Difference between revisions 1012271 and 1012274 on mrwiki१) रात्रंदिवस मन राघवी असावे । चिंतन नसावे कांचनाचे। कांचनाचे ध्यान परस्त्री चिंतन । जन्मासी कारण ही ची दोन्ही । दोन्ही नको धरू नको निंदा करू । तेणे हा संसारू तरसील । तरसील भवसागरी बुडता । सत्य या अनंताची नामे । नामरूपातीत जाणावा अनंत । दास म्हणे संत संग धरा । । २) येथे कां रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥ काय केली सीतामाई । येथे राही रखुमाई ॥ काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥ काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥ धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥ काय केले वानरदल । येथे मिळविले गोपाळ ॥ रामीरामदासी भाव । तैसा होय पंढरिराव ॥ ३) रत्नजडित सिंहासन । वरी शोभे रघुनंदन ॥१॥ वामांकीं ते सीताबाई । जगज्जननी माझी आई ॥२॥ पश्चाद्भागीं लक्षुमण । पुढें अंजनीनंदन ॥३॥ भरत शत्रुघन भाई । चामरें ढाळिती दोन्ही बाहीं ॥४॥ नळनीळ जांबुवंत । अंगद सुग्रीव बिभीषण भक्त ॥५॥ देहबुद्धि नेणों कांहीं । दास अंकित रामापायीं ॥६॥ ४)ध्यान लागलें रामाचें । दुःख हरलें जन्माचें ॥१॥ राम पदांबुजावरी । वृत्ति गुंतली मधुकरी ॥२॥ रामवदनमयंकीं । चक्षुचकोर जाले सुखी ॥३॥ तनुमेघश्याम मेळे । चित्तचातक निवाले ॥४॥ कीर्तिसुगंधतरुवरी । कुजे कोकिळा वैखरी ॥५॥ रामीरामदासस्वामी । प्रगटले अंतर्यामीं ॥६॥ ५)काय रे निष्ठुर रामा ।सोडुनी जातोसी आम्हा । तुजविणे गुणधामा कंठवेना ॥ध्रु॥ तुझीया वियोगे जाण । मी न ठेवी प्राण । लटिके केली तरि आण । मजला तुझी ॥१॥ धनु भंगीले हेळा । वरिली जनकबाळा । तया मार्गीचा सोहळा । वनवासी ॥२॥ रामी रामदास भाव । बंदी पडले ते देव । सर्व सांडुनिया धाव । घातली रामें ॥३॥ आपल्या मातेसाठी समर्थांनी एका अभंगाची रचना केली. . होते वैंकुंठीचे कोनी । शिरले अयोध्याभुवनी । लागे कौसल्येचे स्तनी । तेचि भूत गे माये ॥ जाता कौशिक राऊळी । अवलोकिली तये काळी । ताटिका ते छळूनि मेली । तेचि भूत गे माये ॥ मार्गी जाता वनांतरी । पाय पडला दगडावरी । पाषाणाची जाली नारी । तेचि भूत गे माये ॥ जनकाचे अगंणी गेले । शिवाचे धनु भंगिले । वैदेही अंगे संचारले । तेचि भूत गे माये ॥ जेणे सहस्त्रार्जुन वधिला । तोहि तत्काळचि भ्याला । धनु देऊनि देह रक्षिला । तेचि भूत गे माये ॥ पितयाचे भाकेशी । कैकयीचे वचनासी । मानुनी गेले अरण्यासी । तेचि भूत गे माये ॥ चौदा संवत्सर तापसी । अखंड हिंडे वनवासी । सांगाते भुजंग पोसी । तेचि भूत गे माये ॥ सुग्रीवाचे पालन । वालीचे निर्दालन । तारी पाण्यावरी पाषाण । तेचि भूत गे माये ॥ रक्षी भक्त बिभीषण । मारी रावण कुंभकर्ण । तोडी अमरांचे बंधन । तेचि भूत गे माये ॥ सर्वां भूतांचे हृदय । नाम त्याचे रामराय । रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माये ॥ ⏎ ⏎ 6)हनुमंत आमची कूळवल्ली | राम मंडपा वेला गेली |श्रीरामभक्तीने फळली | रामदास बोले या नावे || आमुचे कुळी हनुमंत | हनुमंत आमुचे मुख्य दैवत |तयावीण अमुचा परमार्थ | सिद्धीते न पवे सर्वथा || साह्य आम्हासी हनुमंत | आराध्यदैवत श्रीराघुनाथ |श्रीगुरू श्रीराम समर्थ | काय उणे दासासी || दाता एक रघुनंदन | वरकड लंडी देईल कोण |तया सोडोन आम्ही जन | कोणाप्रती मागावे || म्हणोनि आम्ही रामदास | श्रीरामचरणी आमुचा विश्वास |कोसाळोनि पडो हे आकाश | आणिकाची वास न पाहू || स्वरूपसांप्रदाय अयोध्यामठ | जानकीदेवी श्रीराघुनाथ दैवत |मारुती उपासना नेमस्त | वाढविला परमार्थ रामदासी || स्वधामासी जाता महा रामराजा | हनुमंत तो ठेविला याची काजा |सदासर्वदा रामदासासी पावें | खळी गांजीता ध्यान सांडोन धावे ||⏎ {{वर्ग}} All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1012274.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|