Difference between revisions 5428 and 5429 on mrwikibooksमगंलाचरण - अभंग 6 1 समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥1॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥ ब्रह्मादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥2॥ तुका ह्मणे त्याचें कळलें आह्मां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत॥3॥ (contracted; show full)35 अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥1॥ देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ध्रु.॥ आपुल्या वैभवें । शृंगारावें निर्मळ ॥2॥ तुका ह्मणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥3॥ 36 सुखें वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥1॥ आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा ह्मणे भिडा ॥ध्रु.॥ निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥2॥ गेले वारीं तुह्मीं आणिली साकर । सातदी गेली साडेदहा शेर ॥3॥ अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर यतुप पथ्या ॥4॥ दो प्रहरा मज लहरी येती । शुद्ध नाही पढ़ेगाडे सुपती॥5॥ नीज न यें घाली फुलें । जवळी न साहती मुलें॥6॥ अंगी चंदन लाविते भाळी । सदा शूळ माझे कपाळी॥7॥ हाड गळोनी आले मांस । माझें दुख: तुम्हा नेणवे कैसे॥8॥ तुका म्हणे जिता गाढव मेला । मेलियावरी नरका गेला ॥9॥ ⏎ ⏎ 37 पावलें पावलें तुझें आम्हा सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥1॥ ⏎ जेथें तेथें तुझींच पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥ भेदाभेद मतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशी देऊं ॥2॥ तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥3॥ [[वर्ग:Transferable to Marathi Wikisource]] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikibooks.org/w/index.php?diff=prev&oldid=5429.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|