Difference between revisions 1008089 and 1008095 on mrwiki{{माहितीचौकट साहित्यिक | नाव = अॅन फ्रॅंक | चित्र = Anne Frank.jpg | चित्र_रूदी = 200px | चित्र_शीर्षक = मे, इ.स. १९४२मधील अॅन फ्रॅंक | जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रॅंक (Annelies Marie Frank) | जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}} | जन्म_स्थान = [[फ्रांकफुर्ट|फ्रांकफुर्ट आम माइन]], [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]] (contracted; show full) अॅन फ्रॅंकचा जन्म १२ जून इ.स.१९२९ रोजी [[फ्रॅंकफर्ट]], जर्मनी येथे झाला. ती [[ऑटो फ्रॅंक]]({{lang-en|Otto Frank}}; इ.स. १८८९ - इ.स. १९८०) व [[एडिथ फ्रॅंक|एडिथ फ्रॅंक-हॉलंडर]] ({{lang-en|Edith Frank-Holländer}}; इ.स. १९०० - इ.स. १९४५) यांची धाकटी मुलगी होती. तिच्या मोठ्या बहिणीचे नाव [[मर गॉट्गो फ्रॅंक]] ({{lang-en|Margot Frank}}; इ.स. १९२६ - इ.स. १९४५) होते. फ्रॅंक कुटुंब पुरोगामी विचारसरणीचे होते, ते ज्यूधर्माचे सर्व सण व रिवाज मानत नसत. ते राहत असलेल्या फ्रॅंकफर्टच्या भागात अनेक ज्यूधर्मीय व इतर धर्माचे लोक एकत्र राहत. एडिथ जास्त श्रद्धाळू पालक होती तर ऑटो यांना विद्वत्प्रचूर<ref group="श">विद्वत्प्रचूर - ({{lang-en|scholarly}} - स्कॉलरली</ref> गोष्टींमध्ये जास्त रस होता. त्यांच्याजवळ अनेक विषयांवरील पुस्तकांचा संग्रह होता. दोन्ही पालकांनी मुलींना लेखन-वाचन करण्यास प्रोत्साहन दिले. १३ मार्च इ.स. १९३३ मध्ये फ्रॅंकफर्ट नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्या [[ॲडॉल्फ हिटलर]]च्या [[नाझी पक्ष|नाझी पक्षाचा]] विजय झाला. ज्यूविरोधी मोर्चे लगेचच चालू झाले. या वातावरणात आपण जर्मनीतच राहिलो तर आपले काय होईल याची भिती फ्रॅंक कुटुंबाला वाटू लागली. नंतर त्याच वर्षी एडिथ मुलींना घेऊन एडिथची आई रोझा हॉलंडर हिच्याकडे [[आखेन]] येथे राहण्यास गेली. ऑटो फ्रॅंक फ्रॅंकफर्टमध्येच राहिले. नंतर त्यांना अॅम्स्टरडॅममध्ये आपली कंपनी काढण्याचा एक प्रस्त्वाव मिळाला. त्यामुळे व्यवसायाची घडी नीट बसविण्यासाठी व कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी ते अॅम्स्टरडॅमला गेले. इ.स. १९३३ ते इ.स. १९३९च्या काळात सुमारे ३ लाख लोक जर्मनी सोडून निघून गेले. ऑटो फ्रॅंक यांनी ''ओपेक्टा वर्क्स'' कंपनीत काम सुरू केले. त्यांची कंपनी पेक्टिन नावाचा फळांचा अर्क विकत असे. त्यांनी अॅम्स्टरडॅममधील ''मेरवेडेप्लेइन'' (({{lang-en|Merwedeplein}} - मेरवेडे चौक) येथे घर घेतले. इ.स. १९३४ च्या फेब्रुवारी महिन्यात मुली व एडिथ अॅम्स्टरडॅमला आले. त्यांनी मरगॉट्गोला सार्वजनिक शाळेत दाखल केले आणि अॅनला मॉंटेसरी शाळेत घातले. मरगॉट्गोला गणितात रस होता तर अॅनला लेखन आणि वाचनात. त्या काळातील अॅनची मैत्रीण [[हन्नेली गोस्लर]] अॅनबद्दल सांगते की, अॅन नेहमी काहीतरी लिहित असे मात्र ते हाताने लपवून ठेवत असे व त्याबद्दल बोलत नसे. त्या दोघी बहिणी एकमेकांपासून खूप वेगळ्या होत्या. मरगॉट्गो सुसंकृत, अबोल आणि अभ्यासू होती तर अॅन स्पष्टवक्ती, उत्साही आणि बहिर्मुख होती. इ.स. १९३८ मध्ये फ्रॅंकने ''पेक्टाकॉन'' नावाची दुसरी कंपनी सुरू केली. ही कंपनी औषधी वनस्पती, पिकलिंग साल्ट{{मराठी शब्द सुचवा}} आणि मसाल्याच्या पदार्थांची घाउक विक्री करत असे. मसाल्याच्या पदार्थांचा जाणकार म्हणून ऑटोने [[हर्मन व्हान पेल्स]] याला कंपनीत नौकरी दिली होती. तोसुद्धा जन्माने ज्यू होता व जर्मनीतील [[ओस्नाब्रुक]] येथून आपल्या कुटुंबासोबत पळून आला होता. इ.स. १९३९ मध्ये एडिथची आईपण त्यांच्यासोबत राहायला(contracted; show full)्या बऱ्याच नोंदी दैनंदिन जीवनातल्या छोट्या-छोट्या गोष्टींच्या असल्या तरी तिने नेदरलॅंड्समध्ये जर्मनीच्या ताब्यानंतर झालेले काही बदल नोंदवले आहेत. तिच्या २० जून इ.स. १९४२च्या नोंदीत तिने डच ज्यू लोकांवर लादलेल्या बंधनांची यादी केली आहे, तसेच तिची आजी वारल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.<!-- {{sfn|Frank|1995|pp=1–20}} --> तिला चित्रपट बघायला खूप आवडायचे, पण ८ जानेवारी इ.स. १९४१ पासून ज्यूंना चित्रपटगृहात प्रवेश निषिद्ध केला गेला होता. <!-- {{sfn|Müller|1999|pp=119–120}} --> जुलै, इ.स. १९४२मध्ये मर गॉट्गोला ''सेंट्रल ऑफिस फॉर ज्युइश इमिग्रेशन''<ref group="टीप">सेंट्रल ऑफिस फॉर ज्युइश इमिग्रेशन ({{Lang-de|Zentralstelle für jüdische Auswanderung}} - {{lang-en|Central Office for Jewish Emigration}}) दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यू लोकांना नाझी वर्चस्वाखालील प्रदेशातून हाकलून देण्यासाठी व्हिएन्ना, प्राग व अॅम्स्टरडॅम येथे बनवलेली संस्था.</ref> कडून एक नोटिस आली. [[डर्चगॅंगस्लेगर छावणी|डर्चगॅंगस्लेगर]] ({{Lang-de|Durchgangslager}})<ref group="टीप">डर्चगॅंगस्लेगर ({{Lang-de|Durchgangslager}} - छळछावणीत पाठविण्याआधी ज्यू लोकांना इथे एकत्र केले जात असे.</ref> छावणीत पाठविण्याआधी नोंदणी करण्यासाठी तिने कार्यालयात हजर व्हावे असे त्या नोटिशीमध्ये म्हटले होते. ऑटो फ्रॅंकने याआधीच कुटुंबाला कल्पना दिली होती की, लवकरच ते ओपेक्टा कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या छतातील गुप्त खोल्यांमध्ये लपण्यासाठी जातील. पण मरगॉट्गोला आलेल्या त्या नोटिशीमुळे त्यांनी ठरवले होते त्यापेक्षा कित्येक आठवडे आधीच त्यांना स्थलांतर करावे लागले. <!-- {{sfn|Müller|1999|p=153}} --> ती इमारत अॅम्स्टरडॅममधील कालव्यालगतच्या ''प्रिन्सेनग्राख्ट'' ({{lang-de|Prinsengracht}}) रस्त्यावर होती व त्यांच्या कार्यालयातील काही विश्वासू कर्मचारी त्यांना यात मदत करणार होते. === ''अॅख्टरह्युइस'' मधील आयुष्य === (contracted; show full) तिच्या दैनंदिनीत तिने तिच्या कुटुंबातील इतरांच्या भिन्न व्यक्तिमत्त्वांबद्दल आणि तिच्या त्यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल लिहिले आहे. तिच्या मते, भावनिकडृष्ट्या ती वडिलांच्या जास्त जवळ होती. ऑटो फ्रॅंक नंतर लिहितात, "मर गॉट्गोपेक्षा अॅनसोबत त्यांचे संबंध सुधारत गेले. मरगॉट्गो आईच्या जास्त जवळ होती. याचे कारण कदाचित त्यांच्या स्वभावात होते. मरगॉट्गो क्वचितच आपल्या भावना दाखवत असे व तिला जास्त आधाराची गरज नव्हती. याउलट अॅन चंचल होती व तिची मनस्थिती सतत बदलत असे."<!-- {{sfn|Müller|1999||p=203}} --> लपण्यास जाण्याआधीपेक्षा फ्रॅंक बहिणींमध्ये जास्त घट्ट नाते बनले होते. अॅनला कधीकधी मरगॉट्गोबद्दल असूया वाटे. विशेषतः जेव्हा तिचे आई-बाबा ती मरगॉट्गोसारखी शांत व समजुतदार नाही असे तिला म्हणत असत. जसजशी अॅन मोठी होत गेली तसतसे ते एकमेकांच्या अधिक जवळ येत गेले व एकमेकांसोबत मन हलके करत गेले. १२ जानेवारी, इ.स. १९४४च्या दैनंदिनीत अॅनने लिहिले आहे ही, "मरगॉट्गो बरीच चांगली आहे, ती अताशा तितकी धूर्त (मांजरीसारखी) नाही आणि माझी खरी मैत्रिण बनली आहे. ती मला आता लहान बाळ समजत नाही." <!-- {{sfn|Frank|1995|p=167}} --> [[File:Amsterdam Panaroma.jpg|thumb|alt=Taken from the top of the Westerkerk church, this image shows the Prinsengracht canal and the rooftops of the buildings in the neighborhood|वेस्टरकर्कवरून दिसणारे अॅन फ्रॅंक हाउस (चित्रात खालच्या बाजूला, केशरी छताचे आणि फिकट रंगांच्या भिंती असलेले) आणि [[अॅन फ्रॅंक झाड]] (चित्रात खाली-उजवीकडे) (२००४)]] अॅनने अनेकदा तिच्या आईसोबतच्या अवघड नात्याबद्दल आणि तिच्याबद्द्लच्या द्विधाभावाबद्द्ल लिहिले आहे. ७ नोव्हेंबर, इ.स. १९४२ च्या दैनंदिनीतील नोंदीमध्ये अॅनने आईच्या निष्काळजीपणावर, उपरोधिकपणावर आणि पाषाण-हृदयी स्वभावावर राग व्यक्त केला आहे. त्यातच ती पुढे लिहिते की, "ती माझी आईच नाही आहे".<!-- {{sfn|Frank|1995|p=63}}--> अॅन आपली दैनंदिनी परत वाचून संपादित करत असे. नंतर हे वाचतांना तिलाच तिची लाज वाटली. ती स्वत:लाच उद्देशून लिहिले आहे की, "अॅन, हा द्वेश व्यक्त करणारी तूच आहेस का? ओह अॅन, तू हे कसे करू शकतेस?" <!-- {{sfn|Frank|1995|p=157}} --> नंतर तिला जाणवले की, गैरसमजांमुळे हे घडले आहे आणि यात तिच्या आईसोबत तिही दोशी आहे व यामुळे तिच्या आईचा त्रास अधिकच वाढत आहे. या जाणिवेनंतर ती आईसोबत सहनशीलतेने व आदराने वागू लागली.<!-- {{sfn|Müller|1999|p=204}} --> फ्रॅंक बहिणींना आशा होती की, शक्य झाले तर ते लवकरात लवकर शाळेत परततील, म्हणून लपून राहतांनापण त्यांचा अभ्यास चालू होता. मरगॉट्गोने बेप वॉस्कुइलच्या नावावर पत्राद्वारा <ref group="श">पत्रद्वारा अभ्यासक्रम ({{Lang-en|correspondence course}} -करस्पॉंडन्स कोर्स)</ref> लघुलिपीचा<ref group="श">लघुलिपी ({{Lang-en|shorthand}} - शॉर्टहॅंड)</ref> अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यात तिला चांगले गुणही मिळाले. अॅनही बराच वेळ वाचन आणि अभ्यासात घालत असे. तिला मोठे होऊन पत्रकार व्हायचे होते. ती तिची दैनंदिनी परतपरत वाचून त्याचे संपादन करत असे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेतांनाच ती तिच्या भावना, श्रद्धा,(contracted; show full) == छळछावणीत रवानगी व मृत्यू == ३ सप्टेंबर, इ.स. १९४४ रोजी त्यांना वेस्टरबॉर्कवरून [[आउश्वित्झ छळछावणी]]त पाटविण्यात आले. वेस्टरबॉर्कवरून आउश्वित्झला गेलेला तो शेवटचा गट होता. तीन दिवसांच्या प्रवासानंतर ते आउश्वित्झला पोहोचले. त्याच्या रेल्वेत मर गॉट्गो व अॅनची अॅम्स्टरडॅमच्या ज्यूइश लाएसियममधील मैत्रिण [[ब्लोइम एव्हर्स-एम्देन]] हीपण होती. <!--{{sfn|Morine|2007}} --> ब्लोइमला ते अनेकदा आउश्वित्झमध्ये दिसत <!-- {{sfn|Bigsby|2006|p=235}} --> आणि तिच्या एडिथ, मरगॉट्गो व अॅनबद्दलच्या आठवणी इ.स. १९८८मधील माहितीपट "अॅन फ्रॅंकचे शेवटचे सात महिने" ({{lang-en|The Last Seven Months of Anne Frank}} दिग्दर्शक : विली लिंडवर) व इ.स. १९९५मधील बी.बी.सी. माहितीपट "आठवणीतील अॅन फ्रॅंक" ({{lang-en|Anne Frank Remembered}}) यात चित्रित केल्या गेल्या आहेत. <!--{{sfn|Enzer|Solotaroff-Enzer|1999|p=176}} {{sfn|Laeredt|1995}} --> (contracted; show full)ी दिसली, तर इतरांना ती धैर्यशील बनली होती असे वाटले. तिच्या लाघवी व आत्मविश्वासपूर्ण स्वभावामुळे तिला अनेकदा राशनामध्ये तिच्यासाठी व तिच्या आई-बहिणीसाठी जादा ब्रेड मिळत असे. छावणीत अनेक रोग पसरत आणि काही काळातच अॅनच्या त्वचेवर खरूज<ref group="श">खरूज - ({{lang-en|scabies}} - स्केबीज) - पुरळे येणे</ref> उगवले. त्यामुळे फ्रॅंक बहिणींना छावणीतल्या रुग्णालयात टाकण्यात आले. मात्र रुग्णालय नेहमी अंधारे व उंदरांनी भरलेले होते. इकडे एडिथने खाणे बंद केले व तिच्या हिश्श्याचे ब्रेड ती अॅन व मर गॉट्गोला रुग्णालयाच्या भिंतीखालील छिद्रातून देऊ लागली.<!-- {{sfn|Müller|1999|pp=248–251}} --> [[File:Anne frank memorial bergen belsen.jpg|thumb|alt=A Memorial for Margot and Anne Frank shows a Star of David and the full names and birthdates and year of death of each of the sisters, in white lettering on a large black stone. The stone sits alone in a grassy field, and the ground beneath the stone is covered with floral tributes and photographs of Anne Frank|मरगॉट्गो व अॅनचे [[बर्गन-बेलसन छळछावणी]]च्या जागेवरील स्मारक. सोबत अॅनची छायाचित्रे.]] ऑक्टोबर, इ.स. १९४४ मध्ये एडिथ, अॅन व मरगॉट्गोला [[उप्पर सिलेसिआ|उप्पर सिलेसिआतील]] लिबौ अर्बैत्सलेगर({{lang-de|Arbeitslager}}) श्रमछावणीत<ref group="श">श्रमछावणी - ({{lang-en|labor camp}} - लेबर कॅम्प)</ref> पाठविण्यात येणार होते. मात्र अॅनच्या अंगावर खरूज झालेले असल्यामुळे तिचे तिकडे जाणे रद्द केले गेले. एडिथ व मरगॉट्गो यांनीसुद्धा अॅनसोबतच राहणे स्विकारले. ब्लोइम मात्र त्यांच्याशिवाय तिकडे गेली. <!--{{sfn|Laeredt|1995}} --> २८ ऑक्टोबरला [[बर्गन-बेलसन छळछावणी]]त नेण्यासाठी बायकांची निवड चालू केली गेली. आठ हजाराहून अधिक स्त्रियांना तिकडे पाठवले गेले. त्यात अॅन, मरगॉट्गो व ऑगस्टे व्हान पेल्सचा समावेश होता. पण एडिथला मागेच ठेवण्यात आले आणि जानेवारी, इ.स. १९४५मध्ये ती उपासमारीने मरण पावली. <!-- {{sfn|Müller|1999|p=252}} --> तिकडे बर्गन-बेलसन छळछावणीत येणाऱ्या कैद्यांना सामावण्यासाठी तंबू ठोकण्यात आले होते. कैद्यांची गर्दी वाढल्यामुळे तिथे रोगराईने मरण पावणाऱ्यांची संख्या वेगाने वाढू लागली. अॅनची तिथे तिच्या दोन जुन्या मैत्रिणी, [[हनेली गोस्लर]] व [[नानेट ब्लित्झ]] यांच्याशी ओझरती भेट घडली. त्यांना छावणीच्या दुसऱ्या भागात ठेवले होते. त्या दोघीही छावणीतून जिवंत परतल्या. छावणीच्या कुंपणापलिकडून अॅनशी झालेले थोडेसे बोलणे त्यांनी नोंदवून ठेवले आहे. अॅन खूप कृश झाल्याचे व थरथरत असल्याचे ब्लित्झला जाणवले. गोस्लरने नोंदवले आहे की, तेव्हा ऑगस्टे अॅन व मरगॉट्गोसोबत होती आणि गंभीररित्या आजारी असलेल्या मरगॉट्गोची ऑगस्टे काळजी घेत होती. मरगॉट्गो बिछान्याबाहेरही पडू शकत नसल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष दिसली नव्हती. अॅनने त्या दोघींना सांगितले की, तिच्या मते तिचे दोन्ही पालक बहुदा मरण पावले आहेत व त्यामुळे तिला आता जगण्याची इच्छा राहिली नाही आहे. गोस्लरच्या मते इ.स. १९४५च्या जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला ही भेट झाली असावी. <!-- {{sfn|Müller|1999|p=255}} --> मार्च, इ.स. १९४५मध्ये छावणीत प्रलापक ज्वराची साथ पसरली व त्यात सुमारे १७,००० कैद्यांचा मृत्यू झाला. <!-- {{sfn|Müller|1999|p=261}} --> प्रत्यक्षदर्शींच्या मते आजारात मरगॉट्गो तिच्या बिछान्यावरून खाली पडली व त्या धक्काने तिचा मृत्यू झाला. काही दिवसांनंतर अॅनही साथीत मरण पावली. तिच्या मृत्यूची नेमकी तारीख कळू शकली नाही आहे मात्र यानंतर काही अठवड्यातच, १५ एप्रिल, इ.स. १९४५ला ब्रिटिश सेना छावणीपर्यंत पोहोचली व त्यांनी कैद्यांना मुक्त केले.<!--{{sfn|Stichting, "Typhus"|p=5}} --> साथीचा प्रसार रोखण्यासाठी छळछावणीच्या मुक्तीनंतर छावणीला पेटवून देण्यात आले. अॅन व मरगॉट्गोला ज्या सामुहिक कबरींमध्ये<ref group="श">सामुहिक कबर - ({{lang-en|mass grave}} - मास ग्रेव्ह)</ref> पुरण्यात आले होते, ती जागाही अद्याप अज्ञातच राहिली आहे.<!-- {{sfn|US Holocaust Memorial Museum}} --> ऑटो फ्रॅंक आउश्वित्झच्या कैदेतून बचावले. अॅम्स्टरडॅमला परल्यावर जान व मेइप गेइसने त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले. त्यांनी आपल्या परिवाराला हुडकण्याचा प्रयत्न चालू केला. त्यांना कळाले की त्यांची पत्नी, एडिथ, आउश्वित्झमध्येच मरण पावली आहे. पण त्यांना मनोमन वाटत होते की, त्यांच्या मुली वाचल्या असाव्यात. पण काही अठवड्यांनंतर त्यांना कळाले की, अॅन व मरगॉट्गोही बर्गन-बेलसन छावणीत मरण पावल्या आहेत. अॅनच्या मैत्रिणींबद्दल माहिती काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना कळाले की, तिच्या अनेक मैत्रिणींनाही मारून टाकण्यात आले आहे. [[सुझान लेडरमन|सुझान ''सान्ने'' लेडरमन]], जिचा अॅनच्या दैनंदिनीत अनेकदा उल्लेख होता, तिला, तिच्या आई-वडिलांसोबत विषारी वायूच्या कोठडीत मारण्यात आले होते. तिची मोठी बहीण, बार्बरा, जी मरगॉट्गोची जवळची मैत्रीण होती, मात्र यातून वाचली होती. <!-- {{sfn|Lee|2000|pp=211–212}} --> इ.स. १९३०च्या दशकातच जर्मनी सोडून इंग्लंड, स्वित्झरलॅंड व अमेरिकेला गेलेल्या अॅन व मरगॉट्गोच्या काही मैत्रिणी तसेच ऑटो व एडिथची माहेरची लोकं मात्र यातून बचावले. == पारिभाषिक शब्दसूची == {{संदर्भयादी|2|group="श"}} == तळटीपा == {{संदर्भयादी|group="टीप"}} (contracted; show full)[[tl:Anne Frank]] [[tr:Anne Frank]] [[uk:Анна Франк]] [[vec:Ana Frank]] [[vi:Anne Frank]] [[wa:Anne Frank]] [[war:Anne Frank]] [[zh:安妮·弗蘭克]] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1008095.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|