Difference between revisions 1034021 and 1034023 on mrwikiडॉ. तात्याराव लहाने. मुंबईच्या जे.जे.रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमूख . लातुर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेडेगावात जन्मलेल्या तात्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षणही इथेच झाले.पुढे स्वतःच्या हुशारीने आणि शिक्षकांच्या मदतीने त्यांना डॉक्टर कसे होता आले ते त्यांच्याच शब्दात ऐकणे जास्त योग्य होईल. आजवर तात्यांनी एक लाखावर नेत्रशस्त्रक्रिया केलेल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी लढत, सतत पैशाची चणचण सहन करत ते डॉक्टर झाले. ते सरकारी नोकरीत लागले; पण तेथील तुटपुंज्या पगारात भागवता भागवता मेटाकुटीला आल्यामुळे खासगी प्(contracted; show full)्हे, तर परदेशांतील कोणत्याही शासकीय, निमशासकीय अथवा खासगी रुग्णालयात झाल्या नसतील एवढ्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया डॉ. लहाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या तीस वर्षांमध्ये केल्या आहेत. मोतीबिंदूच्या एक लाख चाळीस हजारांहून अधिक शस्त्रक्रिया करण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. हे अशक्य काम कसे शक्य झाले, याबद्दल विचारल्यावर डॉ. लहाने अगदी साधे सोपे उत्तर देतात, ""मी माझे काम करत राहिलो. रुग्णांच्या माझ्यावरील विश्वासामुळेच ही कामगिरी मी करू शकलो.'' कर्मचाऱ्यांचेही सहकार्य डॉ. लहाने यांनी आतापर्यंत 1 लाख 41 हजार वृद्धांवर मोतिबिंदूंच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. तर आजपर्यंत तब्बल 1 कोटी 10 लाख रुग्णांची तपासणी केलेली आहे. 477 मोफत नेत्रशस्त्रक्रिया शिबिरे, त्यापैकी 175 विनाटाक्याची शस्त्रक्रिया शिबिरे त्यांनी घेतलेली आहेत. बाबा आमटे यांच्या आनंदवनात 14 नेत्रशस्त्रक्रिया शिबिरे घेऊन त्यातून दीड हजार कुष्ठरुग्णांना नवी दृष्टी दिली. जन्मतः अंध असलेल्या 10 हजार व्यक्तींवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीवनात रंग भरविला. अगदी 20 दिवसांच्या बाळापासून ते 102 वर्षांच्या वृद्धापर्यंत त्यांनी नेत्रशस्त्रक्रिया केलेल्या आहेत. डॉ. लहाने आणि त्यांच्या "टीम'ने मिळून वेगवेगळ्या शिबिरांमधून 3 लाख 20 हजार शस्त्रक्रिया केल्या. समाजसेवा करताना डॉ. लहाने यांना जोड मिळते ती त्यांच्या "टीम'ची. टीमशिवाय मी हे कार्य करू शकत नाही, असे डॉ. लहाने सांगतात. त्यांच्या प्रत्येक शिबिराच्या वेळी त्यांच्यासोबत एकूण 67 कर्मचारी असतात. मुंबईत असल्यावर डॉ. लहाने 14 तास सेवेत असतात. तर मुंबईच्या बाहेर असल्यास तब्बल 18 तास नेत्रचिकित्सेमध्ये घालवतात. विशेष म्हणजे त्यांचा जो 67 कर्मचाऱ्यांचा चमू आहे त्यांनीदेखील डॉ. लहानेंसारखीच "लाईफ' स्वीकारली आहे. ⏎ ⏎ आज "जे. जे.'मध्ये डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतूनच नव्हे, तर देशभरातून रुग्ण येतात आणि या प्रत्येक रुग्णाला डॉ. लहाने यांच्याकडूनच उपचार करून घ्यायचे असतात. रुग्णांच्या या इच्छेचा आदर करत डॉ. लहाने आपल्यापरीने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. इथे आलेला रुग्ण हा आपला जवळचा असावा याच पद्धतीने ते व त्यांच्या विभागातील कर्मचारीही वागताना दिसतात. "सहकाऱ्यांवर विश्वास टाकला, की ही मंडळी कोणतेही आव्हान स्वीकारायला तयार असतात, असे मला जाणवले. शिवाय प्रत्येक माणसामध्य(contracted; show full)| ॲक्सेसदिनांक =७ ऑगस्ट, इ.स. २०१२ }}</ref> == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भसूची}} == बाह्य दुवे == * [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2765659.cms महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रातील तात्याराव लहानेवरील लेख: मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1034023.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|