Difference between revisions 1073600 and 1073602 on mrwiki

{{माहितीचौकट साहित्यिक

| नाव = '''{{लेखनाव}}'''
| चित्र = 
| चित्र_शीर्षक = 
| पूर्ण_नाव = अनिता पाटील
| टोपण_नाव = अ‍ॅनी पाटील
| जन्म_दिनांक = [[जून २०]], [[इ.स. १९८३]]
(contracted; show full)इंद्र|इंद्राचा]] पराभव, बंद केलेली इंद्रपूजा या पौराणिक कथांची नव्याने अर्थमांडणी केली. अस्पृश्य कोण, या विषयी भगवान  [[गौतम बुद्ध]] यांनी केलेल्या उपदेशावर त्यांनी लेख लिहिले आहेत. अनिता पाटील यांनी या लेखमालांतून भारतीय धर्माचा काहीसा इतिहासच ब्लॉगवर मांडला. [[अनिता पाटील]] यांनी धर्माची सुव्यवस्थित चिकित्सा केलेली दिसते. हिन्दू धर्म, वेदवाङ्मय, वारकरी धर्म यावर विपूल लेखन केले आहे. धार्मिक नायकांपैकी भगवान श्रीकृष्ण, भगवान परशुराम यांच्या विषयी त्यांनी संशोधनात्मक लेखन केले आहे.

==  साहित्य समीक्षा ==

अनिता पाटील यांनी [[साने गुरुजी]] यांच्या [[श्यामची आई]] या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाची नव्या अंगाने समीक्षा केली. देवाला सारी प्रिय या प्रकरणात श्यामची आई अस्पृश्यता पाळते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे मराठी साहित्य विश्वात नवे वादळ उठले. या विषयावर मराठी ब्लॉग विश्वातही मोठी चर्चा झाली. अनिता पाटील यांनी [[वि. वा. शिरवाडकर]] यांच्या नटसम्राट या नाटकाची चिकित्सा केली. हे नाटक शेक्सपिअरच्या [[किंग लिअर]] या नाटकावर बेतलेले आहे, हे त्यांनी दाखवून दिले. किंग लिअर या नाटकातील संवाद शिरवाडकरांनी जसेच्या तसे भाषांतरित करून वापरले, हेही त्यांनी पुराव्यासह सिद्ध केले. या लेखावरूनही मराठी साहित्य विश्वात वादळी चर्चा झाली. प्रख्यात मराठी साहित्यिक  [[रा.रं. बोराडे]] यांच्या लेखनावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. [[संजय सोनवणी]] आणि अनिता पाटील यांचे ब्लॉगवरून वैचारिक भांडण झाले. अनिता पाटील यांच्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या साने गुरुजी, [[पु. ल. देशपांडे]], [[कुसुमाग्रज]] आदि नामवंत मराठी साहित्यिकांच्या समीक्षा लेखांवर सोनवणी यांनी टीका करणारे लेख स्वत:च्या ब्लॉगवर लिहिले. त्याला अनिता पाटील यांनी उत्तर दिले. अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरील एक लेखक रवींद्र तहकिक यांनीही सोनवणी यांच्या लेखावर उत्तर दिले. सोनवणी आणि अनिता पाटील हे दोन्ही ब्लॉगर पुरोगामी विचारांचे असले, तरी त्यांच्यात खूप वैचारिक मतभेद आहेत. [[अनिता पाटील]] यांनी मराठीतील मान्यताप्राप्त लेखक आणि प्रतिष्ठित साहित्यकृती यांची नव्या दृष्टीकोणातून [[समीक्षा]] केली आहे. अनिता पाटील यांनी [[साने गुरुजी]] यांच्या [[श्यामची आई]] या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाची नव्या अंगाने समीक्षा केली. देवाला सारी प्रिय या प्रकरणात श्यामची आई [[अस्पृश्यता]] पाळते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे मराठी साहित्य विश्वात नवे वादळ उठले. या विषयावर मराठी [[ब्लॉग]] विश्वातही मोठी चर्चा झाली. अनिता पाटील यांनी [[वि. वा. शिरवाडकर]] यांच्या [[नटसम्राट]] या नाटकाची चिकित्सा केली.(contracted; show full)
*[http://anita-patil.blogspot.in/search/label/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6 अनिता पाटील यांचे ब्राह्मण आणि ब्राह्मणवादाविषयीचे विवेचन]



[[वर्ग : मराठी साहित्यिक]]
[[वर्ग : मराठी लेखक]]
[[वर्ग : मराठी ब्लॉगर]]