Difference between revisions 3087 and 32432 on mrwikisource

{{header
 | शीर्षक      = {{लेखनाव}}
 | साहित्यिक     = 
 | विभाग  =
 | मागील   = 
 | पुढील       =  
 | वर्ष       = 
 | टिपण      = 
}}

नारायण नागबली

==पान नं १==


॥ श्री ॥

॥ श्री त्र्यंबकेश्वर प्रसन्नोस्तु ॥

नारायण नागबली : संततीदायक व पीडानिवारक

नारायणबली व नागबली विधी

हे दोन विधीचे नांव आहे. श्रीमन्नारायणादि पंचदेवतांना उद्देशून अतिश्रद्धेने दिलेले समंत्रक ओ विधीयुक्त असे जे अन्नोदक द्रव्यादी त्यास नारायणबली असे म्हणतात. 

अष्टनागांना उद्देशून त्याचे समाधानाकरिता श्रद्धेने दिलेले समंत्रक विधीयुक्त, तिल, दर्भ, अन्नोदक, दूध इत्यादि अर्पण करणे यांस नागबली असे म्हणतात. या दोन्ही विधीस धर्मशास्त्रात ++ सकामश्राद्ध असे संबोधले आहे. शास्त्रकारांनी + पुत्रप्राप्ती, संततीस सौख्य, दुर्धर शरीर पीडा व योगक्षेमात वारंवार व्यत्यय येणे ह्या ज्या मानवी जीवनात येणाऱ्या अप्रिहार्य अडचणी आहेत यांचा परिहार होण्यासाठी हा विधी प्रामुख्याने करावा असे सांगितले आहे. 

++ प्रेतोपद्रव्यादि संतंतीप्रतिबंधशरीरपीडानाशकत्वात सकामश्राद्ध भण्यते । ( गो. वि. दर्श )
+ कृते गर्भाधाने यदि गर्भोत्पत्यभावो मृतापत्या वा तदा प्रतिबंधक प्रतोपद्रवनिवृत्यर्थ नारायणबलीर्नांगबलिश्च कार्य । 

 

देशनिर्णय
उपायांची यथार्तता
अपत्यांचे महत्त्व
पिशाच्चबाधा निवारण
सर्पवध दोष
मानव व सर्प उत्पत्ती साम्य
ज्योतिष-शास्त्राप्रमाणे
मुहुर्त विचार
उत्तम दिवस व नक्षत्र
नारायण नागबली कर्माचे अधिकारी
स्थलवर्णन
धार्मिक खर्च
पूर्व तयारी
कुशावर्त तीर्थावरील विधी
प्रधान संकल्प
संकल्पाचा अर्थ
नारायणबली विधी
बलिप्रदान
 
 

==पान नं २==
देशनिर्णय :- हा विधी श्रीक्षेत्र त्र्यंबकेशोअर येथेच फक्त केला जातो. आज हजारो वर्षांची * परंपरा व शास्त्रप्रामाण्य या दोन्ही गोष्टी मुळेच येथे ह विधी करतात. ``निर्णयसिंधु'' या ग्रंथात नारायण नागबली हे सकाम श्राद्ध त्र्यंबकेश्वराच्या भूमीशिवाय इतरत्र करु नये असे स्पष्ट सांगितले आहे. ( नि. सिं. पान ४१४ पहा) याचे कारण शास्त्रकारांनी असे सांगितले आहे की ** ब्रम्हगिरीपर्वत हे पृथ्वीतलावर शंकराचे आद्य स्वरुप आहे. त्या ब्रम्हगिरीपासूनच पतितपावनी गौतमी गंगेचा उगम झाला आहे. भूतनाथ महामृत्युं(contracted; show full)
चरुपात्र, पाच कलश, पांच तबकड्या, तांब्या, भांडे, पळी, तीन ताम्हने, पांच गोमुख्या, पांच धोतरे, पांच आसने, चार देवतांच्या मूर्ती, ( सुवर्ण, ताम्र, रजत, लोह) होमाकरिता तुप, तांदूळ एक शेर, पळसाच्या काड्या, समिधा, शुभा (गोवऱ्या) पंचवीस, तीळ, जव, फुले, पुष्पमाला पंचामृतयुक्त पूजेचे सामान , सुगड, स्वयंपाकरिता साहित्य, जानवी दोन, द्रोण दहा, पत्रावळी दहा, दर्भ, कणीक एक शेर, सर्वीषधी सामान. 

{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]