.हे ध्येय गाठण्याकरिता कार्यशाळा इत्यादींच्या माध्यमातून मराठी विकिपीडिया  पुढे न्यावा याची जेव्हा निकड व्यक्त होऊ लागली, तेव्हा मी माझ्या मातृभाषेवरील प्रेमापोटी दूर राहण्याचे टाळून पुढे आलो आणि त्यातही लवकरात लवकर, गोष्टी नविन पिढीच्या आणि शैक्षणिक क्षेत्राच्या अधीन करून दूर जाण्याचे ध्येय ठेवले.

सामाजिक काम टोपणनावाने करता येत नाही तेव्हा आवश्यक तिथे आणि गरजे पुरतेच मी माझे नाव प्रसिद्धी पराङमुखतेचा आग्रह दूर ठेऊन  वापरले किंवा वापरावे लागले. टिकाकारांचे बरेच प्रकार असतात . काही जणांना दुसऱ्यातील व्यंग हेरण्याचे कौशल्य येते.

ह्या मंडळींनां इतरांच्या चांगल्या गोष्टी त्यांना दिसत नाहीत असे नाही,क्रेडीट देऊ इच्छित नाहीत असे नाही.किंवा वाईट चिंततात असे नाही.या व्यंग शोधणाण्याचे कौशल्य असलेल्या व्यक्तींचे दोन वेगळे उपप्रकार असतात एक प्रकार असतो जो व्यंग शोधून विनोद/व्यंगचित्र इत्यादी हास्य निर्मिती साधतो .चांगल्या गोष्टीचे क्रेडीट बिडीट देण्यात वेळ गेला तर हास्यरसाच्या निर्मीतीत अडथळा येऊ शकतो. 

दुसरा उपप्रकार असतो Satire  लिहिणाऱ्यांचा  (पहा [[:en:Satire]]) .  हि मंडळी सुद्धा बऱ्याचदा व्यंग शोधून  टिका  (आणि नाट्यछटा व्यंगचित्रे इतर कला सुद्धा) करत असतात. Satire ची मंडळी सुद्धा जीथे व्यंग दिसते त्यातील चांगल्याला क्रेडीट वगैरे द्यायचे बऱ्याचदा पुढे ढकलतात, कारण लेखनाचा ओघ आणि त्याही पेक्षा टिकेची धार टिकवायची असते. यात Satire  टिकाकाराच्या सोबतीला त्याचा एखाद्दा विषयाचा गाढा अभ्यास असेल, सर्व बाजू माहित असून समिक्षणात्मक क्षमता असेल तर त्यास उत्तर देण्याकरिताही तेवढाच व्यासंगी टिकाकार किंवा समीक्षकाची गरज भासते.

बहुसंख्य लोक अशा Satire   टिकाकारांचा पटलेला भाग घेतात न पटलेला सोडून देऊन सामान्य जिवनाचे मार्गक्रमण करतात, बाकीची अल्पसंख्य पटल्यामुळे किंवा न पटल्यामुळे निरूत्तर पण पुर्गग्रहांनी वेढून अस्वस्थ झालेल्या मंडळींचे अशा टिकाकारांच्या बाजूने अथवा विरोधात  मोहोळ उठताना दिसते त्यातील थोडे काही  हळवे लोक स्वत:चे पुर्वग्रहांना अथवा हितसंबंधांना लागलेले धक्के सहन न होऊन असभ्यता, चारीत्र्यहनन आणि इतर [[उपद्रव मुल्य|उपद्रव मुल्याचा]] उपयोगाच्या भरीस पडतात . 

विकिपीडियाच्या दृष्टीने उपयूक्त, इथे एक चिनी लघू कथा सांगतो. एकदा एका चिनी एका विशीष्ट प्रकारातील मार्शल आर्ट गुरू कडे एक व्यक्ति येते .ती व्यक्ती त्या गुरूला स्वत: अवगत केलेल्या मार्शल आर्टच्या एका प्रकारातील   आपल्या क्षमते बद्दल बरेच काही सांगते आणि मला तुमच्या प्रकारचे मार्शल आर्ट शिकवाल का ? म्हणून विचारते . हा चिनी गुरू शांतपणे नकार देतो . तर ती व्यक्ति तुम्ही मला का शिकवू इच्छित नाही ? म्हणून विचारते . तो चिनी गुरू समोरच्या चहाच्या केटलीतन एक चहाचा कप शिगोशीग भरतो आणि दुसऱ्या प्रकारच्या चहाची अजून एक केटली समोरच्या त्या व्यक्तिच्या हातात देतो आणि सांगतो आता या चहाच्या कपात चहा ओत .ती व्यक्ति म्हणते हे कस काय शक्य आहे, कप आधीच भरलेला आहे, हा चहा सगळा ओसंडून वाहू लागेल . मग तो गुरू त्या व्यक्तिला समजावून  सांगतो, आपल्या सर्वांची भावनीक स्थिती गरम चहाने शिगोशीग भरलेल्या  कपा सारखी असते, आपण आधी घेतलेले ज्ञान तेवढेच परिपूर्ण आहे , तेच तेवढे बरोबर आहे असा पुर्वग्रह आपल्या मनाने करून घेतलेला असतो , मग नविन माहिती किंवा ज्ञान घेण्याकरता स्विकारण्या करता आपल्या चहाच्या कपा प्रमाणे मनातील कप्प्यात जागाच शिल्लक नसते. मग त्यात अजून चहा (माहिती/ज्ञान) ओतला तर अंहंकार पुर्वग्रह सगळ काही ओसंडून वाहू लागत.   

मुद्दा अधिक लक्षात यावा म्हणून, समस्त स्त्री वर्गाची आणि स्त्रीवादींची क्षमा मागून, एक तात्पुरता पॅरेलल ड्रॉ करतो, तुम्ही आपल्या परिचयात अशी एखादी स्त्री पाहिलेली आहे का कि जी इमोशनल होऊन एखाद्या भासमान गोष्टी बद्दल एखाद्दा व्यक्तिला रोख करून,  वरच्या गोष्टीतल्या प्रमाणे चहा ओसंडून वहात राहील अशी, खुप नकारात्मक टिकास्पद बोलत चालली आहे .अशा व्यक्तिंकडून टिकेचा एक विषय काढून घ्या किंवा बंदी घाला, त्या दुसऱ्या विषयावर त्यांची तोफ सुरू होऊन जाते. आधुनीक वैद्यकशास्त्र याला हार्मोनल चेंजेस आणि इतरही बरीच कारण सांगत , पण अशा वेळी सोबतच्या व्यक्तिंना त्यांना समजून घेण्याचाच सल्ला दिला जातो.खरेतर अशा मुलूख मैदान तोफा चालवण्याचे काम  स्त्रियाच करतात हा स्त्रि जातिवर अन्याय आहे. पुरूषही हेच काम  तेव्हढ्याच निकराने करत असतात  . समाज पुरूषाचेही गाडे हे असेच चालू असते  (येथे पुरूष या शब्दाचा अर्थ वेगळा आहे). मनातील असंतोष बाहेर व्यक्त होण्या करता सातत्याने एका खल नायकाची गरज असते.परिस्थिती अथवा घटनाजन्य असमाधानाचे प्रतिसाद, बऱ्याचादा सुयोग्य अधिकृत मार्गाने उमटून शंकांचे निरसन होत नाही, तर ते व्यक्ती व्यक्तीत अथवा समाजात निंदा नालस्तीच्या स्वरूपात प्रकट होत रहातात.एका बाजूने दोन किंवा अधिक व्यक्ती अनुपस्थीत व्यक्ती अथवा परिस्थितीबद्दल निंदाकरतात तेव्हा त्यांचे आपापसातेले भावबंध घट्ट होण्यास सहाय्यकारी होते त्याच वेळी त्याचा नकारात्मक परिणाम पूर्वग्रह आणि असंतोषास बळकटी येत जाते.       

परनिंदा सर्वसाधारण मानवी प्रवृत्ती आहे. एका सर्कल मधून माणूस सर्कल बाहेरच्या व्यक्ति किंवा समुह गटा बद्दल निंदा करतो..निंदा न करणाऱ्या कडे हा कोण मसीहा लागून गेला आहे अशा पद्धतीने वागवल न जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे सामील न होता वस्तुत: राहण कुणालाच शक्य नसत.फार फारतर क्वचीत मौन बाळगण किंवा एखाद्दा सौम्य मुद्दाकडे चर्चा वळवण असेच पर्याय उपलब्ध असतात.  परदेशात असताना सर्वजाती धर्माचे लोक एकत्र बसून स्थानिकांची निंदा कसे करतात आणि माय देशी परतल्यावर परदेश कसा चांगला होता आपल्यात (म्हणजे स्वत:त नव्हे) कोणत्या उणीवा आहेत, याच्या चर्चा सर्वत्र सर्व देशाच्या वंशाच्या जाती धर्माच्या लोकात होतच असतात. अशा चर्चांच स्वरूप साधारणत: चहाच्या कपावरच्या चर्चांच असत, मनाचा निचरा झाला की सारी मंडळी जिकडची तिकडे पांगतात.पुन्हा थोडस जगतात. तिथून उठून दुसऱ्या सर्कल मध्ये गेल की अजून तिसऱ्या बद्दल,आणि अव्याहत प्रक्रीया चालु असते .

उपरोक्त म्हटलेल्या निंदाव्यंजक चर्चातून सहसा  कोणतीही कारस्थान वगैरे होत नसतात.पण  परस्पर अविश्वासाची, असुरक्षेची  भावना; कुठे काही कारस्थान शिजतय का ? अशा स्वरूपाच्या संशयवादाला बळी पाडते.To take something with '''pinch''' ''of salt'' अशी इंग्रजीत फ्रेज आहे.ती शंका घेण्यास सांगते .मानवी असुरक्षीतता त्यातल्या शंकेच रुपांतरण  संशयात करतेच  पण शंकेच मिठ केवळ चिमुटभरच सांगितल आहे हे विसरून जाते. जेवणात मीठ जास्त झालतर काय होत तेच शंकेच प्रमाण चुकल की होत , हे मानवी स्वभाव स्विकारावयास तयार होत नाही. 




(मराठीत Satire ला व्याजोक्ति, उपरोधिका,उपहासिका इत्यादी शब्द वापले आहेत पण Satire या शब्दाच्या छटेला ते न्याय देतात का माहित नाही. [[:en:Satire]] हा इंग्रजी विकिपीडियावरील लेख याची छान माहिती देतो, माझ्यावर जे टिका करतात त्यांनी तो आवर्जुन एवढ्याकरता वाचावा की माझ्या लेखनाच्या स्ट्राँग बाजूंचा तुमचा अभ्यास चांगला व्हावा आणि तुम्हाला असभ्य आणि चारीत्र्यहननात्मक टिकेचा आधार न घेता  माझ्यावर कठोर टिका करता यावी.)  (लेखन चालू)














प्रचालकांना करावयाच्या विनंत्या सुयोग्य पानावर ([[विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन]] ) जाव्यात म्हणून हे पान काही काळाकरता अर्धसुरक्षीत आहे.
*[[सदस्य:Mahitgar/मनुष्य जन तो तेने कहिए,जे पीड़ पराई जाणे रे ]]	 

नमस्कार,
	 

आपले माझ्या पानावर स्वागत आहे.नवीन सदस्यांना सहाय्य,सहाय्य पानांची निर्मिती आणि नविन सद्स्यांना येणार्‍या अडचणींचे अध्ययन या मराठी विकिपीडिया संदर्भाने आवडीच्या गोष्टी आहेत.अलिकडे माझा अधिकतम वेळ मराठी विकिपीडियाकरता फिल्डवर्क मध्ये देण्याचे ठरविलेले आहे सोबतच अलिकडे माझा बर्‍या पैकी वेळ मराठी विकि प्रकल्पांचे सहाय्य विषयक पॉवरपॉईंट सादरिकरणे बनवण्यावर व्यतीत होत असतो. त्यामुळे त्वरीत विकिपीडिया जाणत्या सदस्यांकडून त्वरीत सहाय्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपल्या सहाय्य विंनंत्या [[विकिपीडिया:मदतकेंद्र]] येथे कराव्यात.
	 

माझ्या चावडीवरील सर्व चर्चा वाचून होतातच असे नाही. तेव्हा कृपया आपल्या प्रचालन संबधीत विनंत्या शक्यतोवर [[विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन]] येथे कराव्यात.

माझ्याकडे प्रचालक आणि स्विकृती आधीकारी या मराठी विकिपीडिया समुदायाने दिलेल्या बिरुदावल्या असल्यातरी,विकिपीडियावर अधिकाधीक गोष्टी सदस्यांनी स्वतः किंवा आपापसात चर्चा करून पुढाकार घेऊन सक्रीयपणे धसास लावणे अभिप्रेत आहे.मराठी विकिपीडियाचे इतर बरेच बंधुप्रकल्प आणि सहप्रकल्प आहेत मी धरून बरेचदा प्रचालक मंडळी इतर प्रकल्पातही महत्वपूर्ण कामे करण्यात व्यस्त असू शकते.चावडी वरील चर्चांकडे प्रचालकांचे काही वेळा लक्ष न गेल्यास अथवा उत्तर देण्यास वेळ न होऊ शकल्यस गैरसमज करून घेणे टळावे. माझी विवीध लेखांमधील मजकुर संपादने आणि मतप्रदर्शने सर्वसामान्य सभासदांप्रमाणे समजावीत.
	
जो पर्यंत इतर सदस्य आणि प्रचालक काम करत असतात आणि अगदीच इमर्जंसी स्थिती नसते तो पर्यंत हस्तक्षेप करणे मी सहसा टाळत आलो आहे.अपवाद फक्त प्रताधिकार विषयक उल्लंघन आढळल्यास ते काढण्यात सक्रीय आढळू शकतो,खरे तर हेही काम पूर्न पणे सर्व सदस्यांच्या अखत्यारीतच येते, विकिपीडियाच्या धोरणामुळे तसे करण्या वाचून बर्‍याचदा प्रत्यवाय नसतो गैर समज बाळगू नयेत.

कोणतेही नवे प्रकल्प अथवा लेखन करण्यास माझ्या पूर्वसंमतीची आवश्यकता नसते, स्वतःहून पुढाकार घेण्याचे स्वागतच असते, काहीवेळा काही बाबी मराठी विकिपीडिया समुदायाच्या सहमतीने होतात यात प्रचालकीय स्तराचा सहसा काहिही हस्तक्षेप नसतो . इतर प्रचालकांचे पद हिरावण्याचे माझ्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. प्रचालकांसंदर्भातील विनंत्या संदर्भात असलेले प्रस्ताव सर्वानुमते प्रचालकांना निवेदन चावडीवर करत जावे.

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==प्रयोग==
==babel==
{{#babel: en-1| mr-0}}