Revision 39507 of "गोंधळाची संबळगीत" on mrwikisource

{{शीर्ष
 | शीर्षक      = {{लेखनाव}}
 | साहित्यिक     = 
 | विभाग  =
 | मागील =   
 | पुढील       = 
 | वर्ष       = 
 | टिपण      = 
}}
<poem>
लो लो लागला अंबेचा भेदाभेद कैचा
आला कंटाळा विषयाचा धंदा मुळ मायेचा ॥धृ.॥

प्रपंच खोटा हा मृगपाणी घोरे फिरती प्राणी
कन्यासुत दारा धन माझे मिथ्या वदतो वाणी
अंती नेतील हे यमदूत नये संगे कोणी
निर्गुण रेणुकां भवानी जपतो मी निर्वाणी ॥१॥

पंचभुतांचा अधिकार केलासे सत्वर
नयनी देखिला आकार अवघा जो ईश्वर
नाही सुख - दु:ख देहाला कैचा अहंकार
पाहे परमात्मा तो ध्यानी भासे शुन्याकार ॥२॥

ध्याता मुद्रा ही उन्मनी लागे अनुसंधानी
निद्रा लागली अभिध्यानी जे का निरंजनी
लिला वर्णिता स्वरुपाची शिणली शेष वाणी
तेथिल भवानी ती जननी त्रैलोक्याची पावनी ॥३॥

गोंधळ घालीन मी ब्रह्मीचा घोष अनुहाताचा
दिवटी उजळूनिया सदोदीत पोत चैतन्याचा
अहं सोहं हे उदो उदो बोले चारी वाचा ॥४॥

पहाता मुळ पीठ पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ
तेथे जगदंबा अवधुत दोघे भोपी भट
तेथे मोवाळे विंजाळे प्रणिता पाणी लोट
तेथे तानाजी देशमुख झाला ब्रह्मनिष्ठ ॥५॥

<poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:संबळगीत]]