Difference between revisions 1034015 and 1034021 on mrwiki

डॉ. तात्याराव लहाने. मुंबईच्या जे.जे.रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमूख . लातुर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेडेगावात जन्मलेल्या तात्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षणही इथेच झाले.पुढे स्वतःच्या हुशारीने आणि शिक्षकांच्या मदतीने त्यांना डॉक्टर कसे होता आले ते त्यांच्याच शब्दात ऐकणे जास्त योग्य होईल. आजवर तात्यांनी एक लाखावर नेत्रशस्त्रक्रिया केलेल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी लढत, सतत पैशाची चणचण सहन करत ते डॉक्‍टर झाले. ते सरकारी नोकरीत लागले; पण तेथील तुटपुंज्या पगारात भागवता भागवता मेटाकुटीला आल्यामुळे खासगी प्रॅक्‍टिस सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात तीव्रतेने येत होता; पण १९९१ मध्ये अगदी लहान वयातच मूत्रपिंडाचा विकार झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. त्यांना आईचीच किडनी बसवण्यात आली आणि डॉ. लहाने यांचा जणू पुनर्जन्मच झाला. बरे झाल्यानंतर खासगी प्रॅक्‍टिसचा विचार डोक्‍यातून काढून टाकून आता हे नव्याने मिळालेले आयुष्य पूर्णपणे गरीब-गरजू रुग्णांच्या सेवेत घालवायचे, असा ठाम निश्‍चय त्यांनी केला. 
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://mr.upakram.org/node/422
| शीर्षक =डॉ.तात्याराव लहाने! एक मोठ्ठा माणूस!
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[http://mr.upakram.org/node/422 ]]
| दिनांक =१७ जुन , इ.स. २००७
| ॲक्सेसदिनांक =७ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>

तात्याराव लहाने मनुष्यसेवाच ईश्वरसेवा म्हणून रुग्णांची सेवा करत आले . पंचवीस वषेर् रुग्णांच्या सेवेत केली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2765659.cms
| शीर्षक =मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =८ फेब्रुवारी, इ.स. २००८
| ॲक्सेसदिनांक =७ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>

लाखो लोकांना नवी दृष्टी देणारे डॉक्‍टर म्हणून महाराष्ट्र तात्याराव लहाने यांना ओळखतो; पण त्यांचे काम हे केवळ ऑपरेशन्सची संख्या वाढवण्यापुरते किंवा खेडोपाडी जाऊन ऑपरेशन्स करणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. एका सरकारी रुग्णालयाला अत्याधुनिक आणि आरोग्य यंत्रणेला रुग्णाभिमुख करण्याचे आव्हान स्वीकारणारा प्रशासक म्हणूनही डॉ. लहाने यांच्या कारकिर्दीकडे पाहावे लागते. हे काम यशस्वी करण्यासाठी केवळ कळवळा नाही, तर दूरदृष्टीही लागते. तात्याराव लहाने यांची कथा ही अशाच दूरदृष्टीची कथा आहे. "जे. जे.'सारख्या सरकारी रुग्णालयात हा बदल घडवून आणला आहे प्रख्यात नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांनी! "विक्रमी शस्त्रक्रिया करणारे डोळ्यांचे डॉक्‍टर' म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. लहाने सध्या जे. जे. रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. रुग्णांची सोय केंद्रस्थानी ठेवून त्यांनी नेत्रशल्यचिकित्सा विभागाचा तर कायापालट केलाच; पण "जे. जे.'तील प्रत्येक विभाग आणि यंत्रणा कार्यक्षम आणि रुग्णाभिमुख बनवण्यावर त्यांनी भर दिला हे विशेष. सर्वसामान्य रुग्णांना सरकारी रुग्णालयांखेरीज दुसरा पर्याय नसतो; पण त्यांच्या हातात पैसा नाही, म्हणून त्यांना कमी दर्जाच्या सेवाच मिळणार, हे दुष्टचक्र तोडणे हेच डॉ. लहाने यांनी आपले काम मानले. जे काम करायचे ते पूर्ण झोकून देऊन आणि त्यातल्या समस्यांना हात घालत, हे जणू डॉ. लहाने यांच्या स्वभावातच होते. त्यामुळे सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून गरीब रुग्णांवर शस्त्रक्रिया करत राहणे, असा सरधोपट मार्ग ते स्वीकारतील अशी शक्‍यता नव्हती. 1994 मध्ये डॉ. लहाने "जे. जे.'च्या नेत्रशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख म्हणून रुजू झाले, तेव्हा हा विभाग रुग्णांसाठी जास्तीत जास्त कसे काम करू शकेल याचाच विचार त्यांच्या डोक्‍यात घोळत होता. त्यामुळे, मोतीबिंदूची ऑपरेशन्स करणारी फेको मशिन्स विकत घेण्याचा निर्णय त्यांनी इथे दाखल झाल्या झाल्या घेतला. आज "जे. जे.'मध्ये तब्बल 9 फेको मशिन्स आहेत. एवढी मशिन्स कोणत्याही शासकीय, निमशासकीय; एवढेच काय, खासगी रुग्णालयांतही नाहीत. पूर्वी वर्षाला 600 डोळ्यांच्या शस्त्रक्रिया इथे व्हायच्या. आज तोच आकडा वीस हजारांच्या वर गेला आहे. ज्या शस्त्रक्रिया आधी टाके घालून केल्या जायच्या, त्या आज फेको टेक्‍नॉलॉजीद्वारे केल्या जातात. यामध्ये 3 एम.एम.चे भोक पाडून सात मिनिटांत शस्त्रक्रिया पूर्ण केली जाते. खासगी रुग्णालयात या पद्धतीने केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी 15 ते 50 हजार रुपये मोजावे लागतात. "जे. जे.'त मात्र हीच शस्त्रक्रिया मोफत होते. "जे. जे.'च्या नेत्रविभागाची घडी बसवल्यावर डॉ. लहाने यांनी एकूण राज्यभरातील ग्रामीण आणि गरीब जनतेच्या नेत्रसमस्यांचा अभ्यास करायला सुरवात केली. "जे. जे.'मधील अनुभवामुळे त्यांना एकूण परिस्थितीचा अंदाज येत होताच. त्यामुळे त्यांनी आपली रुग्णसेवा केवळ "जे. जे.'तल्या रुग्णांपुरती मर्यादित ठेवली नाही. 

===खेड्यापाड्यात शिबिरे ===
डॉ. लहाने यांनी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत जाऊन शिबिरे घेण्यास सुरवात केली. पारंपरिक शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला चाळीस दिवस विश्रांती घ्यावी लागत असे. त्यामुळे या रुग्णांचा महिन्याहून अधिक काळ रोजगार बुडत असे. स्वतः ग्रामीण भागातून आल्याने तेथील एक-एक दिवस किती मोलाचा असतो याची जाणीव डॉ. लहाने यांना होती. त्यामुळे या शिबिरांमधून त्यांनी बिनटाक्‍याच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरवात केली. त्यामुळे रुग्णांना नवी दृष्टी तर मिळालीच; पण त्यांची आर्थिक घडीही विस्कटत नसल्याने मोठ्या प्रम(contracted; show full)या स्टाफच्या मनोवृत्तीतही आमूलाग्र बदल घडवून आणला. घड्याळ्याच्या काट्यावर काम करणे मान्य नसल्याने डॉ. लहाने दिवसाचे 16 ते 18 तास काम करतात. शासकीय सुट्या असोत वा शनिवार-रविवार, ते कायम कामात व्यग्र दिसतात. लहाने यांचे कामाप्रती हे समर्पण आणि निष्ठा पाहून त्यांच्या स्टाफला शेवटी बदलावेच लागले. एवढेच नव्हे, तर "जे. जे.'चा नेत्रविभाग आज इथल्या प्रत्येक विभागासाठी एक रोल मॉडेल बनला आहे. "खरे तर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच हा बदल घडवून आणता आला,' असे डॉ. लहाने कृतज्ञतापूर्वक नमूद करतात. 

लाखो लोकांना नवी दृष्टी देणारे डॉक्‍टर म्हणून महाराष्ट्र तात्याराव लहाने यांना ओळखतो; पण त्यांचे काम हे केवळ ऑपरेशन्सची संख्या वाढवण्यापुरते किंवा खेडोपाडी जाऊन ऑपरेशन्स करणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. एका सरकारी रुग्णालयाला अत्याधुनिक आणि आरोग्य यंत्रणेला रुग्णाभिमुख करण्याचे आव्हान स्वीकारणारा प्रशासक म्हणूनही डॉ. लहाने यांच्या कारकिर्दीकडे पाहावे लागते. हे काम यशस्वी करण्यासाठी केवळ कळवळा नाही, तर दूरदृष्टीही लागते. तात्याराव लहाने यांची कथा ही अशाच दूरदृष्टीची कथा आहे. "जे. जे.'सारख्या सरकारी रुग्णालयात हा बदल घडवून आणला आहे प्रख्यात नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांनी! "विक्रमी शस्त्रक्रिया करणारे डोळ्यांचे डॉक्‍टर' म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. लहाने सध्या जे. जे. रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. रुग्णांची सोय केंद्रस्थानी ठेवून त्यांनी नेत्रशल्यचिकित्सा विभागाचा तर कायापालट केलाच; पण "जे. जे.'तील प्रत्येक विभाग आणि यंत्रणा कार्यक्षम आणि रुग्णाभिमुख बनवण्यावर त्यांनी भर दिला हे विशेष. सर्वसामान्य रुग्णांना सरकारी रुग्णालयांखेरीज दुसरा पर्याय नसतो; पण त्यांच्या हातात पैसा नाही, म्हणून त्यांना कमी दर्जाच्या सेवाच मिळणार, हे दुष्टचक्र तोडणे हेच डॉ. लहाने यांनी आपले काम मानले. जे काम करायचे ते पूर्ण झोकून देऊन आणि त्यातल्या समस्यांना हात घालत, हे जणू डॉ. लहाने यांच्या स्वभावातच होते. त्यामुळे सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून गरीब रुग्णांवर शस्त्रक्रिया करत राहणे, असा सरधोपट मार्ग ते स्वीकारतील अशी शक्‍यता नव्हती. 1994 मध्ये डॉ. लहाने "जे. जे.'च्या नेत्रशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख म्हणून रुजू झाले, तेव्हा हा विभाग रुग्णांसाठी जास्तीत जास्त कसे काम करू शकेल याचाच विचार त्यांच्या डोक्‍यात घोळत होता. त्यामुळे, मोतीबिंदूची ऑपरेशन्स करणारी फेको मशिन्स विकत घेण्याचा निर्णय त्यांनी इथे दाखल झाल्या झाल्या घेतला. आज "जे. जे.'मध्ये तब्बल 9 फेको मशिन्स आहेत. एवढी मशिन्स कोणत्याही शासकीय, निमशासकीय; एवढेच काय, खासगी रुग्णालयांतही नाहीत. पूर्वी वर्षाला 600 डोळ्यांच्या शस्त्रक्रिया इथे व्हायच्या. आज तोच आकडा वीस हजारांच्या वर गेला आहे. ज्या शस्त्रक्रिया आधी टाके घालून केल्या जायच्या, त्या आज फेको टेक्‍नॉलॉजीद्वारे केल्या जातात. यामध्ये 3 एम.एम.चे भोक पाडून सात मिनिटांत शस्त्रक्रिया पूर्ण केली जाते. खासगी रुग्णालयात या पद्धतीने केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी 15 ते 50 हजार रुपये मोजावे लागतात. "जे. जे.'त मात्र हीच शस्त्रक्रिया मोफत होते. "जे. जे.'च्या नेत्रविभागाची घडी बसवल्यावर डॉ. लहाने यांनी एकूण राज्यभरातील ग्रामीण आणि गरीब जनतेच्या नेत्रसमस्यांचा अभ्यास करायला सुरवात केली. "जे. जे.'मधील अनुभवामुळे त्यांना एकूण परिस्थितीचा अंदाज येत होताच. त्यामुळे त्यांनी आपली रुग्णसेवा केवळ "जे. जे.'तल्या रुग्णांपुरती मर्यादित ठेवली नाही. 

===डॉ. तात्याराव लहाने यांचा करिअरग्राफ ===
1981 : मराठवाडा विद्यापीठातून मेडिसिनमधील पदवी प्राप्त. 

1985 : एम.बी.बी.एस. इन ऑप्थॉमॉलॉजी. 

1994 : जे.जे.रुग्णालय - नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख. 

2004 : "जे. जे.'त रेटिना विभागाची सुरवात. 

2007 : मोतीबिंदूवरील एक लाखावी यशस्वी शस्त्रक्रिया. 

2008 : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित. 

2010 : जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता

<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.saptahiksakal.com/saptahiksakal/20111231/5312878196652021601.htm
| शीर्षक =लाखमोलाची "दृष्टी'
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =३१ डिसेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =७ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>

== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भसूची}}

== बाह्य दुवे ==
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2765659.cms महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रातील तात्याराव लहानेवरील लेख:  मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा]