Difference between revisions 1008053 and 1008089 on mrwiki

{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = अ‍ॅन फ्रॅंक
| चित्र = Anne Frank.jpg
| चित्र_रूदी = 200px
| चित्र_शीर्षक = मे, इ.स. १९४२मधील अ‍ॅन फ्रॅंक
| जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रॅंक (Annelies Marie Frank)
| जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}}
| जन्म_स्थान = [[फ्रांकफुर्ट|फ्रांकफुर्ट आम माइन]], [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]]
(contracted; show full)िल्या महायुद्धानंतर जर्मनीत बनलेले प्रजासत्ताक.</ref> [[फ्रांकफुर्ट|फ्रांकफुर्ट आम माइन]] <ref group="टीप">फ्रांकफुर्ट आम माइन ({{lang-de|Frankfurt am Main}}; जर्मन उच्चार: फ्रांकफुर्ट आम माइन ; इंग्लिश भाषेतील रूढ उच्चार: फ्रॅकफर्ट आम माइन)</ref> या शहरात तिचा जन्म झाला. पण ती आयुष्यातील बराचसा काळ [[अ‍ॅम्स्टरडॅम]], [[नेदरलॅंड्स]] येथे राहिली. ती जन्माने जर्मन होती मात्र [[नाझी जर्मनी|नाझी जर्मनीच्या]] काळातील ज्यूद्वेशी<ref group="श">[[ज्यूविरोध|ज्यूद्वेश]] - (
इंग्लिश: {{lang-en|anti-Semitic)}} अ‍ॅन्टि-सेमिटिक) - दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यूधर्मीय लोकांवरील नाझी पुरस्कृत द्वेश व अत्याचार.</ref> [[न्युर्नबर्ग कायदे|न्युर्नबर्ग कायद्यामुळे]] फ्रॅंक परिवाराचे जर्मन राष्ट्रीयत्व काढून टाकले गेले. मरणोत्तर तिची दैनंदिनी प्रकाशित झाल्यानंतर ती जगभरात प्रसिद्ध झाली.

इ.स. १९३३मध्ये [[नाझी पक्ष]]ाने जर्मनीत सत्ताग्रहण केले. याच वर्षी फ्रॅंक कुटुंब जर्मनीतून [[अ‍ॅम्स्टरडॅम]]ला स्थलांतरित झाले. मात्र इ.स. १९४०पर्यंत नाझी जर्मनीने नेदरलॅंड्सवर सत्ता मिळवली. त्यामुळे ते अ‍ॅम्स्टरडॅममध्येच अडकले. जुलै १९४२मध्ये सर्वत्र ज्यूंची छळवणूक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यापासून वाचण्यासाठी फ्रॅंक कुटुंब, अ‍ॅनचे वडील [[ऑटो फ्रॅंक]] यांच्या कार्यालयाच्या इमारतीतील गुप्त खोल्यांमध्ये लपले. तिथे असतांना अ‍ॅनच्या तेराव्या वाढदिवशी तिला एक कोरी वही मिळाली होती, त्यातच तिने १२ जून इ.स. १९४२ ते १ ऑगस्ट १९४४पर्यंतची दैनंदिनी नोंदवली. ते दोन वर्षे तिथेच होते, पण त्यांना विश्वासघाताने पकडण्यात आले व [[नाझी छळछावणी|नाझी छळछावणीत]]<ref group="श">[[छळछावणी]] - इंग्लिश: ({{lang-en|concentration camps(}} - कॉन्सनट्रेशन कॅम्प)</ref> पाठवण्यात आले. अ‍ॅन व तिची मोठी बहीण [[मॅरगॉट फ्रॅंक|मॅरगॉट]] यांना नंतर [[बर्गन-बेल्सन छळछावणी]]त पाठवले गेले व तिथे इ.स. १९४५मधील मार्चमध्ये दोघीही प्रलापक ज्वराने<ref group="श">[[प्रलापक ज्वर]] - ({{lang-en|typhus}} - टायफस)</ref> मरण पावल्या.

(contracted; show full)

मे, इ.स. १९४०मध्ये जर्मनीने नेदरलॅंड्सवर हल्ला केला व नेदरलॅंड्स पादांकृत केले. नवीन सरकारने अनेक भेदभावपूर्ण कायदे लागू करून ज्यूंचे छळ करणे चालू केले. त्यांना नावनोंदणी करणे बंधनकारक केले तसेच ज्यूंचे वांशिक विभक्तीकरण<ref group="श">[[वांशिक विभक्तीकरण]] - 
इंग्लिश: ({{lang-en|Racial segregation}} - (रेशियल सेग्रीगेशन) - वंशानुसार लोकांचे विभाजन करणे.</ref> केले. फ्रॅंक बहिणींची शाळेत प्रगती होत होती, त्यांचे अनेक मित्र-मैत्रिणी बनले होते. मात्र ज्यू मुलांना केवळ ज्यू शाळेतच घातले पाहिजे, या शासनाच्या हुकुमनाम्यामुळे त्यांना त्यांच्या शाळांतून काढून ज्यूधर्मीय लायसियम (शाळा) मध्ये दाखल केले गेले. तिथे अ‍ॅनची [[जॅकलीन व्हान मार्सेन]]सोबत मैत्री झाली. एप्रिल, इ.स. १९४१मध्ये पेक्टाकॉन कंपनी एक ज्यू-कंपनी म्हणून जप्त केली जाऊ नये म्हणून ऑटोने पावले उचलली. त्यांनी त्यांचा पेक्टाकॉनमधील वाटा त्यांचा मित्र [[जोहान्स क्लिमन]] ({{lang-en|Johannes Kleiman}}) याच्या नावावर हलवला आणि संचालकपदाचा राजीनामा दिला. काही काळानंतर कंपनी रद्द करून कंपनीची सर्व मालमत्ता [[जान गाइस]] ({{lang-en|Jan Gies}}) याच्या ''गाइस आणि कंपनी'' मध्ये हलवली. डिसेंबर, इ.स. १९४१मध्ये ऑटो यांनी ऑपेक्टा वाचविण्यासाठीपण हेच केले. यामुळे त्या दोन्ही कंपन्याचे काम चालू राहिले व ऑटो फ्रॅंक यांना थोडेसेच पण परिवार चालविण्यासाठी पुरेसे पैसे मिळत गेले.

== दैनंदिनीत नोंदवलेला काळ ==
=== लपण्याच्या आधी ===
तिच्या तेराव्या वाढदिवशी, दिनांक १२ जून १९४२ रोजी, अ‍ॅनला एक वही भेट मिळाली. ही वही तिनेच तिच्या वडिलांना काही दिवसांआधी एका दुकानाच्या खिडकीत दाखवली होती. ती एक स्वाक्षरी-वही<ref group="श">स्वाक्षरी-वही - इंग्लिश: ({{lang-en|autograph book}} - (ऑटोग्राफ बुक)</ref> होती, पांढऱ्या-लाल कापडात बांधलेली <!-- {{sfn|van der Rol|Verhoeven|1995|p=3}} -->  आणि समोर छोटेसे कुलुप असलेली. अ‍ॅनने ती वही दैनंदिनी म्हणून वापरायचे ठरवले <!-- {{sfn|Lee|2000|p=96}} --> आणि लगेच लिहायलाखाण चालू केले. तिच्या सुरुवातीच्या बऱ्याच नोंदी दैनंदिन जीवनातल्या छोट्या-छोट्या गोष्टींच्या असल्या तरी तिने नेदरलॅंड्समध्ये जर्मनीच्या ताब्यानंतर झालेले काही बदल मांडनोंदवले आहेत. तिच्या २० जून इ.स. १९४२च्या नोंदीत तिने डच ज्यू लोकांवर लादलेल्या बंधनांची यादी केली आहे, तसेच तिची आजी वारल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.<!-- {{sfn|Frank|1995|pp=1–20}} --> तिला मोठे होऊन एक अभिनेत्री बनायचे होते. तिला चित्रपट बघायला खूप आवडायचे, पण ८ जानेवारी इ.स. १९४१ पासून ज्यूंना चित्रपटगृहात प्रवेश निषिद्ध केला गेला होता. <!-- {{sfn|Müller|1999|pp=119–120}} -->

जुलै, इ.स. १९४२मध्ये मरगॉटला ''सेंट्रल ऑफिस फॉर ज्युइश इमिग्रेशन''<ref group="टीप">सेंट्रल ऑफिस फॉर ज्युइश इमिग्रेशन ({{Lang-de|Zentralstelle für jüdische Auswanderung}} - {{lang-en|Central Office for Jewish Emigration}}) दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यू लोकांना नाझी वर्चस्वाखालील प्रदेशातून हाकलून देण्यासाठी व्हिएन्ना, प्राग व अ‍ॅम्स्टरडॅम येथे बनवलेली संस्था.</ref> कडून एक नोटिस आली. ''[[डर्चगॅंगस्लेगर'' छावणी|डर्चगॅंगस्लेगर]] ({{Lang-de|Durchgangslager}})<ref group="टीप">डर्चगॅंगस्लेगर ({{Lang-de|Durchgangslager}} - छळछावणीत पाठविण्याआधी ज्यू लोकांना इथे एकत्र केले जात असे.</ref> छावणीत पाठविण्याआधी नोंदणी करण्यासाठी तिने कार्यालयात हजर व्हावे असे त्या नोटिशीमध्ये म्हटले होते. ऑटो फ्रॅंकने याआधीच कुटुंबाला सांगितलेकल्पना दिली होत की, लवकरच ते ऑप्टेकओपेक्टा कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या छतातील दडलेल्यागुप्त खोल्यांमध्ये लपण्यासाठी जातील. पण मरगॉटला आलेल्या त्या नोटिशीमुळे त्यांनी ठरवले होते त्यापेक्षा कित्येक आठवडे आधीच त्यांना स्थलांतर करावे लागले. <!-- {{sfn|Müller|1999|p=153}} --> ती इमारत अ‍ॅम्स्टरडॅममधील कालव्यालगतच्या ''प्रिन्सेनग्राख्ट'' ({{lang-de|Prinsengracht}}) रस्त्यावर होती. त्यांच्या कार्यालयातील काही विश्वासू कर्मचारी त्यांना यात मदत करणार होते. पण मरगॉटला आलेल्या त्या नोटिशीमुळे त्यांनी ठरवले होते त्यापेक्षा कित्येक आठवडे आधीच त्यांना स्थलांतर करावे लागले. <!-- {{sfn|Müller|1999|p=153}} -->

=== ''अ‍ॅख्टरह्युइस'' मधील आयुष्य ===

[[File:AnneFrankHouse Bookcase.jpg|thumb|alt=A three shelf timber bookcase, filled with books, stands at an angle in front of a doorway to the Secret Annexe|[[अ‍ॅन फ्रॅंक हाउस]]मधील पुनर्बांधणी केलेली अलमारी, या अलमारीने मागील गुप्त घराचे दार झाकले जात होते.]]

६ जुलै, इ.स. १९४२ रोजी, सोमवारी सकाळी,<!-- {{sfn|Müller|1999|p=163}} --> फ्रॅंक कुटुंब त्यांच्या गुप्त घरात राहण्यास गेले. (डच भाषेत ''अ‍ॅख्टरह्युइस'' ({{Lang-de|Achterhuis }}) म्हणजे घराचा मागचा भाग. इंग्रजी भाषांतरात त्याला ''गुप्त विस्तारगृह''<ref group="श">गुप्त विस्तारगृह ({{Lang-en|secret annex}} - सिक्रेट अनेक्स)</ref> असे म्हटले गेले.) त्यांचे राहते घर ते जाणूनबुजून अस्ताव्यस्त अवस्थेत ठेवून गेले. त्यावरून ते घर सोडून पळून गेले असावेत असे शासनाला वाटावे अशी त्यांची योजना होती. ऑटो फ्रॅंकने घरात एक चिठ्ठीपण ठेवली होती. त्यामध्ये ते [[स्वित्झरलॅंड]]ला गेले आहेत असे वाटावे असदर्शविणारा मजकूर मुद्दाम लिहिला होता. नवीन ठिकाणी आवश्यक असलेल्या गुप्ततेमुळे त्यांना त्यांची मांजर ''मूर्तजे'' हिला मागेच ठेवून द्यावे लागले. ज्यू लोकांना सार्वजनिक परिवहन<ref group="श">सार्वजनिक परिवहन ({{Lang-en|public transport}} - पब्लिक ट्रांसपोर्ट)</ref> वापरण्यास बंदी असल्यामुळे ते अनेक किलोमीटर पायी चालत गेले. सामान घेऊन रस्त्यातून जातांना दिसू नये म्हणून ते  प्रत्येकजणाने अंगावर अनेकपदरी कपडे घालून गेलतले होते.<!-- {{sfn|Lee|2000|pp=105–106}} --> त्यांचे ''अ‍ॅख्टरह्युइस'' ही एक तीन मजली इमारत होती. ओपेक्टाच्या वरच्या बाजूने त्याचे प्रवेशद्वार होते. त्यात पहिल्या मजल्यावर दोन छोट्या खोल्या व त्याला लागून एक शौचालय व प्रसाधगृह होते. त्यावरच्या मजल्यावर एक मोठी खोली व एक छोटी खोली होती. छोट्या खोलीतून वर माळ्यावर<ref group="श">माळा ({{Lang-en|attic}} -अ‍ॅटिक)</ref> जाणारी एक शिडी होती. ''अ‍ॅख्टरह्युइस''चे प्रवेशद्वार एका पुस्तकांच्या अलमारीने झाकून ठेवले होते. ओपेक्टाची मुख्य इमारत जूनी, साधी व नजरेत न भरणारी होती. अ‍ॅम्स्टरडॅमच्या पश्चिम भागात वेस्टरकर्कजवळ ही इमारत होती.<!-- {{sfn|Westra et al.|2004|pp=45, 107–187}} -->

ओपेक्टाच्या कर्मचाऱ्यांमध्ये केवळ [[व्हिक्टर कुल्गग्लर]] ({{lang-en|Victor Kugler}}), [[जोहान्स क्लिमन]] ({{lang-en|Johannes Kleiman}}), [[मिइप गेइस]] ({{lang-en|Miep Gies}}) आणि [[बेप वोस्कुइ]] ({{lang-en|Bep Voskuijl}}) यांना कुटुंबाच्या लपण्याबद्दल माहित होते. ते चार जण, गेइसचा नवरा [[जान गेइस]] आणि वोस्कुइचे वडील जोहान्स हे फ्रॅंक कुटुंबाचे मदतनीस होते. त्यांच्याकडून फ्रॅंक कुटुंबाला बाहेरच्या जगाबद्दल, युद्धाबद्दल आणि राजकीय परिस्थितीबद्दल माहिती मिळत होती. त्यांनी परिवाराच्या सर्व गरजा पुरवल्या, त्यांच्या सुरक्षेची हमी घेतली आणि त्यांना अन्न पुरवले. हे काम दिवसेंदिवस अवघड होत गेले. अ‍ॅनने आपल्या दैनंदिनीमध्ये त्यांच्या निष्ठेचा आणि कठीणसमयी परिवाराचे मनोधैर्य वाढविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा उल्लेख केला आहे. त्या सर्व मदतनीसांना पुरेपूर माहित होते की, जर पकडले गेले तर ज्यूंना ठेऊन घेतल्याबद्दल त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकत होती.<!--{{sfn|Lee|2000|pp=113–115}}-->

[[File:AnneFrankHouseAmsterdamtheNetherlands.jpg|thumb|left|alt=A photograph taken from the opposite side of the canal shows two four story buildings which housed the Opekta offices and behind them, the Secret Annexe|''प्रिन्सेनग्राख्ट'' रस्त्यावरील ते घर (डावीकडील)]]

१३ जुलै, इ.स. १९४२ रोजी [[हर्मन व्हान पेल्स|हर्मन]] ({{lang-en|Hermann van Pels}}), त्याची पत्नी ऑगस्टे ({{lang-en|Auguste}}) आणि त्यांचा १६ वर्षांचा मुलगा [[पीटर व्हान पेल्स|पीटर]] ({{lang-en|Peter van Pels}}) हे कुटुंबसुद्धा तिथे लपण्यासाठी आले आणि नोव्हेंबरमध्ये त्यांचा मित्र व दातांचा डॉक्टर [[फ्रिट्झ फेफर]] ({{lang-en|Fritz Pfeffer}}) त्याच्या कुटुंबासोबत तिथे आला. सुरुवातीला बोलण्यासाठी अनेकजण आले म्हणून अ‍ॅनला आनंद झाला होता, पण इतक्या कमी जागेत इतकेजण एकत्र राहत असल्याने त्यांच्यात तणाव निर्माण होऊ लागले. फेफरसोबत खोली विभागणे अ‍ॅनला दुःसह वाटू लागले. <!-- {{sfn|Lee|2000|pp=120–21}} --> तिची ऑगस्टे व्हान पेल्ससोबतपण भांडणे होऊ लागली. दैनंदिनीत तिने लिहिले आहे की, ऑगस्टे मूर्ख आहे व हर्मन व्हान पेल्स आणि फ्रिट्झ फेफर स्वार्थी आहेत कारण ते खूप अन्न संपवतात.<!-- {{sfn|Lee|2000|p=117}} --> सुरुवातीला तिला पीटर लाजाळू व अडनिड वाटला पण नंतर त्यांची मैत्री झाली. ते एकमेकांच्या प्रेमातही पडले व पौगंडावस्थेतील अ‍ॅनने तिचे पहिले चुंबन पीटरकसोबत अनुभवले. पण हे खरे प्रेम आहे का छोट्या जागेत एकत्र राहण्याचा परिणाम आहे असा प्रश्न तिला भेडसाऊ लागला. त्यामुळे त्यांच्यातील प्रेम हळुहळू कमी होऊ लागले. <!-- {{sfn|Westra et al.|2004|p=191}} --> घरी येणाऱ्या प्रत्येक मदतनीसासोबत मात्र अ‍ॅनची घट्ट मैत्री होती. ऑटो फ्रॅंक आठवण काढतांना लिहितात की अ‍ॅन रोज त्यांच्या येण्याची अतुरतेने वाट पाहत असे. अ‍ॅनची सर्वात घट्ट मैत्री ओपेक्टातील तरूण लेखनिक मुलगी बेप वॉस्कुइसोबत होती. ते अनेकदा कोपऱ्यात उभे राहून एकमेकांच्या कानात काहितरी कुजबुजत असत, असे ऑटोच्या पाहण्यात आले होते. <!-- {{sfn|Lee|2000|p=119}} -->

तिच्या दैनंदिनीत तिने तिच्या कुटुंबातील इतरांच्या भिन्न व्यक्तिमत्त्वांबद्दल आणि तिच्या त्यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल लिहिले आहे. तिच्या मते, भावनिकडृष्ट्या ती वडिलांच्या जास्त जवळ होती. ऑटो फ्रॅंक नंतर लिहितात, "मरगॉटपेक्षा अ‍ॅनसोबत त्यांचे संबंध सुधारत गेले. मरगॉट आईच्या जास्त जवळ होती. याचे कारण कदाचित त्यांच्या स्वभावात होते. मरगॉट क्वचितच आपल्या भावन(contracted; show full)इ.स. १९४२ च्या दैनंदिनीतील नोंदीमध्ये अ‍ॅनने आईच्या निष्काळजीपणावर, उपरोधिकपणावर आणि पाषाण-हृदयी स्वभावावर राग व्यक्त केला आहे. त्यातच ती पुढे लिहिते की, "ती माझी आईच नाही आहे".<!-- {{sfn|Frank|1995|p=63}}--> अ‍ॅन आपली दैनंदिनी परत वाचून संपादित करत असे. नंतर हे वाचतांना तिलाच तिची लाज वाटली. ती स्वत:लाच उद्देशून लिहिले आहे की, "अ‍ॅन, हा द्वेश व्यक्त करणारी तूच आहेस का? ओह अ‍ॅन, तू हे कसे करू शकतेस?" <!-- {{sfn|Frank|1995|p=157}} --> नंतर तिला जाणवले की, गैरसमजांमुळे हे घडले
 आहे आणि यात तिच्या आईसोबत तिही दोशी आहे व यामुळे तिच्या आईचा त्रास अधिकच वाढत आहे. या जाणिवेनंतर ती आईसोबत सहनशीलतेने व आदराने वागू लागली.<!-- {{sfn|Müller|1999|p=204}} -->

फ्रॅंक बहिणींना आशा होती की, शक्य झाले तर ते लवकरात लवकर शाळेत परततील, म्हणून लपून राहतांनापण त्यांचा अभ्यास चालू होता. मरगॉटने बेप वॉस्कुइच्या नावावर पत्राद्वारा <ref group="श">पत्रद्वारा अभ्यासक्रम ({{Lang-en|correspondence course}} -करस्पॉंडन्स कोर्स)</ref> लघुलिपीचा<ref group="श">लघुलिपी ({{Lang-en|shorthand}} - शॉर्टहॅंड)</ref> अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यात तिला चांगले गुणही मिळाले. अ‍ॅनही बराच वेळ वाचन आणि अभ्यासात घालत असे. तिला मोठे होऊन पत्रकार व्हायचे होते. ती तिची दैनंदिनी परतपरत वाचून त्याचे संपादन करत असे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेतांनाच ती तिच्या भावना, श्रद्धा, महत्वाकांक्षा (contracted; show full)[[tl:Anne Frank]]
[[tr:Anne Frank]]
[[uk:Анна Франк]]
[[vec:Ana Frank]]
[[vi:Anne Frank]]
[[wa:Anne Frank]]
[[war:Anne Frank]]
[[zh:安妮·弗蘭克]]