Revision 5430 of "चर्चा:गाथा १ ते ३००" on mrwikibooks

तुकारामाची गाथा

== श्री निळोबारायाकृत संतश्रेष्ठ जगदगुरु श्री तुकोबारायांची आरती ==

<big>(श्री निळोबारायाकृत संतश्रेष्ठ जगदगुरु श्री तुकोबारायांची आरती)</big>
प्रपंच रचना सर्व ही भोगूनि त्यागिली ! 
अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली ! 
वैराग्याची निष्ठा प्रगटूनी दाखविली ! 
अहंता ममता दवडूनी निजशांती वरिली !!1!! 
जयजयजी स्वामी सद गुरु तुकया दातारा ! तारक तू सकळांचा जिवलग सोयरा !!धृ!!
हरीभक्तीचा महिमा विशेष वाढविला !
विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडीला ! 
जगदोद्धारालागी उपाय सुचविला ! 
निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला !!2!! 
जयजयजी स्वामी सद गुरु तुकया दातारा ! तारक तू सकळांचा जिवलग सोयरा !!धृ!!
तेरा दिवस वह्या रक्षूनीया उदकी !
कोरड्याची काढूनी दाखविल्या शेखी ! 
अपार कविता शक्ति मिरवूनी विधी अंकी ! 
कीर्तनश्रवणे तुमच्या तरिजे जन लोकी !!3!! 
जयजयजी स्वामी सद गुरु तुकया दातारा ! तारक तू सकळांचा जिवलग सोयरा !!धृ!!
बाळवेष घेवूनी श्रीहरी भेटला ! 
विधीचा जनिता तूचि आठव हा दिधला ! 
तेणे ब्रह्मानंदे प्रेमा रूढविला ! 
न तुके म्हणूनी तुका नामे गौरविला !!4!! 
जयजयजी स्वामी सद गुरु तुकया दातारा ! तारक तू सकळांचा जिवलग सोयरा !!धृ!!
प्रयाणकाळी देवें विमान पाठविले !
कलीच्या काळामाजी अद्भूत वर्तले ! 
मानव देह घेऊनी निजधामा गेले ! 
निळा म्हणे सकळ संता तोषविले !!5!! 
जयजयजी स्वामी सद गुरु तुकया दातारा ! तारक तू सकळांचा जिवलग सोयरा !!धृ!!