Difference between revisions 1044585 and 1047498 on mrwiki

डॉ. तात्याराव लहाने. मुंबईच्या जे.जे.(जमशेदजी जिजीभॉय) रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमुख आहेत. लातूर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेडेगावात जन्मलेल्या तात्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षणही तेथेच झाले. पुढे स्वतःच्या हुशारीने आणि शिक्षकांच्या मदतीने ते डॉक्टर झाले.  प्रतिकूल परिस्थितीशी लढत, सतत पैशाची चणचण सहन करत ते डॉक्‍टर झाले. ते सरकारी नोकरीत लागले; पण तेथील तुटपुंज्या पगारात भागवता भागवता मेटाकुटीला आल्यामुळे खासगी प्रॅक्‍टिस सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात तीव्रतेने येत होता. पण १९९१ मध्ये अगदी लहान वयातच मूत्रपिंडाचा विकार झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. त्यांना आईचीच किडनी बसवण्यात आली आणि डॉ. लहाने यांचा जणू पुनर्जन्मच झाला. बरे झाल्यानंतर खासगी प्रॅक्‍टिसचा विचार डोक्‍यातून काढून टाकून आता हे नव्याने मिळालेले आयुष्य पूर्णपणे गरीब-गरजू रुग्णांच्या सेवेत घालवायचे, असा ठाम निश्‍चय त्यांनी केला. 
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://mr.upakram.org/node/422
| शीर्षक =डॉ.तात्याराव लहाने! एक मोठ्ठा माणूस!
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[http://mr.upakram.org/node/422 ]]
| दिनांक =१७ जून , इ.स. २००७
| ॲक्सेसदिनांक =७ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>

मनुष्यसेवाच हीच ईश्वरसेवा असे म्हणत पंचविसाहून अधिक वर्षे तात्याराव लहाने रुग्णांच्या सेवेत आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2765659.cms
| शीर्षक =मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =८ फेब्रुवारी, इ.स. २००८
| ॲक्सेसदिनांक =७ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>

{{कॉपीपेस्ट | विभाग | दुवा = http://www.saptahiksakal.com/saptahiksakal/20111231/5312878196652021601.htm }}
===खेड्यापाड्यात शिबिरे ===
डॉ. लहाने यांनी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत जाऊन शिबिरे घेण्यास सुरुवात केली. पारंपरिक शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला चाळीस दिवस विश्रांती घ्यावी लागत असे. त्यामुळे या रुग्णांचा महिन्याहून अधिक काळ रोजगार बुडत असे. स्वतः ग्रामीण भागातून आल्याने तेथील एक-एक दिवस किती मोलाचा असतो याची जाणीव डॉ. लहाने यांना होती. त्यामुळे या शिबिरांमधून त्यांनी बिनटाक्‍याच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रुग्णांना नवी दृष्टी तर मिळालीच; पण त्यांची आर्थिक घडीही विस्कटत नसल्याने मोठ्या प्(contracted; show full)
१८ फेब्रुवारी २०११ : [[समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन]] या अधिवेशनादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान

== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भसूची}}

== बाह्य दुवे ==
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2765659.cms महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रातील तात्याराव लहानेवरील लेख:  मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा]