Difference between revisions 5429 and 5431 on mrwikibooks(श्री निळोबारायाकृत संतश्रेष्ठ जगदगुरु श्री तुकोबारायांची आरती) प्रपंच रचना सर्व ही भोगूनि त्यागिली ! अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली ! वैराग्याची निष्ठा प्रगटूनी दाखविली ! अहंता ममता दवडूनी निजशांती वरिली !!1!! जयजयजी स्वामी सद गुरु तुकया दातारा ! तारक तू सकळांचा जिवलग सोयरा !!धृ!! हरीभक्तीचा महिमा विशेष वाढविला ! विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडीला ! जगदोद्धारालागी उपाय सुचविला ! निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला !!2!! जयजयजी स्वामी सद गुरु तुकया दातारा ! तारक तू सकळांचा जिवलग सोयरा !!धृ!! तेरा दिवस वह्या रक्षूनीया उदकी ! कोरड्याची काढूनी दाखविल्या शेखी ! अपार कविता शक्ति मिरवूनी विधी अंकी ! कीर्तनश्रवणे तुमच्या तरिजे जन लोकी !!3!! जयजयजी स्वामी सद गुरु तुकया दातारा ! तारक तू सकळांचा जिवलग सोयरा !!धृ!! बाळवेष घेवूनी श्रीहरी भेटला ! विधीचा जनिता तूचि आठव हा दिधला ! तेणे ब्रह्मानंदे प्रेमा रूढविला ! न तुके म्हणूनी तुका नामे गौरविला !!4!! जयजयजी स्वामी सद गुरु तुकया दातारा ! तारक तू सकळांचा जिवलग सोयरा !!धृ!! प्रयाणकाळी देवें विमान पाठविले ! कलीच्या काळामाजी अद्भूत वर्तले ! मानव देह घेऊनी निजधामा गेले ! निळा म्हणे सकळ संता तोषविले !!5!! जयजयजी स्वामी सद गुरु तुकया दातारा ! तारक तू सकळांचा जिवलग सोयरा !!धृ!! (श्री निळोबारायाकृत) गाथा पारायणाचे प्रारंभी म्हणावयाचे मंगल नमो सदगुरु तुकया ज्ञानदीपा ! नमो सदगुरु सच्चिदानंद रूपा ! नमो सदगुरु भक्तकल्याणमूर्ती ! नमो सदगुरु भास्करा पूर्ण कीर्ति !!1!! मनुष्याकृती राघवे ख्याति केली ! शिळा शिखरे सागरी तारियेली ! तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मप्रकाशी ! जळी रक्षिले निर्जिवा कागदासी !!2!! महाराज हा जन्मला मृत्यूलोकी ! दुजी उपमा नाढळे ईहलोकी !! भवसिंधूसीं बंधिला सेतू जेणें ! अनाथा दीनाकारणे तुकयानें !!3!! तुका भासला मानवी वेषधारी ! परे हा लिलाविग्रही निर्विकारी !! स्वयें श्रीहरी व्यापकु सर्वजीवा ! तुका तोचि तो हा परब्रह्म ठेवा !!4!! जयां पूजिले आदरें पांडुरंगे ! विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे !! तनु मानवी दिव्यरूपीच केली ! न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली !!5!! ⏎ ⏎ मगंलाचरण - अभंग 6 1 समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥1॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥ ब्रह्मादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥2॥ तुका ह्मणे त्याचें कळलें आह्मां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत॥3॥ (contracted; show full) 37 पावलें पावलें तुझें आम्हा सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥1॥ जेथें तेथें तुझींच पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥ भेदाभेद मतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशी देऊं ॥2॥ तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥3॥ [[वर्ग:Transferable to Marathi Wikisource]] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikibooks.org/w/index.php?diff=prev&oldid=5431.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|