Revision 123759 of "निश्चयाचा महामेरु" on mrwikisource{{शीर्ष
| शीर्षक = निश्चयाचा महामेरु
| साहित्यिक = रामदास स्वामी
| विभाग =
| मागील = = [[शिवराजास आठवावें]]
| पुढील =
| वर्ष =
| टिपण =
}}
[[साहित्यिक:रामदास स्वामी|समर्थ रामदास स्वामींचे]]
मार्च १६७२ मध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करणारं अन त्यांच्या महान कार्याचं कौतुक करणारं हे अनमोल पत्र महाराजांना आलं. कोणी पाठवलं ? महाराजांचं इतक्या सार्थ शब्दांत वर्णन करणारा हा एक वैरागी होता ! समर्थ रामदास स्वामी ! शिवरायांचं सार्थ शब्दात वर्णन करणाऱ्या समकालीन व्यक्ती, त्यातही मराठी व्यक्ती या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आहेत. समर्थांनी ओवीरूप पत्रातून साक्षात शिवराय आपल्यासमोर उभे केले. महाराष्ट्राचा हा राजा होता कसा? तर असा-
<poem>
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी ॥
परोपकाराचिया राशी । उदंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्वासी । तुळणा कैंची ॥
नरपती, हयपती, गजपती । गडपती, भूपती, जळपती ।पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागी ॥
यशवंत, कीर्तिवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत ।
पुण्यवंत, नीतिवंत । जाणता राजा ॥
आचारशीळ, विचारशीळ । दानशीळ, धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळांठायी ॥
धीर, उदार, गंभीर । शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
तीर्थक्षेत्रे मोडीली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥
देव धर्म गोब्राह्मण । करवाया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥
उदंड पंडित, पुराणीक । कवीश्वर, याज्ञिक, वैदीक।धुर्त, तार्कीक सभानायक । तुमचें ठायी ॥
या भूमंडळाचे ठायी । धर्म रक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्रधर्म राहीला काही । तुम्हांकरीता ॥
आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कित्येक असती ।धन्य धन्य तुमचीं कीर्ति । विश्वी विस्तारली ॥
कित्येक दुष्ट संहारीले । कित्येकांस धाक सुटले ।
कित्येकांस आश्रयो जाले । शिवकल्याण राजा ॥
तुमचे देशी वास्तव्य केले । परंतू वर्तमान नाही घेतले ।ऋणानुबंधे विस्मरण जाहले । काय नेणो ॥
सर्वज्ञ मंड्ळी धर्ममूर्ति । काय सांगणे तुम्हांप्रती ।
परी धर्मस्थापनेची कीर्ति । सांभाळली पाहीजे ॥
उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागिले ।
प्रसंग नसतां लिहीले । क्षमा केली पाहिजे ॥
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]
[[वर्ग:रामदास स्वामी यांचे साहित्य]]All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikisource.org/w/index.php?oldid=123759.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|