Difference between revisions 1050581 and 1050582 on mrwiki

{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग = 
| नाव = संजय सोनवणी 
| चित्र = Sanjay_Sonawani.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = 
| पूर्ण_नाव = संजय सोनवणी
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1964|14|8}} 
| जन्म_स्थान = [[जळगाव]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र =  लेखन, संपादन, प्रकाशन, व्याख्याता, व्यावसायिक 
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], 
| कारकीर्द_काळ = [[इ.स. १९८०]] - चालू
| प्रमुख_चित्रपट = मराठी: [[चित्रपट|अमानुष-एक थरार ‌]]
| प्रमुख_पुस्तके = आणि पानिपत, नीतिशास्त्र 
| वडील_नाव = देविदास सोनवणी  
| आई_नाव =  इंदुमती सोनवणी
| पती_नाव = 
| पत्नी_नाव = पुष्पा सोनवणी
| अपत्ये = सोनल सोनवणी, अनिकेत सोनवणी
| संकेतस्थळ = http://sanjaysonawani.blogspot.in/
| तळटिपा = 
}}

'''संजय सोनवणी''' (जन्म १४ ऑगस्ट १९६४): 
हे मराठीतील एक साहित्यिक, ब्लॉगर आहेत. संजय सोनवणी यान्ची  सामाजिक प्रश्नांवरची भूमिका अनेकदा वादग्रस्तही ठरली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेला त्यांचा [[नीतिशास्त्र]] हा नैतिक समस्यांबद्दलचा चिंतनपर ग्रंथ प्रसिद्ध आहे. कथा, कादम्बरी, कविता असे चौफेर लेखन  त्यांनी केले आहे.

==जीवन== 

[[महाराष्ट्र]], [[जळगाव]] जिल्ह्यात संजय सोनवणींचा जन्म श्री. देविदास सोनवणी आणि सौ. इंदुमती सोनवणी या दांपत्याच्या घरी झाला. वडील श्री देविदास सोनवणी हे प्राथमिक शिक्षक होते. नोकरीनिमित्ताने सतत बदल्या होत असल्याने संजय सोनवणींचे प्रारंभिक जीवन भटकण्यातच गेले. शेवटी वडिलांनी [[पुणे]] जिल्ह्यात बदली करून घेतली. शिरूर तालुक्यातील वरुडे, गणेगाव, चिंचोली, कन्हेरसर आणि शेवटी पाबळ येथे स्थलांतरे झाली.  त्यांनी राजगुरुगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून बी. कॉम ही पदवी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण होऊन मिळवली. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. येथे त्यांनी [[दै. आज का आनंद]]  या हिंदी वृत्तपत्रात पत्रकारितेचे काम करत एम.कॉम ही पदवीही प्रथम श्रेणीत प्राप्त केली. त्यानंतर काही काळ त्यांनी [[क्राइम रिपोर्टिंग|देखील]]   केले. {{संदर्भ हवा}}

उद्योगजगताला त्यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि नक्षलवादाने ग्रस्त अशा भागात उद्योग उभारून त्यांनी उद्योजकांचे विकेंद्रित विकासासाठी कसे योगदान असायला हवे याचा आदर्श घालून दिला. स्वतः संशोधन करत धातु-भुकटी विज्ञानात (Powder metallurgy) मोलाची भर घातली आणि मराठी माणसाला उद्योगधंद्यात येण्याची प्रेरणा दिली. ५००० रुपयांच्या भांडवलावर सुरुवात करत त्यांनी नंतर अनेक उद्योग स्थापन केला. वयाच्या ३१ व्या वर्षी ते २ लिस्टेड कंपन्यांचे संस्थापक अध्यक्ष बनले. त्यांनी लेह (लडाख) येथेही फळप्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रयत्न केला. पुष्प प्रकाशन लि. या संस्थेमार्फत त्यांनी ८५०पेक्षा अधिक पुस्तके प्रसिद्ध केली. [[वाशिंग्टन सॉफ्टवेयर लि.]] या कंपनीमार्फत त्यांनी  स्वतःचे स्वामित्व हक्क असणारी २८ उत्पादने जागतिक बाजारपेठेत आणली. वाद आणि कज्जे यामुळे स्वतः उभारलेले साम्राज्य २००४-५ या काळात डोळ्यादेखत गडगडताना त्यांना पहावे लागले. {{संदर्भ हवा}} 

==साहित्य प्रवास== 

सोनवणींनी ११  वर्षांचे असताना "फितुरी" हे नाटक लिहिले.  वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी लिहिलेली पहिली बालकादंबरी (नरभक्षकांच्या बेटावर) मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केली. त्यांच्या असंख्य कथा तत्कालीन महत्त्वाच्या मासिकांतूनही प्रसिद्ध होत राहिल्या. राज्य शासनाच्या अनुदानाने त्यांचा पहिला कवितासंग्रह "प्रवासी" प्रसिद्ध झाला. सव्यसाची, मृत्युरेखा, रक्त हिटलरचे, बीजिंगच्या वाटेवर, क्लिओपात्रा इ.  अनेक कादंबऱ्या गाजल्या.  इंग्रजीतही अनुवादित झाल्या.  कल्की, शून्य महाभारत, कुशाण, ओडीसी आणि यशोवर्मन या त्यांच्या तत्त्वचिंतनात्मक कादंबऱ्यां आहेत. कुशाणचा अनुवाद इंग्रजीत "Last of the wanderers" या नावाने आणि यशोवर्मनचा "The Jungle" या नावाने प्रसिद्ध झाला. त्यांची  राणी शीबाला केंद्रीभूत धरून लिहीलेली "The Awakening"  ही  इंग्रजी कादंबरी प्रसिद्ध आहे.  या कादंबरीचा मराठी अनुवादही आहे. त्यांच्या "पर्जन्य सूक्त" या काव्याचा इंग्रजीत अनुवाद झाला आणि त्यातील निवडक ८ कवितांना संगीतबद्ध करून त्याची ध्वनीफीतही प्रसिद्ध झाली. त्यांची "असुरवेद" ही अलीकडेच प्रसिद्ध झालेली सांस्कृतिक थरारकथा आहे. परंतु त्यांचे अलीकडील सर्वात महत्त्वाचे साहित्यिक कार्य म्हणजे त्यांची "...आणि पानिपत" ही कादंबरी. जनसामान्यांच्या दृष्टिकोनातून १६८० ते १७६१ हा काळ चितारलेली ही कादंबरी मराठीतील पहिली subaltern कादंबरी आहे. त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. त्यातील काहींचे प्रयोगही झाले. 

==सन्शोधन== 
त्यांनी विश्वनिर्मितीबाबतचा स्वतंत्र भारतीय सिद्धान्त मांडला.  तो "अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती" या शीर्षकाने प्रसिद्ध झाला. त्यांनी धर्मेतिहासावर "हिंदू धर्माचे शैव रहस्य" आणि "विठ्ठलाचा नवा शोध" हे ग्रंथ सिद्ध केले. अलीकडेच त्यांचा "महार कोण होते?" हा महार समाजाचा पुरातन इतिहास उलगडून दाखवणारा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.

==वाद-विवाद==
संजय सोनवणी आणि [[अनिता पाटील]] यांचे ब्लॉगवरून वैचारिक भांडण झाले. [[अनिता पाटील]] यांच्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या [[साने गुरुजी]], [[पु. ल. देशपांडे]] [[कुसुमाग्रज]] आदि नामवंत मराठी साहित्यिकांच्या समीक्षा लेखांवर सोनवणी यांनी टीका करणारे लेख स्वतःच्या ब्लॉगवर लिहिले. त्याला [[अनिता पाटील]] यांनी उत्तर दिले. अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरील एक लेखक रवींद्र तहकिक यांनीही सोनवणी यांच्या लेखावर उत्तर दिले. सोनवणी आणि [[अनिता पाटील]] हे दोन्ही ब्लॉगर पुरोगामी विचारांचे असले, तरी त्यांच्यात खूप वैचारिक मतभेद आहेत. 

==पुरस्कार==
पुरस्कारांसाठी लेखकाने पुस्तके पाठवणे हा लेखकाचा अपमान आहे असे त्यांचे ठाम मत असल्याने त्यांनी स्वतःवर आणि त्यांच्या प्रकाशकांवर "पुरस्कारांसाठी पुस्तके पाठवायची नाहीत." असे बंधन घातल्यामुळे त्यांना एकही साहित्य पुरस्कार मिळालेला नाही. औद्योगिक विश्वातील कामगिरीमुळे मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय व्यवसाय उत्कृष्टता ते इंदिरारत्न असे जवळपास ८ पुरस्कार मिळालेले आहेत. 

==प्रकाशित साहित्य==

===थरार-कादंबऱ्या===
* अंतिम युद्ध (२ आवृत्त्या)
* अपहरण (४ आवृत्त्या)
* पराभव (३ आवृत्त्या)
* ब्लडी आयलंड
* महाद्वार (२ आवृत्त्या)
* मृत्युरेखा (५ आवृत्त्या)
* रक्तराग (२ आवृत्त्या)
* वॉरटाइम (२ आवृत्त्या)
* विश्वनाथ (२ आवृत्त्या)
* शिल्पी (२ आवृत्त्या)

===सांस्कृतिक थरार===

* असुरवेद (२ आवृत्त्या)

===वैद्यकीय कादंबऱ्या=== 

* थेंब...थेंब मृत्यू...(३ आवृत्त्या)

===राजकीय थरार===

* डेथ ऑफ द प्राइममिनिस्टर (४ आवृत्त्या)
* बीजिंग कॉन्स्पिरसी (२ आवृत्त्या)
* ब्लॅकमेल,  
* रक्त हिटलरचे, (३ आवृत्त्या)

===राजकीय उपहास===

* आभाळात गेलेली मानसं (३ आवृत्त्या)
* गुड्बाय प्राइममिनिस्टर 

===ऐतिहासिक कादंबऱ्या===

* अखेरचा सम्राट (२ आवृत्त्या)
*...आणि पानिपत
* कुशाण (२ आवृत्त्या)
* क्लिओपात्रा (७ आवृत्त्या
* महाराजा [[यशवंतराव होळकर]]

===तत्त्वज्ञानात्मक कादंबऱ्या===

* कल्की (३ आवृत्त्या)
* यशोवर्मन (४ आवृत्त्या)
* शून्य महाभारत (२ आवृत्त्या)

===सामाजिक कादंबऱ्या=== 

*अखेरचे वादळ (३ आवृत्त्या)
* काळोख (२ आवृत्त्या)
* खळबळत्या सागरकाठी (२ आवृत्त्या)
* खिन्न रात्र (३ आवृत्त्या)
* विकल्प (३ आवृत्त्या)
* सव्यसाची (२ आवृत्त्या) 

===पौराणिक कादंबऱ्या===
* अश्वत्थामा (६ आवृत्त्या)
* ओडीसी (३ आवृत्त्या)

===वैज्ञानिक संशोधन===
* अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती

===तत्त्वज्ञान===
* नीतिशास्त्र  
*ब्रह्मसूत्ररहस्य

===इतिहास संशोधन===
* हिंदू धर्माचे शैव रहस्य
* विठ्ठलाचा नवा शोध
* महार कोण होते? उद्गम:संक्रमण:झेप
* भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते: महाराजा यशवंतराव होळकर

===सामाजिक/वैचारिक===

*कॉर्पोरेट व्हिलेज: एक गांव:एक कंपनी:एक व्यवस्थापन,
* दहशतवादाची रूपे
* प्रेम कसे करावे?
* ब्राह्मण का झोडपले जातात?
* भारतीय ब्राह्मणांचे भवितव्य
* ब्राह्मण पूर्वी कोण होते?
* मुंबई २६/११...पूर्वी आणि नंतर
* सद्दाम हुसेन: एक झंझावात

===काव्य संग्रह=== 
* पर्जन्यसूक्त
* प्रवासी
* संतप्त सूर्य

===नाटक===

* गड्या तू माणूसच अजब आहेस
*त्या गावाचं काय झालं?
* मीच मांडीन खेळ माझा
* रात्र अशी अंधारी
* राम नाम सत्य है
* विक्रमादित्य
 

===बाल/किशोर साहित्य===

* अंतराळात राजू माकड
* दुष्ट जोनाथनचे रहस्य
* रत्नजडित खंजिराचे रहस्य
* रानदेवीचा शाप
* रे बगळ्यांनो
* साहसी विशाल
* सैतान वज्रमुख
* सोन्याचा पर्वत
===इंग्रजी===
* The Awakening
* Dancing with the Rains
* Death of the prime minister
* Heart of the Matter (Full length play)
* On the brink of Death
* The Jungle
* Last of the wanderers
* The mattalions
* Monsoon Sonata (Poetry)
* Raging Souls



===चित्रपट===
* अखेरचे वादळ (निर्माणाधीन)
* अमानुष: एक थरार


===संगीत===
* इट्स माय ड्रीम (संगीत-गीत)
* ओ जानेजां (गीत-संगीत. गायक- नितीन मुकेश)
* मनात माझ्या (गीत-संगीत-गायन)



===संकीर्ण===
* किर्लोस्कर ते अन्य अनेक मासिकांत शंभरेक वैचारिक लेख.

==बाह्य दुवे==
*[http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_08.html संजय सोनवणी यांनी अनिता पाटील यांना दिलेले उत्तर]
*[http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_9158.html पु. ल. देशपांडे यांच्यावरील टीकेला सोनवणी यांचे उत्तर]

[[वर्ग : मराठी ब्लॉगर]]