Difference between revisions 5443 and 7169 on mrwikibooks


==चांगदेव पासष्टी==

:स्वस्ति श्रीवटेशु । जो लपोनि जगदाभासु ।
:दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥१॥

पुर्णा आणि तापी नदयांचा संगमापासून जवळच चांगदेव नावाचे गांव आहे. हे गांव ज्ञानदेवांच्या काळात वटेश्वर या नावाने ओळखले जायचे. नंतर गावाचे चांगदेव हे नांव तेथे वास्तव्य करणार्या् चांगदेवांमुळे पडले.
हे श्री वटेश चांगदेवा ! तुझे कल्याण असो. स्वतः परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवितो. तो प्रकट होतो तेव्हा जगाचा भास नाहीसा करतो. ॥१॥
(contracted; show full)हें असो आपणीया आपण । आपणचि जें ॥ ३५ ॥

जे कोणाला दृश्य न होता, स्वरूपाने द्रष्टेपणानें एकटे असते त्या ज्ञानाचे शब्दाने कितीसें वर्णन करावें? तें अद्वितीय आहे, म्हणजे आपले नातेवाईक आपणच. ॥३५॥

जें कोणाचे नव्हतेनि असणें । जें कोणाचे नव्हतां दिसणें ।
कोणाचें नव्हतां भोगणें । केवळ जो ॥ ३६ ॥

परमात्मवस्तु अस्तित्वरूपच असल्यामुळे तिचे अस्तित्व अन्य दुस
्याे कोणाच्या अस्तित्वावर अवलंबून नसते; कोणाला विषय न बनविता स्वतःच प्रकाशमान आहे आणि अन्य दुस्याह कोणत्याही भोग्य पदार्थावाचून स्वरूपाने आनंदस्वरूप आहे. ॥३६॥

तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा ।
चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥ ३७ ॥

चांगदेवा! ज्या परमात्म्याला वटेश्वर इत्यादि अनेक नामें आहेत; त्याचाच तू पुत्र आहेस. अरे कापराचा कण हा कापूररूपच असतो ना! तसा तू परमात्मस्वरूप आहेस. आत्म्यात आणि परमात्म्यात ऐक्य असते. तुझ्या माझ्यात तसा ऐक्यभाव कोणत्या रीतींने आहे ते तू आता ऐक! ॥३७॥

ज्ञानदेव म्हणे । तुज माझा बोल ऐकणें ।
(contracted; show full)
आत्म्यासंबंधी तो असा आहे, तसा आहे, एवढा आहे असे काहींच सांगता येत नाही. तें सद्‌रूप प्रकाशमय, अपरिमित आनंदाने सर्वत्र ओतप्रोत असूनही अल्पबुद्धीच्या लोकांना ते कोठेही दिसत नाही हेही एक आश्चर्य नव्हे काय! ॥६४॥

निदेपरौते निदैजणें । जागृति गिळोनि जागणें ।
केलें तैसें जुंफणें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ६५ ॥

देहामुळे उत्पन्न होणार्या।, निद्रेपलीकडचे निर्विकार परमात्मस्वरूप, देहविषयक विचारांचा नाश करणारी आत्मजागृती आणि त्या परमात्म्याचे एकत्व या ग्रंथांत विशद केले आहे, असे आमचे (ज्ञानेश्वर महाराजांचे) सांगणे आहे. ॥६५॥