Difference between revisions 5431 and 5432 on mrwikibooks

(श्री निळोबारायाकृत संतश्रेष्ठ जगदगुरु श्री तुकोबारायांची आरती)
प्रपंच रचना सर्व ही भोगूनि त्यागिली ! 
अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली ! 
वैराग्याची निष्ठा प्रगटूनी दाखविली ! 
अहंता ममता दवडूनी निजशांती वरिली !!1!! 
जयजयजी स्वामी सद गुरु तुकया दातारा ! तारक तू सकळांचा जिवलग सोयरा !!धृ!!
हरीभक्तीचा महिमा विशेष वाढविला !
विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडीला ! 
(contracted; show full)2
                सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥1॥ 
                  तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
                  मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥2॥
                  तुका ह्मणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥3॥

3
                सदा माझे डोळे जडो तुझे मू
ताअर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥1॥
                  गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥ 
                  विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥2॥ 
                  तुका ह्मणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥3॥

4
                राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥1॥ 
                  कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥ 
                  मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥2॥ 
                  कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥3॥ 
                  सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा । तुका ह्मणे जीवा धीर नाहीं॥4॥

5
                कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥1॥ 
                  ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥ 
                  कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥2॥ 
                  गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥3॥
                  झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥4॥
                  तुका ह्मणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥5॥

6
                गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥1॥ 
                  बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥ 
                  मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥2॥ 
                  ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥3॥
                  उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥4॥
                  तुका ह्मणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥5॥

॥6॥	

विराण्या - अभंग 25
7
                वाळो जन मज ह्मणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥1॥ 
(contracted; show full)
37 
पावलें पावलें तुझें आम्हा सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥1॥ 
जेथें तेथें तुझींच पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥ 
भेदाभेद मतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशी देऊं ॥2॥ 
तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥3॥ 



38 वंदू चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥1॥ 
अमुप हे गाठी बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥ध्रु.॥
अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तने गोविंदाच्या ॥2॥ 
जन्म मरणाच्या खुंटतील खेपा । होईल सोपा सिद्ध पंथ ॥3॥
गेले पुढें त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं घेत माग आम्ही ॥4॥ 
तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥5॥


[[वर्ग:Transferable to Marathi Wikisource]]