Difference between revisions 1007136 and 1010790 on mrwiki

{{पानकाढा}}हत्यारे बनवणारा माणूस  विषय: इतिहास घटक: २ इयता: ३ री
 संयोजक: लक्ष्मण कुंडलिक वाठोरे  (अध्यापक)  विद्या मंदिर मालाईवाडा ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर पिन -४१५१०१ .
    माणसाची गोष्ट हजारो 
वर्षापूर्वी सुरु झाली .त्या 
काळातील माणसाची 
राहणी आपल्या राहणीपेक्षा
अगदी वेगळी होती .सर्वत्र 
घनदाट जंगल होते .माणूस 
(contracted; show full)व फेकून मारण्यासाठी उपयोगी पडतील असे वेगवेगळे आकार तो 
दगडांना देऊ लागला. सहज हातात पकडता येतील, दूरवर फेकता 
येतील अशी निरनिराळ्या प्रकारची हत्यारे त्याने तयार केली .

    माणूस अणकुचीदार आकार दिलेले दगड लाकडी दंड्यात 
बसवू  लागला. त्याचा भाल्यासारखा उपयोग करू लागला. त्यामुळे 
दूर अंतरांवरून जनावरांची शिकार करणे त्याला शक्य झाले .
भाला, धनुष्यबाण अशा हत्यारांच्या स
हाय्याने शिकार करणे 
आणखी सोपे झाले .मासेमारीसाठीही भाल्याचा उपयोग होऊ 
लागला.कुऱ्हाड,कुदल.सुरी यांसारखी दगडी हत्यारे ही तो वापरू 
लागला.जमिनीतील कंदमुळे काढणे ,झाडे तोडणे ,वेली कापणे 
यांसाठी माणसाला हत्यारे उपयोगी पडू लागली .पुढे शेतीच्या 
कामासाठी सुद्धा त्याने विविध अवजारे तयार केली .
माणसाने हत्यारे व अवजारे तयार करण्यासाठी दगडांप्रमाणे
इतर काही वस्तूंचा वापर केला .त्यांमध्ये जनावरांची हाडे ,शिंगे ,
माशांचे काटे अशा गोष्टी होत्या .त्यांपासून त्याने दाभण,बाणांची 
टोके गळ यांसारखी काही अवजारे तयार केली .
   
   पूर्वीच्या मानवाने तयार केलेली हत्यारे व अवजारे जगभर 
सापडली आहेत .भारतात सुद्धा ती सापडली आहेत .
दगडी हत्यारे तयार करून माणसाने प्रगतीचे पहिले पाउल 
टाकले .दगडाला 'अश्म' असे म्हणतात ,म्हणूनच या काळाचा 
उल्लेख "अश्मयुग " या नावाने केला जातो .
उपक्रम:-१.घरात विविध गोष्टींची दुरुस्ती करण्यासाठी कोणती हत्यारे वापरली 
जातात ,त्याची माहिती मिळावा .
२. शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची माहिती मिळावा .