Difference between revisions 1880878 and 1976307 on mrwiki

{{पानकाढा | कारण = दीर्घकाळ रिकामे पान/अविश्वकोशीय मजकूर}}
{{ विकिकरण}}
शेती आणि पशुपालन घटक: ५  इयता: ३ री विषय: इतिहास 
 संयोजक: लक्ष्मण कुंडलिक वाठोरे  (अध्यापक) 
 विद्या मंदिर मालाईवाडा ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर पिन -४१५१०1.
    
       मातीत बी पेरले की,रोप उगवते ,हे आपल्याला माहीत आहे .
पण अश्मयुगातील माणसाला सुरवातीला हे माहीत नव्हते .
निसर्गात अपोआप उगवलेले धान्य,कंदमुळे,फळे तो खात असे.
       जमिनीवर सांडलेले धान्याचे दाणे मातीत रुजतात.त्यांना 
अंकुर फुटतात .रोपे वाढतात. त्यांना कणसे येतात .हे सारे 
माणसाच्या हळूहळू लक्षात आले. या गोष्टी वर्षाच्या ठरावीक
(contracted; show full)गाव तयार झाले.लोकवस्ती वाढू लागली.गावे मोठी होऊ 
लागली.शेतीमुळे माणसाला राहण्याच्या पद्धतीत खूप बदल 
घडून आला.
उपक्रम:-तुमच्या घरातील कुंडीत किंवा परसबागेत दाणे टाका व खालील 
गोष्टींचे निरीक्षण करा.
अंकुर फुटणे,रोप वाढणे,पाने फुटणे.

[[वर्ग:मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरीत करावयाचे लेख]]