Difference between revisions 1008974 and 1008979 on mrwiki

{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = अ‍ॅन फ्रॅंक
| चित्र = Anne Frank.jpg
| चित्र_रूदी = 200px
| चित्र_शीर्षक = मे, इ.स. १९४२मधील अ‍ॅन फ्रॅंक
| जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रॅंक (Annelies Marie Frank)
| जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}}
| जन्म_स्थान = [[फ्रांकफुर्ट|फ्रांकफुर्ट आम माइन]], [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]]
(contracted; show full)कने याआधीच कुटुंबाला कल्पना दिली होती की, लवकरच ते ओपेक्टा कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या छतातील गुप्त खोल्यांमध्ये लपण्यासाठी जातील. पण मार्गोला आलेल्या त्या नोटिशीमुळे त्यांनी ठरवले होते त्यापेक्षा कित्येक आठवडे आधीच त्यांना स्थलांतर करावे लागले. <!-- {{sfn|Müller|1999|p=153}} --> ती इमारत अ‍ॅम्स्टरडॅममधील कालव्यालगतच्या ''प्रिन्सेनग्राख्ट'' ({{lang-de|Prinsengracht}}) रस्त्यावर होती व त्यांच्या कार्यालयातील काही विश्वासू कर्मचारी त्यांना यात मदत करणार होते.

=== ''
अ‍ॅख्रह्युइाएस'' मधील आयुष्य ===

[[File:AnneFrankHouse Bookcase.jpg|thumb|alt=A three shelf timber bookcase, filled with books, stands at an angle in front of a doorway to the Secret Annexe|[[अ‍ॅन फ्रॅंक हाउस]]मधील पुनर्बांधणी केलेली अलमारी, या अलमारीने मागील गुप्त घराचे दार झाकले जात होते.]]

६ जुलै, इ.स. १९४२ रोजी, सोमवारी सकाळी,<!-- {{sfn|Müller|1999|p=163}} --> फ्रॅंक कुटुंब त्यांच्या गुप्त घरात राहण्यास गेले. (डच भाषेत ''अ‍ॅख्रह्युइाएस'' ({{Lang-de|Achterhuis }}) म्हणजे घराचा मागचा भाग. इंग्रजी भाषांतरात त्याला ''गुप्त विस्तारगृह''<ref group="श">गुप्त विस्तारगृह ({{Lang-en|secret annex}} - सिक्रेट अनेक्स)</ref> असे म्हटले गेले.) त्यांचे राहते घर ते जाणूनबुजून अस्ताव्यस्त अवस्थेत ठेवून गेले. त्यावरून ते घर सोडून पळून गेले असावेत असे शासनाला वाटावे अशी त्यांची योजना होती. ऑटो फ्रॅंकने घरात एक चिठ्ठीपण ठेवली होती. त्यामध्ये ते [[स्वित्झरलॅंड]]ला गेले आहेत असे दर्शविणारा मजकूर मुद्दाम लिहिला होता. नवीन ठिकाणी आवश्यक असलेल्या गुप्ततेमुळे त्यांना त्यांची मांजर ''मूर्तजे'' हिला मागेच ठेवून द्यावे लागले. ज्यू लोकांना सार्वजनिक परिवहन<ref group="श">सार्वजनिक परिवहन ({{Lang-en|public transport}} - पब्लिक ट्रांसपोर्ट)</ref> वापरण्यास बंदी असल्यामुळे ते अनेक किलोमीटर पायी चालत गेले. सामान घेऊन रस्त्यातून जातांना दिसू नये म्हणून प्रत्येकाने अंगावर अनेकपदरी कपडे घातले होते.<!-- {{sfn|Lee|2000|pp=105–106}} --> त्यांचे ''अ‍ॅख्रह्युइाएस'' ही एक तीन मजली इमारत होती. ओपेक्टाच्या वरच्या बाजूने त्याचे प्रवेशद्वार होते. त्यात पहिल्या मजल्यावर दोन छोट्या खोल्या व त्याला लागून एक शौचालय व प्रसाधगृह होते. त्यावरच्या मजल्यावर एक मोठी खोली व एक छोटी खोली होती. छोट्या खोलीत वर माळ्यावर<ref group="श">माळा ({{Lang-en|attic}} -अ‍ॅटिक)</ref> जाणारी एक शिडी होती. ''अ‍ॅख्रह्युइाएस''चे प्रवेशद्वार एका पुस्तकांच्या अलमारीने झाकून ठेवले होते. ओपेक्टाची मुख्य इमारत जूनी, साधी व नजरेत न भरणारी होती. अ‍ॅम्स्टरडॅमच्या पश्चिम भागात वेस्टरकर्कजवळ ही इमारत होती.<!-- {{sfn|Westra et al.|2004|pp=45, 107–187}} -->

(contracted; show full)

१ ऑगस्ट, इ.स. १९४४च्या तिच्या शेवटच्या नोंदीपर्यंत ती नियमीतपणे दैनंदिनी लिहीत होती.

== अटक ==
[[File:Hut-AnneFrank-Westerbork.jpg|thumb|alt=Taken from outside the reconstruction of a barracks, the photo shows a [[barbed wire]]fence, and beyond it a grassy area with a small timber hut|ऑगस्ट ते सप्टेंबर इ.स. १९४४ पर्यंत अ‍ॅनला ठेवण्यात आलेल्या तात्पुरच्या छावणीची करण्यात आलेली पुनर्बांधणी]]

दिनांक ४ ऑगस्ट इ.स. १९४४च्या सकाळी अचानक ''
अ‍ॅख्रह्युइाएस''वर जर्मन पोलिसांनी<ref group="टीप">ग्रून पोलिझि ({{lang-de|Grüne Polizei}} - हिरवे पोलिस) - इ.स. १९३६ ते इ.स. १९४५ दरम्यानची गणवेशधारी जर्मन पोलिस सेना. यांच्या हिरव्या गणवेशामुळे त्यांना ''हिरवे पोलिस'' म्हटले जात असे. यांचे अधिकृत नाव ''ऑर्डनंगपोलिझी'' ({{lang-de|Ordnungspolizei}}) होते.</ref> छापा घातला. एका अज्ञात खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे हा छापा घातला गेला. त्या खबऱ्या कोण होता ते अजूनही प्रकाशात आले नही आहे. <!-- {(contracted; show full)

व्हिक्टर कुग्लर आणि योहान्स क्लिमन यांना अटक केली गेली आणि शासनाचे शत्रू म्हणून [[अ‍ॅमर्सफूर्ट]] येथे कैदेत टाकण्यात आले. क्लिमनला सात अठवड्यांनंतर सोडून दिले गेले मात्र कुग्लर युद्धाच्या शेवटापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सश्रम कारावासात होता.<!-- {{sfn|Müller|1999|p=291}} --> मीप खीस व बेप वोस्कुइजची उलटतपासणी घेण्यात आली व त्यांना धमकावले गेले मात्र त्यांना अटक झाली नाही. दुसऱ्या दिवशी ते ''
अ‍ॅख्रह्युइाएस''वर परत आले. तिथे त्यांना अ‍ॅनची दैनंदिनी सापडली, तसेच त्यांनी काही छायाचित्रे गोळा केले. अ‍ॅन परत आल्यावर आपण ते तिला परत करू असा निर्धार मीपने केला. ७ ऑगस्ट, इ.स. १९४४ रोजी ती परत कार्ल सिल्बरबाउरला जाऊन भेटली व त्याला पैसे देऊन कैद्यांना सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्याला नकार दिला. <!--{{sfn|Müller|1999|p=279}} -->

== छळछावणीत रवानगी व मृत्यू ==

(contracted; show full)

आउश्वित्झ लोकांना रेल्वेतून काढून त्यातील पुरुषांना स्त्रियांपासून व मुलांपासून बळजबरीने वेगळे केले गेले. ऑटो फ्रॅंकला त्याच्या कुटुंबापासून हिसकावून दूर केले गेले. रेल्वेतील १,०१९ प्रवाशांपैकी ५४९ प्रवाशांना तडक विषारी वायूच्या कोठडीत पाठवून मारण्यात आले. त्यामध्ये १५ वर्षापेक्षा लहान असलेल्या सर्व मुलांचा समावेश होता. अ‍ॅनने तीन महिन्यांपूर्वीच १५ वर्षे पूर्ण केले असल्याने ती यातून वाचली. वाचलेल्या लोकांत ती सर्वात तरूण होती. तिला नंतर याबद्दल कत्तलीबद्दल कळाले, पण शेवटपर्यंत ''
अ‍ॅख्रह्युइाएस''मधले सर्वजण या कतलीतून वाचले होते हे तिला माहित नव्हते. तिचे वडील पन्नाशीच्या वरचे होते व शारिरिकदृष्ट्या तितके बळकट नव्हते, त्यामुळे त्यांना बहुदा मारले असावे असा तिने निष्कर्ष काढला. <!-- {{sfn|Müller|1999|pp=246–247}} -->

(contracted; show full)[[tr:Anne Frank]]
[[uk:Анна Франк]]
[[vec:Ana Frank]]
[[vi:Anne Frank]]
[[wa:Anne Frank]]
[[war:Anne Frank]]
[[yi:אנא פראנק]]
[[zh:安妮·弗蘭克]]