Difference between revisions 5342 and 5346 on mrwikibooksमगंलाचरण - अभंग 6 1 समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥1॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥ ब्रह्मादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥2॥ तुका ह्मणे त्याचें कळलें आह्मां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत॥3॥ 2 सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥1॥ तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥ मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥2॥ तुका ह्मणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥3॥ 3 सदा माझे डोळे जडो तुझे मूताअ । रखुमाईच्या पती सोयरिया ॥1॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥ विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥2॥ तुका ह्मणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥3॥ 4 राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥1॥ कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥ मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥2॥ कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥3॥ सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा । तुका ह्मणे जीवा धीर नाहीं॥4॥ 5 कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥1॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥ कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥2॥ गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥3॥ झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥4॥ तुका ह्मणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥5॥ 6 गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥1॥ बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥ मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥2॥ ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥3॥ उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वणिऩती पवाडे सनकादिक ॥4॥ तुका ह्मणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥5॥ ॥6॥ विराण्या - अभंग 25 7 वाळो जन मज ह्मणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥1॥ सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥2॥ नाइकें वचन बोलतां या लोकां । ह्मणे जालों तुका हरिरता ॥3॥ 8 आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । ह्मणोनि व्यभिचारा टेकलियें ॥1॥ रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥2॥ नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका ह्मणे ॥3॥ 9 हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥1॥ घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रह्म ॥2॥ बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका ह्मणे ॥3॥ 10 नाहीं काम माझें काज तुह्मांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥1॥ व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी जालें ॥2॥ न धरावा लोभ कांहीं मजविशीं । जालें देवपिशी तुका ह्मणे॥3॥ 11 विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥1॥ सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥2॥ मज आतां कोणी आळवाल झणी । तुका ह्मणे कानीं बहिरी जालें ॥3॥ 12 न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥1॥ सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां॥2॥ आळ आला होता आह्मी भांडखोरी । तुका ह्मणे खरी केली मात ॥3॥ 13 दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां । हरि या अनंता पासूनिया ॥1॥ बिळयाच्या आह्मी जालों बिळवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥2॥ तुका ह्मणे आह्मी जिवाच्या उदारा । जालों प्रीतिकरा गोविंदासी ॥3॥ 14 क्षणभरी आह्मी सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥1॥ सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिक चि परी दुःखाचिया ॥2॥ तुका ह्मणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥3॥ 15 आह्मां आह्मी आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥1॥ फावला एकांत एकविध भाव । हरि आह्मांसवें सर्व भोगी ॥2॥ तुका ह्मणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥3॥ 16 सर्व सुख आह्मी भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥1॥ याचसाठी सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥2॥ तुका ह्मणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥3॥ 17 एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥1॥ नारायणा आह्मां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभािळली ॥2॥ तुका ह्मणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥3॥ 18 हासों रुसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥1॥ सेवासुखें करूं विनोदवचन । आह्मी नारायण एकाएकीं ॥2॥ तुका ह्मणे आह्मी जालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥3॥ 19 मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥1॥ न साहवे तुह्मां या जनाची कूट । बोलती वाइऩट ओखटें तें ॥2॥ तुका ह्मणे जालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आह्मी ॥3॥ 20 शिकविलें तुह्मीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥1॥ प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥2॥ तुका ह्मणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥3॥ 21 सांगतों तें तुह्मीं अइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूं नका ॥1॥ जोंवरी या तुह्मां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥2॥ तुका ह्मणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥3॥ 22 आजिवरी तुह्मां आह्मां नेणपण । कौतुकें खेळणें संग होता ॥1॥ आतां अनावर जालें अगुणाची । करूं नये तें चि करीं सुखें ॥2॥ तुका ह्मणे आतां बुडविलीं दोन्ही । कुळें एक मनीं नारायण ॥3॥ 23 सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चि ॥1॥ सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥2॥ न व्हावी ते जाली आमुची भंडाई । तुका ह्मणे काई लाजों आतां ॥3॥ 24 मरणाही आधीं राहिलों मरोनी । मग केलें मनीं होतें तैसें ॥1॥ आतां तुह्मी पाहा आमुचें नवल । नका वेचूं बोल वांयांविण ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी भयाभीत नारी । कैसे संग सरी तुह्मां आह्मां ॥3॥ 25 परपुरुषाचें सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावें सीस ॥1॥ संवसारा आगी आपुलेनि हातें । लावूनि मागुतें पाहूं नये ॥2॥ तुका ह्मणे व्हावें तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई ॥3॥ 26 अइकाल परी ऐसें नव्हे बाई । न संडा या सोई भ्रताराची ॥1॥ नव्हे आराणुक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविलें तें ॥2॥ तुका ह्मणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशीं ॥3॥ 27 आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आह्मां तैशा ॥1॥ भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥2॥ तुका ह्मणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥3॥ 28 बहुतांच्या आह्मी न मिळों मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥1॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥3॥ 29 त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा । कठिण हें जिवा तोंचिवरी ॥1॥ मागिलांचे दुःख लागों नेदी अंगा । अंतर हें संगा नेदी पुढें ॥2॥ तुका ह्मणे सर्वविशीं हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसें ॥3॥ 30 न राहे रसना बोलतां आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥1॥ मानेल त्या तुह्मी अइका स्वभावें । मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मीं फिरावें बहुतीं । माझी तों हे गती जाली आतां ॥3॥ 31 न बोलतां तुह्मां कळों न ये गुज । ह्मणउनी लाज सांडियेली ॥1॥ आतां तुह्मां पुढें जोडीतसें हात । नका कोणी अंत पाहों माझा ॥2॥ तुका ह्मणे आह्मी बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां ॥3॥ ॥25॥ 32 नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥1॥ नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येइल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥ देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥2॥ तुका ह्मणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥3॥ 33 सावध जालों सावध जालों । हरिच्या आलों जागरणा ॥1॥ तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥ पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥2॥ तुका ह्मणे त्या ठाया । ओल छाया कृपेची ॥3॥ 34 आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥1॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ध्रु.॥ गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचें ॥2॥ तुका ह्मणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥3॥ 35 अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥1॥ देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ध्रु.॥ आपुल्या वैभवें । शृंगारावें निर्मळ ॥2॥ तुका ह्मणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥3॥ 36 सुखें वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥1॥ आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा ह्मणे भिडा ॥ध्रु.॥ निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥2॥ गेले वारीं तुह्मीं आणिली साकर । सातदी गेली साडेदहा शेर ॥3॥ अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात सा [[वर्ग:Transferable to Marathi Wikisource]]⏎ [[चित्र:उदाहरण.jpg]] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikibooks.org/w/index.php?diff=prev&oldid=5346.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|