Difference between revisions 131541 and 131542 on mrwikisource<header> निश्चयाचा महामेरू | </header> निश्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी परोपकाराचीया राशी | उदंड घडती जयासी तयाचे गुण महत्वासी | तुळणा कैची नरपति, हयपति, गजपति | गडपति, भूपति, जळ पति पुरंदर आणि शक्ती | पृष्टभागी यशवंत, किर्तीवंत | सामर्थ्यवंत, वरदवंत पुण्यवंत नीतिवंत | जाणता राजा आचारशील विचारशील | दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील | सकळा ठायी धीर उदार गंभीर | शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर | तुच्छ केले तीर्थक्षेत्रे मोडिली | ब्राम्हण्स्थाने भ्रष्ट झाली सकाळ पृथ्वी आंदोळली | धर्म गेला देव धर्म गोब्राम्हण | करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण | प्रेरणा केली उदंड पंडित पुराणिक | कवीश्वर याज्ञिक वैदिक धूर्त तार्किक सभानायक | तुमच्या ठायी या भू मंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही | तुम्हा कारणे आणिकही धर्मकृत्ये चालती | आश्रित होउन कित्येक राहती धन्य धन्य तुमची कीर्ती | विश्वी विस्तारली कित्येक दुष्ट संहारिले | कित्येकासी धाक सुटले कित्येकासी आश्रय जाहले | शिवकल्याण राजा तुमचे देशी वास्तव्य केले | परंतु वर्तमान नाही घेतले ऋणानुबंधे विस्मरण जाहले | काय नेणो सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती | सांगणे काय तुम्हाप्रती धर्मसंस्थापनेची कीर्ती | सांभाळली पाहिजे उदंड राजकारण तटले | तेणे चित्त विभागले प्रसंग नसता लिहीले | क्षमा केली पाहिजे⏎ ⏎ प्रौढप्रतापपुरंदर, गोब्राम्हणप्रतिपालक, मुघलदल संहारक, भोसलेकुलदीपक, विमलचरीत, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikisource.org/w/index.php?diff=prev&oldid=131542.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|