Revision 3196 of "गणेश चतुर्थी व्रत/गणेश चतुर्थी व्रत" on mrwikisource

{{header
 | शीर्षक      = {{लेखनाव}}
 | साहित्यिक     = 
 | विभाग  =
 | मागील =   [[गणेश चतुर्थी व्रत/श्रीगणेशव्रतांची माहिती]]
 | पुढील       = [[गणेश चतुर्थी व्रत/विनायक चतुर्थी व्रत]]
 | वर्ष       = 
 | टिपण      = 
}}
<poem>
पूजेची मांडणी
क्रयसाहित्य - फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, शमीची पाने, विड्याची पाने १०, सुपार्‍या ५, बदाम ५, खारका ५, नारळ २,
फळे/केळी ५,
पेढे ५/खडीसाखर, अत्तरफाया, जानवे १, पंचखाद्य, गणपतीसाठी विविध आभूषणे व आरास करावयाचे साहित्य.
वायनदानसाहित्य - एका पत्रावळीवर १० मोदक, पानसुपारी व नाणे.
पत्री (पत्रपूजेतील क्रमानुसार ) - मधुमालती, माका,बेल, पांढर्‍या दुर्वा, बोर, धोतरा, तुळस, आघाडा, शमी, केवडा,
कण्हेर, आपटा, रुई, अर्जुनसादडा, डोरली, डाळिंब, देवदार, मरवा, निर्गुंडी, जाई, अगस्त्य.
गृह्यसाहित्य - हळदकुंकू, चंदनगंध, अष्टगंध, सिंदूर, गुलाल, बुक्का, अक्षता, रांगोळी, उदबत्ती, कापूर, आगपेटी,
सुटीनाणी ५, तुपाच्या व तेलाच्या वाती, कापसाची मालावस्त्रे - २१ मण्यांचे १, अलंकार, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) गूळखोबरे, २१ मोदकांसहित महानैवेद्य, चौरंग/पाट, आसन, पाण्याचा कलश, शंख, घंटा, समई, नीराजने, कापूरारती, पळीपंचपात्र, ताम्हण, हातपुसणे, तसराळे.
पूजार्ह देवता - गणेश (मृत्तिकेची गणेशमूर्ती)
पूजाकाल - भाद्रपद शु. चतुर्थीस प्रथम प्रहरी पूजा करावी.
कालावधी - ही पार्थिवपूजा असल्यामुळे महानैवेद्यानंतर लगेचच मूर्तीविसर्जन होणे शास्त्रसंमत आहे. तथापि इच्छेनुसार/कुलाचारानुसार दहा दिवसांपर्यंत विसर्जन करणे रूढीसंमत आहे.
व्रतोद्देश - गृहसौख्य.
व्रताचार - ह्या कालावाधीत गणेशाथर्वशीर्षाची आर्वतने व हवन, गणेश - सहस्रनामावलीचे पठन, गणेशपुराणाचे वाचन, स्यमंतकोपाख्यानाचे पठन, मंत्रपुष्प इत्यादी धार्मिक, तसेच नृत्य, गीत इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
टीप - ह्या दिवशी चंद्रदर्शन घडू नये. तथापि आकस्मिकपणे चंद्रदर्शन घडल्यास तद्दोषपरिहारार्थ;
सिंह: प्रसेनमवधीत् सिंहो जांबवता हत: । सुकुमारक मा रोदीस् तव ह्येष स्यमंतक: ॥'
ह्या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
 
॥ अथ पूजाप्रारंभ: ॥
(पूजकाने प्रथम कुंकुमतिलक करून घ्यावा. घरातील अन्य व्यक्तींनीही कुंकुमतिलक करून घ्यावा. त्यानंतर घरातील देवांसमोर विडे ठेवून, अक्षता व हळदकुंकू वाहून नमस्कारपूर्वक प्रार्थना करावी. तसेच घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून पूजेस पूजाप्रारंभ करावा. )

*
॥अथ आचनम् ॥
प्रत्येकाने आचमन करावे. त्या वेळी उजव्या हाताची गोकर्णमुद्रा करून डाव्या हाताने पळीने पात्रातील पाणी घेऊन खालीलपैकी पहिल्या तीन मंत्रांनी पाणी प्राशन करावे. 

ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: ।

उजव्या हातावरुन पळीने ताम्हणात पाणी सोडून हस्तशुद्धी करावी. हात जोडा.

ॐ गोविंदाय नम: ।  ॐ विष्णवे नम: । 
ॐ मधुसूदनाय नम: । ॐ त्रिविक्रमाय नम: । 
ॐ वामनाय नम: । ॐ श्रीधराय नम: । 
ॐ ह्रषीकेशाय नम: । ॐ पद्मनाभाय नम: । 
ॐ दामोदराय नम: । ॐ संकर्षणाय नम: । 
ॐ वासुदेवाय नम: । ॐ प्रद्युम्नाय नम: । 
ॐ अनिरुद्धाय नम: ।  ॐ पुरुषोत्तमाय नम: । 
ॐ अधोक्षजाय नम: । ॐ नारसिंहाय नम: । 
ॐ अच्युताय नम: । ॐ जनार्दनाय नम: । 
ॐ उपेंद्राय नम: । ॐ हरये नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: ॥

॥ अथ पवित्रधारणम् ॥
खालील मंत्राने उजव्या हाताच्या करंगळीशेजारील अनामिकेत सोन्याचे, चांदीचे, तांब्याचे किंवा दर्भाचे पवित्रक धारण करावे. पवित्रक उपलब्ध नसल्यास हातात पवित्रक आहे असे मानून अनामिकेस अंगठ्याने स्पर्श करावा व पुढील मंत्र म्हणावा. 

ॐ पवित्रं ते विततं ब्रह्मणस्पते प्रभुर् गात्राणि पर्येषि विश्वत: । 
अतप्ततनूर् न तदामो अश्‍नुते शृतास इद्वहंतस् तत् समाशत ॥

॥ अथ प्राणायाम: ॥
वैदिक गायत्रीमंत्राने वा 
यो देव: सवितास्माकं धियो धर्माधिगोचरे । प्रेरयेत् तस्य तद् भर्गस् तद् वरेण्यमुपास्महे ॥

ह्या पुराणोक्त गायत्रीमंत्राने अथवा आपापल्या इष्टदेवतेच्या नाममंत्राने खालीलप्रमाने प्राणायाम करावा. 

    पूरक - उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवून डाव्या नाकपुडीने श्वास घेत मनातल्या मनात उपरोक्त मंत्र एकदा म्हणावा.
    कुंभक - उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी आणि करंगळी व अनामिकेने डावीही नाकपुडी दाबून तोच मंत्र चारदा म्हणावा.
    रेचक -उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढून उजव्या नाकपुडीने श्‍वास सोडत तोच मंत्र दोनदा म्हणावा.

हात जोडा. 

॥ अथ देवतावंदनम् ॥
श्रीमहागणाधिपतये नम: । लक्ष्मीनारायाणाभ्यां नम: । 
उमामहेश्वराभ्यां नम: । शचीपुरंदराभ्यां नम: । 
मातापितृभ्यां नम: । इष्टदेवताभ्यो नम: । 
कुलदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम: । 
स्थानदेवताभ्यो नम: । वास्तुदेवताभ्यो नम: । 
आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नम: । सर्वेभ्यो देवेभ्यो नम: । 
सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम: । एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नम: । 
अविघ्नमस्तु । सुमुहूर्तमस्तु ॥ 

सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णक: । लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिप: ॥१॥ 
धूम्रकेतुर्‌ गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन: ।  द्वादशैतानि नामानि य: पठेच्छृणुयादपि ॥२॥ 
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे संकटे चैव विघ्नस् तस्य न जायते ॥३॥ 
शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम् । प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशांतये ।४॥ 
सर्वमांगल्येमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥५॥
सर्वदा शुभकार्येषु नास्ति तेषाममंगलम् । येषां ह्रदिस्थो भगवान् मंगलायतनं हरि: ॥६॥
तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ॥७॥ 
यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: । तत्र श्रीर् विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर् मतिर् मम ॥८॥
लाभस् तेषां जयस् तेषां कुतस् तेषां पराजय: । येषामिंदीवरश्यामो ह्रदयस्थो जनार्दन: ॥९॥
विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् । सरस्वतीं प्रणौम्यादौ शुभकार्यार्थसिद्धये ॥१०॥
अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो य: सुरासुरै: । सर्वविघ्नहरस् तस्मै गणाधिपतये नम: ॥११॥
शुभेष्वारब्धकार्येषु त्रयस् त्रिभुवनेश्वरा: । देव दिशंतु न: सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दना: ॥१२॥
॥ अथ देशकालनिर्देश: ॥

पंचांग (MyPanchangam) पाहून 'श्रीमद्‌भगवतो०' इ. विस्तृत देशकालानिर्देश करावा. किंवा पुढील श्लोक म्हणून संक्षिप्त देशकालनिर्देश करावा. 

तिथिर् विष्णुस् तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च । योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् ॥ 
एवंगुणविशेषणविशिष्टायां................ 

॥ अथ संकल्प: ॥
(उजव्या हातात अक्षता घेऊन पुढील संकल्प म्हणावा.) अद्य शुभतिथौ.... (गोत्राचे नाव. 'काश्यप' .) गोत्रोत्पन्नस्य ( विवाहितेने गोत्राया.) ........ (स्वत:चे व्यावहारिक नाव) नाम्न: (स्त्रीने नाम्न्या:) मम आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां सकलपापक्षय - समस्तशत्रुभ्य - निरसनपूर्वकं क्षेम - स्थैर्य - दीर्घायु: - आरोग्य - विद्या - विजय - ऎश्वर्य - अभिवृद्ध्यर्थं गृहसौख्य - मनस:शांति -सर्वकर्मनिर्विघ्नता- सिद्ध्यर्थं - पार्थिव -श्रीसिद्धिविनायकप्रीत्यर्थं प्रतिसंवत्सरविहितं यथाज्ञानेन यथामीलितोपचारद्रव्यै: ध्यानावाहनादि-षोडशोपचार-पूजनपूर्वकं च गणेशचतुर्थीव्रतं करिष्ये ।
(पळीने उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.)
तदंगत्वेन आसनादिकलशाद्यर्चनं करिष्ये ।
(एक पळी पाणी सोडावे.)
आदौ निर्विघ्नतासिद्धयर्थं महागणपतिस्मरणं (पूजनं वा) च करिष्ये ॥
(एक पळी पाणी सोडावे.)
वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा ॥
ऋद्धि-सिद्धि-बुद्धि-शक्ति-सहित-श्रीमहागणपतये नम: । निर्विघ्नं कुरु ॥
(गणपतीस मनोमन नमस्कार करावा. )
 

   *

 ॥ अथ गणपतिपूजनम् ॥

    ताम्हणातील तसेच पात्रातील अगोदरचे आचमनाचे व संकल्पाचे पाणी तसराळ्यात ओतून ताम्हण व पळीपात्र स्वच्छ करून घ्यावे.
    मुख्यदेवतेच्या डाव्या बाजूस तांदूळपुंजावर चांगली मोठी सुपारी किंवा नारळ गणपती म्हणून ठेवावा. गणपती म्हणून स्थापलेल्या नारळाची शेंडी आपल्याकडे करावी. एरवी फळ म्हणून मांडलेल्या नारळाची शेंडी देवाकडे असते.
    गणपती पूगीफलावर म्हणजेच सुपारीवर स्थापन केलेला असेल तर स्नानादी उपचारांसाठी तो ताम्हणात घेता येतो , पण गणपतीची स्थापना नारळावर केलेली असेल तर तो ताम्हणात घेता येत नाही. अशा वेळी फुलाने शुद्धोदक प्रोक्षण करून पाद्यादी उपचार करावेत.
    पतिपत्‍नी पूजेस बसले असतील तर पत्‍नीने गणेशपूजनादी उपपूजांच्या , नामपूजादी गौणपूजांच्या व मुख्यदेवतापूजनाच्या प्रत्येक उपचाराच्या वेळी पतीच्या उजव्या हातास आपला उजवा हात लावावा. हळदकुंकू मात्र पत्‍नीने स्वत: वाहावे.
    मंत्रपुष्प व प्रार्थनापुष्प दोघांनी स्वतंत्रपणे वाहावीत , पत्‍नी उपस्थित नसेल तर पूजकानेच सर्व उपचार करावेत.


वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरू मे देव शुभकार्येषु सर्वदा ॥ 
श्रीमहागणपतये नम: । अस्मिन् पूगी (नारिकेल वा ) फले ऋद्धिबुद्धिसिद्धिसहितं 
श्रीमहागणपतिं सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकं ध्यायामि । 
ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि ॥ 
गणपतीवर अक्षता वाहाव्यात. 
श्रीमहागणपतये नम: । आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि ॥ 
अक्षता वाहाव्यात. 
श्रीमहागणपतये नम: । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ॥ 
अक्षता वाहाव्यात. सुपारीवर गणपती स्थापन केला असल्यस सुपारी ताम्हणात काढून घ्यावी. नारळावर असल्यास नारळ जागेवरून हलवू नये. 
श्रीमहागणपतये नम: । पादयो: पाद्यं समर्पयामि ॥ 
एक पळी शुद्धोदक घालावे. गणपती नारळावर असल्यास फक्त फुलाने शुद्धोदक प्रोक्षण करावे. 
श्रीमहागणपतये नम: । हस्तयो: अर्घ्यं समर्पयामि ॥ 
पळीतील जलात गंध , फूल , अक्षता घालून ते जल गणपतीवर घालावे/प्रोक्षण करावे. 
श्रीमहागणपतये नम: । आचमनीयं समर्पयामि ॥ 
तीन पळ्या शुद्धोदक घालावे/प्रोक्षण करावे. 
श्रीमहागणपतये नम: । स्नानीयं समर्पयामि ॥ 
स्नान घालून व पुसून गणपतीची सुपारी पहिल्या जागी ठेवावी. 
सुप्रतिष्ठितमस्तु ॥ 
गणपतीवर अक्षता वाहाव्यात. 
श्रीमहागणपतये नम: । 
वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं (अक्षतान् वा) समर्पयामि ॥ 
२१ किंवा ५ मण्यांचे कापूसवस्त्र घालावे अथवा अक्षता वाहाव्यात. 
श्रीमहागणपतये नम: । 
यज्ञोपवीतं (यज्ञोपवीतार्थे अक्षतान् वा) समर्पयामि ॥ 
आचमनीयं समर्पयामि ॥ 
जानवे किंवा अक्षता वाहाव्यात. एक पळी पाणी गणपतीस दाखवून ताम्हणात सोडावे. 
श्रीमहागणपतये नम: । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ॥ 
गणपतीस अनामिकेने गंध लावावे. 
श्रीमहागणपतये नम: । सिंदूरं नानापरिमलद्रव्याणि च समर्पयामि ॥ 
गणपतीवर सिंदूर वाहावा व हात धुवावा. तसेच अष्टगंध , गुलाल , बुक्का इत्यादी सुगंधी द्रव्ये वाहावीत. 
ऋद्धिबुद्धिसिद्धिशक्तिभ्यो नम: । हरिद्राकुंकुमं समर्पयामि ॥ 
गणपतीच्या दोन्ही बाजूंस हळदकुंकू वाहावे.
श्रीमहागणपतये नम: । अलंकारार्थे रक्ताक्षतान् समर्पयामि ॥ 
कुंकुमाक्षता वाहाव्यात. 
श्रीमहागणपतये नम: । रक्तपुष्पं शमीपत्रं दूर्वांकुरांश्च समर्पयामि ॥ 
लाल फूल , शमी व दूर्वा वाहाव्यात. दूर्वा वाहताना जुडी सोडून त्यांचे देठ हळदकुंकवांनी लिप्त करावेत. दूर्वांचे देठ देवाकडे करावेत. उदबत्ती व नीराजन लावून ठेवावेत. 
श्रीमहागणपतये नम: । धूपमाघ्रापयामि ॥ 
गणपतीस उदबत्ती ओवाळावी. घंटा वाजवावी. 
श्रीमहागणपतये नम: । दीपं दर्शयामि । एकार्तिक्यं समर्पयामि ॥ 
तुपाचे नीराजन ओवाळावे. घंटा वाजवावी. 
श्रीमहागणपतये नम: । गुडखाद्यनैवेद्यं समर्पयामि ॥ 
गणपतीसमोरील गूळखोबर्‍याच्या नैवेद्याभोवती पाणी फिरवावे. 
सत्यं त्वर्तेन परिषिंचामि ॥ ऋतं त्वा सत्येन परिषिंचामि ॥
एक पळी पाणी गणपतीस दाखवून ताम्हणात सोडावे. 
अमृतोपस्तरणमसि ॥ 
ग्रासमुद्रा करून गूळखोबर्‍याचे घास मनोमन गणपतीस दाखवावेत. 
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । 
ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ॥ 
एक पळी पाणी गणपतीस दाखवून ताम्हणात सोडावे. 
प्राशनार्थे पानीयं समर्पयामि ॥ 
ग्रासमुद्रा करून गूळखोबर्‍याचे घास गणपतीस मनोमन दाखवावेत. 
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । 
ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ॥ 
चार पळ्या पाणी गणपतीस दाखवून ताम्हणात सोडावे. 
अमृतापिधानमसि - उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । 
मुखप्रक्षालनं समर्पयामि । आचमनीयं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि । 
आचमनीयं समर्पयामि ॥ करोद्वर्तनं (करोद्वर्तनार्थे चंदनं वा) समर्पयामि ॥ 
फुलास अत्तर किंवा गंध लावून ते गणपतीवर वाहावे. 
श्रीमहागणपतये नम: । नानाविधफलानि समर्पयामि ॥ 
बदाम , खारीक , फळ , केळे व नारळ इत्यादी फळांवर अक्षता वाहून एक पळी पाणी ताम्हणात सोडावे. 
श्रीमहागणपतये नम: । मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामि ॥ 
विड्यावर अक्षता वाहून ताम्हणात एक पळी पाणी सोडावे. 
श्रीमहागणपतये नम: । दक्षिणां समर्पयामि ॥ 
दक्षिणेवर अक्षता वाहून एक पळी पाणी ताम्हणात सोडावे. 
श्रीमहागणपतये नम: । महानीराजनदीपं समर्पयामि ॥ 
नीराजन ओवाळावे. घंटा वाजवावी. ओंजळीत अक्षता व फुले घ्यावीत. 
श्रीमहागणपतये नम: । नमस्कारान् समर्पयामि ॥ 
गणपतीस साष्टांग नमस्कार करावा. 
श्रीमहागणपतये नम: । प्रदक्षिणां समर्पयामि ॥ 
स्वत:भोवती प्रदक्षिणा करावी. 
( ॐ नि षु सीद०) अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो य: सुरासुरै: । 
सर्वविघ्नहरस् तस्मै गणाधिपतये नम: ॥ 
श्रीमहागणपतये नम: । मंत्रपुष्पं समर्पयामि ॥ 
गणपतीवर अक्षता व फुले वाहून नमस्कार करावा. पुन्हा ओंजळीत अक्षता व फुले घेऊन पुढील प्रार्थना म्हणावी. 
कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि । 
विघ्नानि नाशमायांतु सर्वाणि सुरनायक ॥   प्रार्थनापुष्पं समर्पयामि ॥ 
गणपतीवर अक्षता व फुले वाहावीत. 
अनेन कृतपूजनेन श्रीमहागणपति:प्रीयताम् ॥ 
एक पळी पाणी उजव्या हातावरून ताम्हणात सोडावे.

॥ अथ आसनविधि: ॥ 
आसनाखाली जमिनीवर जलाने त्रिकोण काढावा. 
ॐ भूमिदेव्यै नम: । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्राकुंकुमं च समर्पयामि ॥ 
त्रिकोणावर पूजकाने गंध , अक्षता , फूल व हळदकुंकू वाहून हात जोडावेत. 
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले । विष्णुपत्‍नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ॥ 
भूमीस नमस्कार करावा. हात जोडावेत. 
पृथ्वीतिमंत्रस्य मेरुपृष्ठमृषि: , कूर्मो देवता , सुतलं छंद: , आसनोपवेशने विनियोग: ॥ 
ॐ पृथ्वि त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता । 
त्वं च धारय मां देवि पवित्रं कुरु चासनम् ॥ 
आसनावर स्थानापन्न व्हावे. 
उर्ध्वकेशि विरूपाक्षि मांसशोणितभक्षणे । तिष्ठ देवि शिखाबंधे चामुंडे ह्यपराजिते ॥ 
शिखाबंधन करावे. म्हणजेच , शेंडीस गाठ बांधावी. स्त्रियांनी केसांचा अंबाडा बांधावा किंवा वेणीचा खोपा घालावा. 
अपसर्पंतु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता: । ये भूता विघ्नकर्तारस् ते गच्छंतु शिवाज्ञया ॥ 
अपक्रामंतु भूतानि पिशाचा: सर्वतोदिशम् । सर्वेषामविरोधेन पूजाकर्म समारभे ॥ 
विष्णो देवयजनं रक्षस्व ॥ 
असे म्हणत ताम्हण व आपले आसन ह्यात एक टीच अंतर ठेवावे. 


॥ अथ कलशपूजा ॥ 
पूजेसाठी असणार्‍या पाण्याच्या कलशावर उजवा हात ठेवून कलशप्रार्थना करावी. 
कलशस्य मुखे विष्णु: कंठे रुद्र: समाश्रित: । मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा: स्मृता: ॥ 
कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा । ऋग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथर्वण: ॥ 
अंगैश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिता: ॥ अत्र गायत्री सावित्री शांतिपुष्टिकरी तथा । 
आयांतु व्रत (देव) पूजार्थं दुरितक्षयकारक: ॥ गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । 
नर्मदे सिंधु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरू ॥ वरुणाय नम: । 
सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ (धेनुमुद्रां प्रदर्श्य ।) नमस्करोमि ॥ 

कलशास बाहेरून गंध , अक्षता व फूल वाहावे. ज्ञात असल्यस धेनुमुद्रा दाखवावी. नमस्कार करावा. 

॥ अथ शंखपूजा ॥ 

शंख धुऊन व पुसून शुद्धोदकाने भरून ठेवावा. 
शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता । पृष्ठे प्रजापतिं विद्यादग्रे गंगा सरस्वती ॥ 
त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया । शंखे तिष्ठंति विप्रेंद्र तस्माच्छंखं प्रपूजयेत्‌॥ 
त्वं पुरा सागरोत्पन्नो वोष्णुमा विध्रुत: करे । नमित: सर्वदेवैश्च पांचजन्य नमोऽस्तु ते ॥ 
पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि । तन्न: शंख: प्रचोदयात् ॥ शंखाय नम: । 
सकलपूजार्थे गंधतुलसीपत्रं समर्पयामि ॥ (शंखमुद्रां प्रदर्श्य ।) नमस्करोमि ॥ 
शंखास गंध व तुलसीपत्र वाहावे. ज्ञात असल्यास शंखमुद्रा दाखवावी. नमस्कार करावा. 

॥ अथ घंटापूजा ॥ 

घंटा धुऊन व पुसून ठेवावी. 
आगमार्थ तु देवाना गमनार्थं तु रक्षसाम् । 
कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ॥ 
घंटायै नम: । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ 
घंटामुद्रां प्रदर्श्य   नमस्करोमि ॥ 
घंटेस गंध , अक्षता व फुले वाहावीत. ज्ञात असल्यास घंटामुद्रा दाखवावी. नमस्कार करावा. घंटा वाजवावी. 

॥ अथ दीपपूजा ॥ 
तेलाची व तुपाची अशा दोन समया असतील तर देवाच्या उजवीकडे तुपाची व डावीकडे तेलाची समई स्थापन करून खालीलप्रमाणे स्वतंत्र पूजा करावी. समईखाली एक पात्र किंव पान ठेवून दीप प्रज्वलित करावा. 
दीपनाथाय नम: । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ 
दीपमुद्रां प्रदर्श्य नमस्करोमि ॥ 
दीपास गंध , अक्षता व फूल वाहावे. ज्ञात असल्यास दीपमुद्रा दाखवावी व नमस्कार करावा. 
भो दीप देवतारूप कर्मसाक्षिन्नविघ्नकृत् । 
यावत् पूजासमाप्ति: स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव ॥ 
॥ अथ पवित्रीकरणम् ॥ 
कलशातील एक पळी शुद्धोदक व शंखोदक उजव्या हाताच्या ओंजळीत घेऊन पुढील मंत्र म्हणावा. 
ॐ अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा। 
य: स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर: शुचि: ॥ 
अभिमंत्रित जलाने पूजासाहित्यावर व नंतर आपणांवर प्रोक्षण करावे. 



अथ प्राणप्रतिष्ठा

(गणेशमूर्तीच्या ह्रदयावर हात ठेवून पुढील मंत्र म्हणावा .)

अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरंतु च । अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन ॥

गर्भाधानादि-पंचदशसंस्कार-सिद्ध्यर्थं पंचदश प्रणवावृत्ती: करिष्ये ॥

(एक पळी पाणी सोडावे.)

(मूर्तीच्या ह्र्दयास स्पर्श करून पंधरा वेळा ॐ म्हणावे.)

सुप्रतिष्ठितमस्तु ॥ पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: ।

सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं धूपदीपौ नैवेद्यं च समर्पयामि ॥

(देवावर गंध, रक्ताक्षता, फूल वाहून उदबत्ती व नीराजन ओवाळावे. गूळखोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा.)

अनेन प्राणप्रतिष्ठापूर्वकपूजनेन पार्थिव-श्रीसिद्धिविनायक:प्रीयताम् ॥

(एक पळी पाणी सोडावे.)

 

॥ अथ मुख्यदेवतापूजनम् ॥

(ओंजळीत रक्ताक्षता व दुर्वा घेऊन पुढील ध्यान म्हणावे. )

वंदे गजाननं देवं त्रिनेत्रं शूर्पकर्णकम् । लंबोदरं महाकायं सर्वाभरणभूषितम् ॥

एकदंतं चतुर्बाहुं तप्तकांचनसुप्रभम् । हेरंबं मूषकारूढं प्रसन्नास्यमुमासुतम् ॥

भालचंद्रं गणाधीशं विघ्नेशं मोदकप्रियम् । ज्ञानदं सर्वदं भक्त्या ध्यायेत् सिद्धिविनायकम् ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । ध्यायामि ॥ ध्यानार्थे दुर्वाक्षतान् समर्पयामि ॥

(देवावर रक्ताक्षता व दूर्वा वाहाव्यात. दूर्वांचे देठ देवाकडे करावेत. )

(ॐ सहस्त्रशीर्षा०) आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर । अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । आवाहनार्थे रक्ताक्षतान् समर्पयामि ॥

( रक्ताक्षता वाहाव्यात. )

( ॐ पुरुष० ) विचित्ररत्‍नसंपन्नं दिव्यास्तरणसंयुतम् । स्वर्णसिंहासनं चारु गृहाण सुरपूजित ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । आसनार्थे रक्ताक्षतान् समर्पयामि ॥

( रक्ताक्षता वाहाव्यात. )

( ॐ एतावानस्य०) सर्वतीर्थसमुद्‌भूतं पाद्यं गंधादिभिर् युतम् । विघ्नराज गृहाणेदं भगवन् भक्‍तवत्सल ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । पादयो: पाद्यं समर्पयामि ॥

( देवावर फुलाने किंचित शुद्धोदक प्रोक्षण करावे. )

( ॐ त्रिपादूर्ध्व० ) अर्घ्यं च फलसंयुक्तं गंधपुष्पाक्षतैर् युतम् । गणाध्यक्ष नमस्तेऽसु गृहाण करुणानिधे ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । हस्तयो अर्घ्यं समर्पयामि ॥

(पळीतील पाण्यात गंध, फूल व रक्ताक्षता घालून ते पाणी फुलाने किंचित प्रोक्षण करावे. )

( ॐ तस्माद्विराळ० ) विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवंदित । गंगोदकेन विघ्नेश शीघ्रमाचमनं कुरु ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । आचमनीयं समर्पयामि ॥

( फुलाने तीनदा शुद्धोदक प्रोक्षण करावे. )

( ॐ यत् पुरुषेण० ) गंगादि सर्वतीर्थेभ्यो मया प्रार्थनयाह्रतम् । तोयमेतत् सुखस्पर्शं स्नानार्थं प्रतिगृह्यताम् ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । स्नानीय समर्पयामि ॥

( फुलाने शुद्धोदक प्रोक्षण करावे. )

( ॐ आ प्यायस्व० इ. ) पयो दधि घृतं चैव शर्करामधुसंयुतम् । पंचामृतं गृहाणेदं स्नानाय गणनायक ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । स्नानार्थे पंचामृतस्नानं समर्पयामि ॥

( फुलाने किंचित पंचामृत प्रोक्षण करावे. )

( ॐ गंधद्वारां० ) षष्ठं गंधोदकस्नानं समर्पयामि ॥

( गंधोदक प्रोक्षण करावे. )

( ॐ आपो हि० ) शुद्धोदकस्नानं समर्पयामि ॥

( शुद्धोदक प्रोक्षण करावे. )

आचमनीयं समर्पयामि ॥

( फुलाने तीनदा शुद्धोदक प्रोक्षण करावे. )

सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं धूपदीपौ पंचामृतनैवेद्यं च समर्पयामि ॥ नमस्करोमि ॥

( देवावर गंध, रक्ताक्षता व फूल वाहावे. उदबत्ती व नीराजन ओवाळावे. घंटा वाजवावी. दुसर्‍या वाटीतील पंचामृताचा नैवेद्य दाखवून नमस्कार करावा. )

अनेन पुर्वाराधनेन पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय: प्रीयताम् ॥

( एक पळी पाणी ताम्हणात सोडावे. )

* येथे 'अथ महाभिषेक मंत्रा' मधील सर्व विधी करणे जरूरीचे आहे.

(किंवा 'गणपत्यथर्वशीर्ष/ॐ गं गणपतये नम:' ह्या मंत्राने अभिषेक करावा.)

( ॐ कनिक्रद० ) काश्‍मीरागुरुकस्तूरी-कर्पूरमलयान्वितम् । उद्‌वर्तनं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम् ।

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । मांगलिक-उष्णोदकस्नानं समर्पयामि ॥

(देवास फुलाने थोडेसे अत्तर लावून ते फूल देवावर वाहावे.)

ॐ तदस्तु मित्रावरुणा तदग्रे शं योरस्मभ्यमिदमस्तु शस्तम् । अशीमहि गाधमुत प्रतिष्ठां नमो दिवे बृहते सादनाय ॥

( ॐ गृहा वै० ) सुप्रतिष्ठितमस्तु ॥

( देवावर रक्ताक्षता वाहाव्यात. )

( ॐ तं यज्ञं० ) रक्तवस्त्रयुगं देव दिव्यं कांचनसंभवम् । सर्वप्रदं गृहाणेदं लंबोदर हरात्मज ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । वस्त्रोपवस्त्रे ( वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं/रक्ताक्षतान् वा ) समर्पयामि ॥

( वस्त्रे किंवा कापसाची मालावस्त्रे/रक्ताक्षता वाहाव्यात.)

( ॐ तस्माद्यज्ञात् सर्वहुत: संभृतं०) राजतं ब्रह्मसूत्रं च कांचनं चोत्तरीयकम् । विनायक नमस्तेऽस्तु गृहाण सुरवंदित ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । यज्ञोपवीतं (यज्ञोपवीतार्थे रक्ताक्षतान् वा) समर्पयामि । आचमनीयं समर्पयामि ।

( जानवे किंवा रक्ताक्षता वाहाव्यात. तीन पळ्या पाणी देवास दाखवून ताम्हणात सोडावे. )

नानाविधानि दिव्यानि नानारत्‍नोज्ज्वलानि च । भूषणानि गृहाणेश पार्वतीप्रियनंदन ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: अलंकारान् (अलंकारार्थे रक्ताक्षतान् वा) समर्पयामि ॥

(विविध अलंकार घालावेत किंवा रक्ताक्षता वाहाव्यात. )

(ॐ तस्माद्यज्ञात् सर्वहुत ऋच:०) कस्तूरीसहितं दिव्यं कुंकुमेन विराजितम् ।

विलेपनं गणश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्॥ पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ॥

(अनामिकेने गंध लावावे. )

रक्ताक्षतांश्च विघ्नेश गृहाण द्विरदानन । ललाटपटले चंद्रस् तस्योपरि विधार्यताम् ।

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । रक्ताक्षतान् समर्पयामि ॥

( देवावर रक्ताक्षता वाहाव्यात. )

हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी । सर्वालंकारमुख्या हि प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम् ॥

ऋद्धिबुद्धि-सिद्धिशक्तिभ्यो नम: । हरिद्रां समर्पयामि ॥

( देवाच्या उजव्या व डाव्या बाजूंना हळद लावावी.)

हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकम् । वस्त्रालंकरणं सर्वं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम् ॥

ऋद्धिबुद्धि-सिद्धिशक्तिभ्यो नम: । कुंकुमं समर्पयामि ॥

(कुंकू वाहावे.)

(ॐ अहिरिव० )कस्तूर्यादैर् विमिश्रं च नानाचूर्णै: सुगंधिभि: । प्रीत्यर्थं ते गृहाणेदं गंधद्रव्यं गणेश्वर ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । नानापरिमलद्र्व्याणि समर्पयामि ॥

(अष्टगंध, सिंदूर इत्यादी सुगंधी द्रव्ये वाहावीत. हात धुऊन पुसावा. )

(ॐ तस्मादश्वा० )माल्यादिनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो ।

मयाह्रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ॥ पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । रक्तपुष्पाणि दूर्वांकुरांश्च समर्पयामि

(लाल फुले व दूर्वा वाहाव्यात.)

 

॥ अथ अंगपूजा ॥

(डाव्या हातात रक्ताक्षतांचा द्रोण घेऊन पुढील मंत्रांनी त्या - त्या अंगांची कल्पना करून देवावर रक्ताक्षता वाहाव्यात. )

गणेशाय नम:, पादौ (पाय) पूजयामि ।

विघ्नराजाय नम:, । जानुनी (गुडघे) पूजयामि ।

आखुवाहनाय नम:, ऊरू (मांड्या) पूजयामि ।

हेरंबाय नम:, कटी (कंबर) पूजयामि ।

कामारिसूनवे नम:, नाभिं (नाभी) पूजयामि ।

लंबोदराय नम:, उदरं (पोट) पूजयामि ।

गौरीसुताय नम:, ह्रदयं (ह्रदय) पूजयामि ।

स्थूलकंठाय नम: कंठं (कंठ ) पूजयामि ।

स्कंदाग्रजाय नम:, स्कंधौ (खांदे ) पूजयामि ।

पाशहस्ताय नम:, हस्तान् (चार हात) पूजयामि ।

गजवक्त्राय नम:, वक्त्रं (मुख ) पूजयामि ।

विघ्नहर्त्रै नम:, नेत्रे (नेत्र) पूजयामि ।

सर्वेश्चराय नम:, शिर: (मस्तक) पूजयामि ।

गणाधिपाय नम:, सर्वांगं (सर्वांग) पूजयामि ॥



॥ अथ नामपूजा ॥

('गणेश अष्टोत्तरशतनामावली' ने गणपतीवर अक्षता वाहाव्यात. प्रत्येक नाम ॐकारपूर्वक म्हणावे. )

॥ अथ गणेश - अष्टोत्तरशतनामावलि: ॥

विघ्नेशाय नम: । विश्ववरदाय नम: । विश्वचक्षुषे नम: । जगत्प्रभवे नम: । हिरण्यरूपाय नम: ।

सर्वात्मने नम: । ज्ञानरूपाय नम: । जगन्मयाय नम: । ऊर्ध्वारेतसे नम: । महाबाहवे नम: ।

अमेयाय नम: । अमितविक्रमाय नम: । वेदवेद्याय नम: । महाकालाय नम: । विद्यानिधये नम: ।

अनामयाय नम: । सर्वज्ञाय नम: । सर्वगाय नम: । शांताय नम: । गजास्याय नम: । चित्तेश्वराय नम: ।

विगतज्वराय नम: ।विश्वमूर्तये नम: । अमेयात्मने नम: । विश्वाधाराय नम: । सनातनाय नम: ।

सामगाय नम: । प्रियाय नम: । मंत्रिणे नम: । सत्त्वाधाराय नम: ।सुराधीशाय नम: । समस्तसाक्षिणे नम: ।

निर्द्वंद्वाय नम: । निर्लोकाय नम: । अमोघविक्रमाय नम: । निर्मलाय नम: । पुण्याय नम: । कामदाय नम: ।

कांतिदाय नम: । कामरूपिणे नम: । कामपोषिणे नम: । कमलक्षयाय नम: । गजाननाय नम: । सुमुखाय नम: ।

शर्मदाय नम: । मूषकाधिपवाहनाय नम: । शुद्धाय नम: । दीर्घतुंडाय नम: । श्रीपतये नम: । अनंताय नम: ।

मोहवर्जिताय नम: । वक्रतुंडाय नम: । शूर्पकर्णाय नम: । परमाय नम: । योगीशाय नम: । योगधाम्ने नम: ।

उमासुताय नम: । आपद्‍हंत्रे नम: । एकदंताय नम: । महाग्रीवाय नम: । शरण्याय नम: । सिद्धसेनाय नम: ।

सिद्धवेदाय नम: । करुणाय नम: । सिद्धाय नम: । भगवते नम: । अव्यग्राय नम: । विकटाय नम: ।

कपिलाय नम: ।ढुंढिराजाय नम: । उग्राय नम: । भीमोदराय नम: । शुभाय नम: । गणाध्यक्षाय नम: । गणेशाय नम: ।

गणाराध्याय नम: । गणनायकाय नम: ।ज्योति:स्वरूपाय नम: । भूतात्मने नम: । धूम्रकेतवे नम: । अनुकूलाय नम: ।

कुमारगुरवे नम: । आनंदाय नम: । हेरंबाय नम: । वेदस्तुताय नम: । नागयज्ञोपवीतिने नम: । दुर्धर्षाय नम: ।

बालदूर्वांकुरप्रियाय नम: । भालचंद्राय नम: । विश्वधात्रे नम: । शिवपुत्राय नम: । विनायकाय नम: । लीलासेविताय नम: ।

पूर्णाय नम: । परमसुंदराय नम: । विघ्नांतकाय नम: । सिंधुरवदनाय नम: । नित्याय नम: । विभवे नम: ।

प्रथमपूजिताय नम: । दिव्यपादाब्जाय नम: । भक्तमंदराय नम: । रत्‍नसिंहासनाय नम: । मणिकुंडलमंडिताय नम: ।

भक्तकल्याणाय नम: । कल्याणगुरवे नम: ।सहस्रशीर्ष्णे नम: । महागणपतये नम: ॥१०८॥

॥ अथ पत्रपूजा ॥

(पुढील नाममंत्रांनी ती-ती पत्री वाहावी. एखादी पत्री उपलब्ध नसल्यास दूर्वा वाहाव्यात. )

सुमुखाय नम:,मालतीपत्रं (मधुमालती) समर्पयामि ।

गणाधिपाय नम: , भृंगराजपत्रं (माका) समर्पयामि ।

उमापुत्राय नम:, बिल्वपत्र (बेल) समर्पयामि ।

गजाननाय नम:, श्वेतदुर्वापत्रं (पांढर्‍या दूर्वा) समर्पयामि ।

लंबोदराय नम:, बदरीपत्रं (बोर) समर्पयामि ।

हरसूनवे नम:, धत्तूरपत्रं (धोतरा) समर्पयामि ।

गजकर्णाय नम:, तुलसीपत्रं (तुळस) समर्पयामि ।

गुहाग्रजाय नम:, अपामार्गपत्रं (आघाडा) समर्पयामि ।

वक्रतुंडाय नम:, शमीपत्रं (शमी) समर्पयामि ।

एकदंताय नम:, । केतकीपत्रं (केवडा) समर्पयामि ।

विकटाय नम:, करवीरपत्रं (कण्हेर) समर्पयामि ।

विनायकाय नम:, अश्मंतक (आपटा) पत्रं समर्पयामि ।

कपिलाय नम:, अर्कपत्रं (रुई) समर्पयामि ।

भिन्नदंताय नम:, अर्जुनपत्रं (अर्जुनसादडा) समर्पयामि ।

विघ्नराजाय नम:, बृहतीपत्रं (डोरली) समर्पयामि ।

बटवे नम:, दाडिमपत्रं (डाळिंब) समर्पयामि ।

सुरेशाय नम:, देवदारुपत्रं (देवदार) समर्पयामि ।

भालचंद्राय नम:, मरुपत्रं (मरवा) समर्पयामि ।

हेरंबाय नम:, सिंदुवारपत्रं (निर्गुंडी) समर्पयामि ।

चतुर्भुजाय नम:, जातीपत्रं (जाई) समर्पयामि ।

सर्वेश्वराय नम:, अगस्तिपत्रं (अगस्त्य) समर्पयामि ।

(ॐ यत् पुरुषं०) दशांगं गुग्गुलं धूपं सुगंधं च मनोहरम् । गुहाण सर्वदेवेश उमापुत्र नमोऽस्तु ते ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । धूपं आघ्रापयामि ॥

(देवास उदबत्ती ओवाळावी. घंटा वाजवावी. )

(ॐ ब्राह्मणोऽस्य०) सर्वज्ञ सर्वलोकेश त्रैलोक्यतिमिरापह । गृहाण मंगलं दीपं रुद्रप्रिय नमोऽस्तु ते ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । घृतदीपं दर्शयामि । एकार्तिक्यं समर्पयामि ॥

(तुपाचे नीराजन ओवाळावे. घंटा वाजवावी. )

(ॐ चंद्रमा०) नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे ह्यचलां कुरु । ईप्सितं मे वरं देहि लंबोदर नमोऽस्तु ते ॥

मोदकं पंचखाद्यं च नैवेद्यं ते निवेदितम् । मया भक्त्या शिवापुत्र गृहाण गणनायक ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । मोदकपंचखाद्यनैवेद्यं समर्पयामि ॥

(मोदक, पंचखाद्य इत्यादी नैवेद्यावर तुलसीपत्र ठेवावे. पात्राखाली पाण्याने असे चौकोनी मंडल करावे.

नैवेद्याभोवती पाणी फिरवावे. )

सत्यं त्वर्तेन परिषिंचामि ॥

(एक पळी पाणी देवास दाखवून ताम्हणात सोडावे. )

अमृतोपस्तरणमसि ॥

(ग्रासमुद्रा करुन नैवेद्याचे घास देवास मनोमन दाखवावेत.)

ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा ।

ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ॥

(एक पळी पाणी देवास दाखवून ताम्हणात सोडावे. )

मध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि ॥

(ग्रासमुद्रा करून नैवेद्याचे घास देवास मनोमन दाखवावेत. )

ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा ।

ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ॥

(चार पळ्या पाणी देवास दाखवून ताम्हणात सोडावे. )

अमृतापिधानमसिउत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।

आचमनीयं समर्पयामि ॥ करोद्‌वर्तनं (करोद्‌वर्तनार्थे चंदनं वा ) समर्पयामि ॥

(फुलास अत्तर किंवा गंध लावून ते फूल देवावर वाहावे.)

फलान्यमृतकल्पानि सुस्वादून्यघनाशन । आनीतानि मयाभक्त्या गृहाणेमानि सर्वद ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । नारिकेलमहाफलं नानाविधफलानि च समर्पयामि ॥

(नारळ, फळ / केळे, बदाम, खारीक / नारळ इत्यादी फळांवर अक्षता वाहून एक पळी पाणी ताम्हणात सोडावे. )

पूगीफलं महद् दिव्यं नागवल्लीदलैर्‌युतम् । कर्पूरैलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामि ॥

(विड्यावर अक्षता वाहून एक पळी पाणी ताम्हणात सोडावे. )

सौवर्णी राजती ताम्रा नानारत्‍नसमन्विता । कर्मसाद्‌गुण्यसिद्धयर्थं दक्षिणा प्रतिगृह्यताम् ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । दक्षिणां समर्पयामि ॥

(दक्षिणेवर अक्षता वाहून एक पळी पाणी ताम्हणात सोडावे. )

(ॐ श्रिये जात:०) चक्षुर्दं सर्वलोकानां तिमिरस्य निवारणम् । आर्तिक्यं कल्पितं भक्त्या गृहाण पुरुषोत्तम ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । महानीराजनदीपं समर्पयामि ॥

(देवास नीराजन ओवाळावे. घंटा वाजवावी.)

(ॐ नाभ्या आसी०) नमस्ते विघ्नसंहर्त्रे नमस्तेऽभीप्सितप्रद । नमस्ते देवदेवेश गणाधिप नमोऽस्तु ते ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । नमस्कारान् समर्पयामि ॥

(देवास साष्टांग नमस्कार करावा. )

(ॐ सप्तास्यासन्‌०) विघ्नेश्वर विशालाक्षा सर्वकामफलप्रद । प्रदक्षिणीकरोमि त्वामभीष्टं देहि मे सदा ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । प्रदक्षिणां समर्पयामि ॥

(देवाभोवती किंवा स्वत:भोवती प्रदक्षिणा करावी. )

॥ अथ दूर्वायुग्मपूजा ॥

(एकवीस दूर्वांची जुडी घ्यावी. त्यातील दोन-दोन दूर्वा गंधात लिप्त करून पुढील नाममंत्रांनी गणपतीस वाहाव्यात. )

गणाधिपाय नम:, दूर्वायुग्मं समर्पयामि ॥१॥

उमापुत्राय नम:, दूर्वायुग्मं समर्पयामि ॥२॥

अघनाशनाय नम:, दूर्वायुग्मं समर्पयामि ॥३॥

विनायकाय नम:, दूर्वायुग्मं समर्पयामि ॥४॥

ईशपुत्राय नम:, दूर्वायुग्मं समर्पयामि ॥५॥

सर्वसिद्धिप्रदाय नम:, दूर्वायुग्मं समर्पयामि ॥६॥

एकदंताय नम:, दूर्वायुग्मं समर्पयामि ॥७॥

इभवक्त्राय नम:, दूर्वायुग्मं समर्पयामि ॥८॥

मूषकवाहनाय नम:, दूर्वायुग्मं समर्पयामि ॥९॥

कुमार्गुरवे नम:, दूर्वायुग्मं समर्पयामि ॥१०॥

(शेवटची एक दूर्वा गंधात लिप्त करून पुढील सर्व दहा नावांनी गणपतीस वाहावी. )

गणाधिप- उमापुत्र-अघनाशन-विनाय-ईशपुत्र-सर्वसिद्धिप्रद-एकदंत-इभवक्त्र-मूषकवाहन-कुमारगुरुभ्यो नम: ॥

दूर्वांकुरं समर्पयामि ॥११॥

(ॐ यज्ञेन०) नानासुगंधपुष्पाणि यथाकालोद्‌भवनि च । पुष्पांजलिर् मया दत्तो गृहाण गिरिजात्मज ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । मंत्रपुष्पं समर्पयामि ।

(देवावर रक्ताक्षता व फुले वाहावीत. पुन्हा ओंजळीत रक्ताक्षता व फुले घेऊन उभे राहावे.)

यन् मयाचरितं देव व्रतमेतत् ते सुदुर्लभम् । त्वत्प्रसादाद् गणेश त्वं सफलं कुरू सर्वदा ॥

विनायक गणेशान सर्वदेवनमस्कृत । पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नान् निवारय ॥

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । प्रार्थनापुष्पं समर्पयामि ॥

(अक्षता व फुले वाहावीत.)

अनेन संकल्पोक्तफलावाप्तये मया यथाज्ञानेन यथामीलितोपचारद्रव्यै: कृतषोडशोपचारपूजनेन ।

पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय प्रीयताम् ॥

(एक पळी पाणी सोडावे.)

अथ अर्घ्यदानम्
(नेत्रांस पाणी लावून घ्यावे.)
अथ गणेशचतुर्थी-व्रतपूजांगत्वेन अर्घ्यदानं करिष्ये ॥
(एक पळी पाणी सोडावे.)
(एका पात्रात शुद्धोदक घेऊन त्यात गंध, रक्ताक्षता, फूल, दूर्वा, सुपारी व नाणे घालून अर्घ्य तयार करावे.
ते पात्र ओंजळीत घेऊन खालील मंत्र म्हणावा. )
गणेशाय नमस्तुभ्यं सर्वकामफलप्रद । वांछितं देहि मे नित्यं गृहाणार्घ्यं नमोऽस्तु ते ॥
पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय नम: । इदमर्घ्यं समर्पयामि ॥
(पात्रातील अर्घ्य ताम्हणात सोडावे.)
अनेन अर्घ्यदानेन पार्थिव-श्रीसिद्धिविनायकाय: प्रीयंताम् ॥
(एक पळी पाणी सोडावे.)
 
॥ अथ वायनदानम् ॥
(नेत्रांस पाणी लावावे.)
अथ कृतव्रतपूजाया: सांगतासिद्धर्य्थं पूजनपूर्वकं ब्राह्मणाय (पुरोहिताय) वायनदानं करिष्ये ॥
(पाणी सोडावे.) 
***************************************************************************

    पुरोहित उपस्थित असल्यास ' पूजक ' शब्दाने सुरू होणारी वाक्ये पूजकाने व ' पुरोहित ' शब्दाने सुरू होणारी वाक्ये पुरोहिताने म्हणावीत.
    पुरोहित उपस्थित नसल्यास पानसुपारीवर पुरोहित असल्याची कल्पना करून पुरोहितपूजन करावे व दोन्हीही वाक्ये पूजकानेच म्हणावीत. नेत्रांस पाणी लावून घ्यावे. 

पूजक
	

अथ कृतव्रतपूजांगत्वेन ब्राह्मण ( पुरोहित) पूजनं करिष्ये ॥

 
	

एक पळी पाणी ताम्हणात सोडावे.

 
	

परब्रह्मस्वरूपिणे ब्राह्मणाय (पुरोहिताय) इदमासनम् ।

 
	

पुरोहिताच्या उजव्या मांडीखाली थोड्या अक्षता ठेवाव्यात.

पुरोहित
	

स्वासनम् ॥

पूजक
	

चरणं पवित्रं विततं पुराणम् येन पूतस् तरति दुष्कृतानि ॥

 
	

तेन पवित्रेण शुद्धेन पूता: । अतिपाप्मानमरातिं तरेम ॥ इदं पाद्यम् ।

 
	

पुरोहिताच्या उजव्या हातावर एक पळी पाणी सोडावे.

पुरोहित
	

सुपाद्यम् ॥

पूजक
	

इदमर्घ्यम् ।

 
	

पळीत गंध. अक्षता , फुले घालून ते पाणी पुरोहिताच्या हातावर सोडावे

पुरोहित
	

अस्त्वर्घ्यम् ॥

पूजक
	

इदमाचमनीयम् ।

 
	

पुरोहिताच्या हातावर एक पळी पाणी सोडावे.

पुरोहित
	

अस्त्वाचमनीयम् ॥

पूजक
	

गंधा: पांतु ।

 
	

पुरोहिताच्या हातास अनामिकेने गंध लावावे.

पुरोहित
	

सौमंगल्यं चास्तु ॥

 
	

अक्षता: पांतु ।

 
	

पुरोहिताच्या हातावर अक्षता ठेवाव्यात.

पुरोहित
	

आयुष्यमस्तु ॥

पूजक
	

पुष्पं पातु ।

 
	

फुल ठेवावे.

पुरोहित
	

सौश्रियमस्तु ॥

पूजक
	

तांबूलं पातु ।

 
	

पानसुपारी ठेवावी.

पुरोहित
	

ऎश्वर्यमस्तु ॥

पूजक
	

दक्षिणा: पांतु।

 
	

दक्षिणेवर एक पळी शुद्धोदक सोडून तुलसीपत्रासह दक्षिणा हातावर ठेवावी.

पुरोहित
	

बहुदेयं चास्तु । दीर्घमायु: श्रेय: शांति: पुष्टिस् तुष्टिश्चास्तु ॥

पूजक
	

नमोऽस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे ।

 
	

सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते , सहस्रकोटियुगधारिणे नम: ॥

 
	

पुरोहिताच्या मस्तकावर अक्षता वाहाव्यात. नमस्कार करावा.

 
	

सकलाराधनै: स्वर्चितमस्तु ॥

पुरोहित
	

अस्तु स्वर्चितम् ॥

 
	

अनेन कृतब्राह्मण (पुरोहित) पूजनेन कर्मप्रधानदेवता प्रीयताम् ॥

 
	

एक पळी पाणी ताम्हणात सोडावे.

***************************************************************************
(एका पत्रावळीवर दहा मोदक, पानसुपारी व दक्षिणा ठेवून प्रथम वायनाची पुढील मंत्राने पूजा करावी.)
वायनदेवतायै नम: । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ नमस्करोमि ॥
(वायनास गंध, अक्षता व फुले वाहून नमस्कार करावा. पुढील मंत्र म्हणून हे वायन पुरोहितास द्यावे.)
विनायक नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय । अविघ्नं कुरू मे देव शुभकार्येषु सर्वदा ॥
दशानां मोदकानां च दक्षिणाफलसंयुतम् । विप्राय तव तुष्टयर्थं वायनं प्रददाम्यहम्‌ ॥
इदं मोदकवायनदानं सतांबूलं सदक्षिणाकं......
(पुरोहिताच्या गोत्राचे नाव/काश्यप)... गोत्राय (पुरोहिताचे नाव/विष्णु)
शर्मणे तुभ्यमहं संप्रददे । प्रतिगृह्यताम् ॥ (पुरोहिताने म्हणावे) प्रतिगृह्णामि ॥ (पुरोहोताने वायनाचा स्वीकार करावा.)
अनेन वायनदानेन पार्थिव-श्रीसिद्धिविनायक: प्रीयताम् ॥
(एक पळी पाणी सोडावे. ) (पुरोहिताने वायनाचा स्वीकार करावा. पुरोहित उपस्थित नसल्यास नंतर हे वायनदान मंदिरात नेऊन द्यावे.)
(ह्यानंतर महानैवेद्य, आरती, प्रार्थना, प्रसादग्रहण, व पूजासमारोप ह्यांसाठी उत्तरांग पाहावे.)
स्थापन केलेल्या गणपतीचे दुसर्‍या दिवशीपासून उपरोक्त पद्धत्ने षोडशोपचारे किंवा पंचोपचारे पूजन करावे. तसेच दररोज सायंकाळी पंचोपचारे पूजन करून आरती करावी.
प्रथेनुसार यथाकाल गणेशोत्सव साजरा केल्यावर विसर्जनादिवशी उत्तरपूजा करावी.

**********************************************************************************

॥ अथ पंचोपचारपूजनम्॥

    व्रतपूजेनुसार महानैवेद्य तयार झाल्यावर प्रथम सर्व अन्नपदार्थ एका ताटात वाढून त्यावर तूप घालावे. तो नैवेद्य दुसर्‍या ताटाने झाकून पूजास्थानी आणावा.
    एका पाटाखाली पाण्याने भरीव चौकोनी मंडल करून त्यावर भाताच्या मुदी देवाकडे येतील अशाप्रकारे नैवेद्याचे ताट ठेवावे. नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवावे. सर्व अन्नपदार्थ ताटात वाढून झाल्यावर शेवटी तूप घालावे.
    तसेच एका तबकात /ताम्हणात हळदकुंकू , अक्षता , विडा व पुरणाचे पाच/दोन दिवे वा तुपाची नीराजने ठेवून महारती तयार करावी.
    नैवेद्याची व पंचोपचार पूजेची सर्व तयारी पूर्ण झाल्यावर पूजकाने स्थानापन्न होऊन प्रथम आचमन व प्राणायाम करावा किंवा डोळ्यास पाणी लावून घ्यावे. 

अथ कृतव्रतपूजांगत्वेन महानैवेद्यांतर्गत-पंचोपचारपूजनं करिष्ये ॥
एक पळी पाणी ताम्हणात सोडावे.
आवाहितदेवताभ्यो नम ; । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ॥
फुलास गंध लावून ते देवावर वाहावे.
आवाहितदेवतायै नम: । हरिद्राकुंकुमं समर्पयामि ॥
देवाच्या चरणावर किंवा देवीच्या ठिकाणी हळद्कुंकू वाहावे.
आवाहितदेवताभ्यो नम: । पुष्पं समर्पयामि ॥
देवावर फुले वाहावीत.
आवाहितदेवताभ्यो नम: । धूपं आघ्रापयामि ॥
देवास उदबत्ती ओवाळावी. घंटा वाजवावी.
आवाहितदेवताभ्यो नम: । दीपं दर्शयामि । एकार्तिक्यं समर्पयामि ॥
नीराजन ओवाळावे. घंटा वाजवावी.
आवाहितदेवताभ्यो नम: । महानैवेद्यं समर्पयामि ॥
नैवेद्याभोवतीपाणीफिरवावे.
सत्यंत्वर्तेनपरिषिंचामि॥ (रात्रीऋतंत्वासत्येनपरिषिंचामि॥)
एकपळीपाणीदेवासदाखवूनताम्हणातसोडावे.
अमृतोपस्तरणमसि॥

डाव्या हातानेवरचे ताट थोडेसे उचलून उजव्या हाताने उपरोक्त ग्रास मुद्राकरून नैवेद्याचे घास मनोमन देवास दाखवावेत.

ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ॥
एक पळी पाणी देवास दाखवून ताम्हणात सोडावे.
मध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि ॥

डाव्या हाताने वरचे ताट थोडेसे उचलून उजव्याहाताने वरील ग्रास मुद्राकरून नैवेद्याचे घास मनोमन देवास दाखवावेत.
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ॥
चार पळ्या पाणी देवास दाखवून ताम्हणात सोडावे.
अमृतापिधानमसि-उत्तरोपोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि । आचमनीयं समर्पयामि ॥ करोद्धर्तनं (करोद्धर्तनार्थे चंदनं वा) समर्पयामि ॥
फुलास अत्तर किंवा गंध लावून ते फूल देवावर वाहावे.
आवाहितदेवताभ्यो नम: । नानाविधफलानि समर्पयामि ॥
फळांवर अक्षता वाहून एक पळी पाणी ताम्हणात सोडावे.
आवाहितदेवताभ्यो नम: । पूगीफलतांबूलं समर्पयामि ॥
विड्यावर अक्षता वाहून एक पळी पाणी ताम्हणात सोडावे.
आवाहितदेवताभ्यो नम: । दक्षिणां समर्पयामि ॥
दक्षिणेवर अक्षता वाहून एक पळी ताम्हणात सोडावे.
पंचोपचार पूजा झाल्यानंतर प्रथेनुसार शंख फुंकावा आणि सर्वांनी आरतीसाठी उभे राहावे. महारती ओवाळावी , घंटा वाजवावी.
ॐ श्रिये जात: श्रिय आ निरियाय श्रियं वयो जरितृभ्यो दधाति ।
श्रियं वसाना अमृतत्वमायन्भवंति सत्या समिथा मितद्रौ ॥
श्रियं एवैनं तच्छ्रियामादधाति संततमृचा वषट्‌कृत्यं संतत्यै संधीयते प्रजया पशुभिर्य एवं वेद ॥
याज्यया यजति प्रत्तिर्वै याज्या पुण्यैव लक्ष्मी: पुण्यामेव तल्लक्ष्मीं संभावयति पुण्यां लक्ष्मीं संस्कुरूते ॥
चक्षुर्दं सर्वलोकानां तिमिरस्य निवारणम्। आर्तिक्यं कल्पितं भक्त्या गृहाण परमेश्वरि ॥ आवाहितदेवताभ्यो नम: । मंगलमहानीराजनदीपं महार्तिक्यं समर्पयामि ॥
यानंतर प्रथम गणपतीची आरती म्हणावी. नंतर पुढे दिलेल्या विविध देवतांच्या आरत्या तसेच मुख्यदेवतेची आरती म्हणावी.

॥ अथ कर्पूरारति: नमस्कार: प्रदक्षिणा च ॥
महारती झाल्यावर कापूरारतीवर कापराच्या वड्या लावून ती आरती ओवाळावी.
कर्पूरदीपं सुमनोहरं प्रभो ददामि ते देववर प्रसीद ।
पापांधकारं त्वरितं निवारय प्रज्ञानदीपं मनसि प्रदीपय ॥
कापूरारती खाली ठेवून साष्टांग नमस्कार करावा.
घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहीन रूप तुझें ।
प्रेमें आलिंगीन आनंदे पूजीन भावें ओवाळीन म्हणे नामा ॥
देवाभोवती/स्वत:भोवती एक प्रदक्षिणा करावी.
त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव ॥
कायेन वाचा मनसैंद्रियैर्वा बुद्ध्यात्मन व प्रकृति स्वभावात्।
करोमि यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ॥
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्र भजे ॥
हरे राम हरे राम , राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण , कृष्ण कृष्ण हरे हरे ॥
यानंतर खालील मंत्रपुष्पांजली म्हणावी.
॥ अथ मंत्रपुष्पांजलि: ॥
सर्वांनी ओंजळीत अक्षता व फुले घेऊन पुढील मंत्रपुष्पांजली एका सुरात म्हणावी.
ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।
ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा: ॥
ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान्कामकामाय मह्यम्। कामेश्वरो वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नम: ॥ ॐ स्वस्ति ॥
साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति ॥ तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति ॥
यो वैतां ब्रह्मणो वेद अमृतेनाप्लुतां पुरीम्।
तस्मै ब्रह्म च ब्रह्मा च आयु: कीर्तिं प्रजां ददु: ॥
एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि । तन्नो दंति: प्रचोदयात्॥
नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णु: प्रचोदयात्॥
तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि । तन्नो रुद्र: प्रचोदयात् ॥
भास्कराय विद्महे महद्‌द्युतिकराय धीमहि । तन्नो आदित्य: प्रचोदयात्॥
महालक्ष्मीं च विद्महे विष्णुपत्‍नीं च धीमहि ।तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात्॥
परब्रह्मणे विद्महे गुरुदेवाय धीमहि । तन्नो गुरु: प्रचोदयात्॥
मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि ॥
देवावर अक्षता व फुले वाहावीत. सर्वांनी आपापल्या ओंजळीत अक्षता व फुले घेऊन खालील प्रार्थना म्हणावी.


॥ अथ देवप्रार्थना ॥
आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम्। पूजा चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ॥१॥
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर । यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ॥२॥
मत्सम:पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समो न हि । एवं ज्ञात्वा महादेवि यथायोग्यं तथा कुरु ॥३॥
अपराधसहस्त्राणि क्रियंतेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ॥४॥
अपराधशतं कृत्वा जगन्नाथेति चोच्चरेत्। यां गतिं समवाप्नोति न तां ब्रह्मादय: सुरा: ॥५॥
सापराधोऽस्मि शरणं प्राप्तम्त्वां जगदीश्वर।इदानीमनुकंप्योऽहं यथेच्छसि तथा कुरु ॥६॥
अज्ञानाद्विस्मृतेर्भ्रांत्या यन्न्यूनमधिकं कृतम्। तत सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर ॥७॥
गुह्यातिगुह्यगोप्त्रा त्वं गृहाणास्मत्कृतं जपम्। सिद्धिर्भवतु मे देव त्वत्प्रसादात्सुरेश्वर ॥८॥
कामेश्वरि जगन्नाथ सच्चिदानंदविग्रहे । गृहाणार्चामिमां प्रीत्या प्रसीद परमेश्वर ॥९॥
यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत्। तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर ॥१०॥
विसर्गबिंदुमात्राश्च पदपादाक्षराणि च । न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर ॥११॥
उपस्थितांनी रांगेने येऊन आपापल्या ओंजळीतील अक्षता व फुले देवावर वाहावीत.
 
॥ अथ देवीप्रार्थना ॥
आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम्। पूजा चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरि ॥१॥
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरि । यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ॥२॥
मत्सम:पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समो न हि । एवं ज्ञात्वा महादेवि यथायोग्यं तथा कुरु ॥३॥
अपराधसहस्त्राणि क्रियंतेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरि ॥४॥
अपराधशतं कृत्वा जगदंबेति चोच्चरेत्। यां गतिं समवाप्नोति न तां ब्रह्मादय: सुरा: ॥५॥
सापराधोऽस्मि शरणं प्राप्तम्त्वां जगदंबिके।इदानीमनुकंप्योऽहं यथेच्छसि तथा कुरु ॥६॥
अज्ञानाद्विस्मृतेर्भ्रांत्या यन्न्यूनमधिकं कृतम्। तत सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वरि ॥७॥
गुह्यातिगुह्यगोप्त्रा त्वं गृहाणास्मत्कृतं जपम्। सिद्धिर्भवतु मे देव त्वत्प्रसादात्सुरेश्वरि ॥८॥
कामेश्वरि जगन्मात: सच्चिदानंदविग्रहे । गृहाणार्चामिमां प्रीत्या प्रसीद परमेश्वरि ॥९॥
यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत्। तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वरि ॥१०॥
विसर्गबिंदुमात्राश्च पदपादाक्षराणि च । न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरि ॥११॥

उपस्थितांनी रांगेने येऊन आपापल्या ओंजळीतील अक्षता व फुले देवावर वाहावीत.
प्रार्थनेनंतर आपापल्या परंपरेनुसार व कुलाचारानुसार आपल्या इष्टदेवतेचे स्तवन करावे.

॥अथ तीर्थप्रसादग्रहणम्॥
शंखात शुद्धोदक घालून तो शंख खालील मंत्र म्हणत देवाभोवती तीन वेळा आरतीप्रमाणे ओवाळावा.
शंखमध्ये स्थितं तोयं भ्रामितं केशवोपरि ( किंवा देवतोपरि/सद्‌गुरूपरि) अंगलग्नं मनुष्याणां महापापं व्यपोहति ॥
उजव्या हाताच्या ओंजळीत शंखोदक घेऊन ते सर्वांवर व स्वत:वर शिंपडावे.
देवस्नानाचे तीर्थ पुरोहिताकडून किंवा स्वत: उजव्या हाताच्या गोकर्णमुद्रेत घ्यावे व पुढील मंत्र म्हणावा.
अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम्। विष्णु (देव/देवी/गुरु) पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्॥
तीर्थप्राशन करून पुढील प्रार्थना म्हणावी.
अच्युतानंतगोविंद-नामोच्चारणभेषजात्। नश्यंति सकला रोगा: सत्यं सत्यं वदाम्यहम्॥
दिवसभर उपवास असेल तर तीनदा , एरवी दोनदा वरीलप्रमाणे तीर्थ घ्यावे.
सर्वांना प्रसाद द्यावा. उपवास असेल तर प्रसाद म्हणून खडीसाखर/पेढा/फळ घ्यावे. प्रसादग्रहण करताना खालील मंत्र म्हणावा.
बहुजन्मार्जितं यन्मे देहेऽस्ति दुरितं हि तत्। प्रसादभक्षणात्सत्यं लयं याति सुनिश्चितम्॥ महाविष्णु (श्रीदेवता/श्रीसद्‌गुरु) प्रसादं तु गृहीत्वा भक्तिभावत: । सर्वांकामानवाप्नोति प्रेत्य सायुज्यमाप्नुयात्॥
पूजकाने शेवटी प्रसाद भक्षण करावा. तीर्थप्रसाद घेतल्यावर हस्तप्रक्षालन जरूर तर करावे. पूजेतील नारळ/फळ पुरोहिताकडून किंवा स्वत: ग्रहण करावा. त्याचप्रमाणे पत्‍नीच्या ओटीतही घालावा. त्यावेळी पुढील मंत्र म्हणावा.
कल्याणं चिंतितं कार्यं चिंतितार्थमनोरथा: । देवद्विजप्रसादेन सर्वे अर्था भवंतु मे (/ते) ॥
पुरोहिताने नारळ दिल्यास ' मे ' ऎवजी ' ते ' म्हणून ' इच्छितमनोरथ-फलसिद्धिरस्तु ' असा आशीर्वाद द्यावा व त्यावेळी पूजकाने ' तथास्तु ' असे म्हणावे.
॥अथ गणपत्यादिदेवतोत्थापनम्॥
सुपारी किंवा नारळावर गणपतिस्थापन केलेले असल्यास खालील मंत्राने उत्थापन करावे.
ओंजळीत अक्षता घेऊन पुढील प्रार्थना म्हणावी.
उत्तिष्ठ ब्रह्मणस्पते देवयंतस्त्वेमहे । उप प्र यंतु मरुत: सुदानव इंद्र प्राशूर्भवा सचा ॥
सुपारीवरील/नारळावरील गणपतीवर अक्षता वाहाव्यात.
॥ अथ कर्माते द्विराचमनम्॥
पूजा समाप्त झाल्यावर खालीलप्रमाणे द्विराचमन करावे.
डाव्या हातातील पळीने उजव्या हातात गोकर्णमुद्रेने पाणी घेऊन तीन वेळा प्राशन करावे.
ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: ।
उजव्या हातावरुन पाणी ताम्हनात सोडावे.
ॐ गोविंदाय नम: ॥
वरीलप्रमाणे तीन वेळा पाणी प्राशन करावे.
ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: ।
उजव्या हातावरुन पाणी ताम्हणात सोडावे.
ॐ गोविंदाय नम: ।
हात जोडावेत.
ॐ विष्णवे नमो , विष्णवे नमो , विष्णवे नम: ॥ प्रायश्चित्तान्यशेषाणि व्रतपूजात्मकानि वै । यानि तेषामशेषाणां कृष्णानुस्मरणं परम्॥ यस्य स्मृत्या च नामोक्त्या व्रतपूजाक्रियादिषु । न्यूनं संपूर्णतां याति सद्यो वंदे तमच्युतम्॥
कर्मांगभूत घातलेले पवित्रक ; दर्भाचे असल्यास ह्यानंतर ते विसर्जन करावे.
॥ अथ पूजासमारोप ॥

**********************************************************************************

आपापल्या प्रथेनुसार दीड/सहा/दहा दिवस गणेशोत्सव केल्यानंतर विसर्जनाच्या दिवशी उत्तरपूजा करावी.

॥अथ पारणाविधि: ॥ 

भोजनपात्रे वाढल्यानंतर प्रथम आचमन करून प्राणायाम करावा.

॥ अथ प्राणायाम: ॥ 
वैदिक गायत्रीमंत्राने वा 
यो देव: सवितास्माकं धियो धर्माधिगोचरे । प्रेरयेत् तस्य तद् भर्गस् तद् वरेण्यमुपास्महे ॥ 

ह्या पुराणोक्त गायत्रीमंत्राने अथवा आपापल्या इष्टदेवतेच्या नाममंत्राने खालीलप्रमाने प्राणायाम करावा.

    पूरक - उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवून डाव्या नाकपुडीने श्वास घेत मनातल्या मनात उपरोक्त मंत्र एकदा म्हणावा.
    कुंभक - उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी आणि करंगळी व अनामिकेने डावीही नाकपुडी दाबून तोच मंत्र चारदा म्हणावा.
    रेचक -उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढून उजव्या नाकपुडीने श्‍वास सोडत तोच मंत्र दोनदा म्हणावा.

नंतर उजव्या हातात अक्षता घेऊन खालीलप्रमाणे पारण्याचा संकल्प करावा. 

एक पळी पाणी ताम्हणात सोडावे. 
तदंगतया पूजनपूर्वकं दक्षिणाप्रदानं च करिष्ये ॥ 
एक पळी पाणी ताम्हणात सोडावे. 
भोजनास निमंत्रित केलेल्या व्यक्तीच्या मस्तकावर अक्षता वाहाव्यात. 
नमोऽस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि-शिरोरूबाहवे । सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नम: ॥ 

गंध लावावे ; हातात फूल , विडा , दक्षिणा द्यावी व नमस्कार करावा. 
पूजक स्त्रीने निमंत्रित सुवासिनीच्या व कुमारीच्या मस्तकावर अक्षता वाहाव्यात. 
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम: । नम: प्रकृत्यै भद्रायै नियता: प्रणता: स्म ताम्॥ 
हळदीकुंकू लावून व वेणी किंवा गजरा बांधून विडादक्षिणा द्यावी आणि यथासाहित्य ओटी भरावी. 
त्यानंतर घरातील सर्वांनी निमंत्रितास नमस्कार करावा. भोजनसमयी सर्वांच्या पात्रांत सर्व अन्नपदार्थ व तूप वाढल्यावर पूजकाने गायत्रीमंत्र किंवा इष्टदेवतामंत्र म्हणत सर्व भोजनपात्रांवर तुलसीपत्राने शुद्ध जल प्रोक्षण करावे. नंतर पूर्वाभिमुख उभे राहून पुढील मंत्र म्हणून भोजनसंकल्पपूर्ती करावी. 
ॐ प्रजापते न त्वदेतान्यन्यो विश्वा जातानि परि ता बभूव । यत्कामास्ते जुहुमस्तन्नो अस्तु वयं स्याम पतयो रयीणाम्। एको विष्णुर्महद्भूतं पृथग्‌भूतान्यनेकश: । त्रीन्लोकान्व्याप्य भूतात्मा भुंक्ते विश्वभुगव्यय: ॥ अनेन अन्नसंतर्पणेन कर्मप्रधानदेवता प्रीयताम्॥ 
एक पळी पाणी ताम्हणात सोडावे. 
गायीची उपलब्धी असेल तर पुढील मंत्राने गोग्रास अभिमंत्रित करावा. 
सौरभेय्य: सर्वहिता: पवित्रा: पुण्यराशय: । प्रतिगृह्णंतु मे ग्रासं गावस्त्रैलोक्यमातर: ॥ 
हा गोग्रास नंतर गायीस द्यावा. 
त्यानंतर भोजनास प्रारंभ करण्यापूर्वी खालील प्रार्थना म्हणावी. 
यंतु नदयो वर्षंतु पर्जन्या: । सुपिप्पला ओषधयो भवंतु । अन्नवतामोदनवता ममिक्षवतां एषाराजा भूयासम्। ओदनमुद्‌ब्रुवते । परमेष्ठी वा एष: । यदोदन: । परमामेवैनश्रियं गमयति ॥ 

नम: पार्वतीपते हर हर महादेव ॥ वदनीं कवळ घेतां नाम घ्या श्रीहरीचें । सहज हवन होते नाम घेता फुकाचे । जीवन करीं जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ 

यानंतर आपापल्या इष्टदेवतेचा जयजयकार करावा. 
मंगलमूर्ते मोरया ॥ अवधूतचिंतन श्रीगुरूदेव दत्त ॥ व्यंकटरमण गोविंद गोविंद ॥ जगदंब उदयोऽस्तु , उदयोऽस्तु , उदयोऽस्तु ॥ पुंडलिकवरदा हरि विठ्ठल । श्रीज्ञानदेव तुकाराम ।पंढरीनाथ महाराज की जय ॥ छत्रपति शिवाजी महाराज की जय ॥ 
निमंत्रितांनी भोजनास प्रारंभ केल्यावर पूजकाने स्वत: भोजनप्रारंभ करावा. 

॥ अथ उत्तरपूजा ॥ 

प्रथम आचमन व प्राणायाम करून नंतर पुढीलप्रमाणे संकल्प करावा.
अद्य शुभतिथौ.... गणेशचतुर्थी व्रतपूर्तये उत्तरपूजां करिष्ये ॥

पाणी सोडावे.

आवाहितदेवताभ्यो नम: । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं (हरिद्राकुंकुमं) धूपदीपनैवेद्यं च समर्पयामि ॥ नमस्करोमि ॥

देवावर गंध , अक्षता , फुले व शेजारी हळदकुंकू वाहून उदबत्ती व नीराजन ओवाळावे. दहीभाताचा किंवा दूधसाखरेचा नैवेद्य दाखवून नमस्कार करावा.

यांतु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम्। इष्टकाम-प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ॥

सुपारीवर/तंदुलपुंजावर स्थापन केलेल्या देवतांवर अक्षता वाहाव्यात. मुख्यदेवतेचा टाक वा मूर्ती , बाळकृष्ण , शालग्राम अशा नित्यपूजेतील देवप्रतिकांवर विसर्जनाच्या अक्षता वाहू नयेत.
शेवटी पुढीलप्रमाणे कर्मांते द्विराचमन करावे.

ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: ।

उजव्या हातावरून पळीने ताम्हणात पाणी सोडावे.

ॐ गोविंदाय नम: ॥

वरीलप्रमाणे तीन वेळा पाणी प्राशन करावे.

ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: ।

उजव्या हातावरून पळीने ताम्हणात पाणी सोडावे.

ॐ गोविंदाय नम: ।

हात जोडावेत.

ॐ विष्णवे नम: , विष्णवे नमो , विष्णवे नम: ॥

मृत्तिकेच्या मूर्तींचे वाहत्या जलात/शेतात/बागेत विसर्जन करावे , जलाशयात/विहिरीत विसर्जन करू नये. उत्तरपूजेनंतर पूजा उतरवून साहित्य वेगवेगळ्या पुड्यांमध्ये बांधावे व ते पुरोहितास/मंदिरात/आर्थिकदृष्ट्या अक्षम व्यक्तीस द्यावे.

<poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:स्तोत्रे]]