Difference between revisions 1008096 and 1008099 on mrwiki

{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = अ‍ॅन फ्रॅंक
| चित्र = Anne Frank.jpg
| चित्र_रूदी = 200px
| चित्र_शीर्षक = मे, इ.स. १९४२मधील अ‍ॅन फ्रॅंक
| जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रॅंक (Annelies Marie Frank)
| जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}}
| जन्म_स्थान = [[फ्रांकफुर्ट|फ्रांकफुर्ट आम माइन]], [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]]
(contracted; show full) सेग्रीगेशन) - वंशानुसार लोकांचे विभाजन करणे.</ref> केले. फ्रॅंक बहिणींची शाळेत प्रगती होत होती, त्यांचे अनेक मित्र-मैत्रिणी बनले होते. मात्र ज्यू मुलांना केवळ ज्यू शाळेतच घातले पाहिजे, या शासनाच्या हुकुमनाम्यामुळे त्यांना त्यांच्या शाळांतून काढून ज्यूधर्मीय लायसियम (शाळा) मध्ये दाखल केले गेले. तिथे अ‍ॅनची [[जॅकलीन व्हान मार्सेन]]सोबत मैत्री झाली. एप्रिल, इ.स. १९४१मध्ये पेक्टाकॉन कंपनी एक ज्यू-कंपनी म्हणून जप्त केली जाऊ नये म्हणून ऑटोने पावले उचलली. त्यांनी त्यांचा पेक्टाकॉनमधील वाटा त्यांचा मित्र [[
ोहान्स क्लिमन]] ({{lang-en|Johannes Kleiman}}) याच्या नावावर हलवला आणि संचालकपदाचा राजीनामा दिला. काही काळानंतर कंपनी रद्द करून कंपनीची सर्व मालमत्ता [[जान गाइखीस]] ({{lang-en|Jan Gies}}) याच्या ''गाइस आणि कंपनी'' मध्ये हलवली. डिसेंबर, इ.स. १९४१मध्ये ऑटो यांनी ऑपेक्टा वाचविण्यासाठीपण हेच केले. यामुळे त्या दोन्ही कंपन्याचे काम चालू राहिले व ऑटो फ्रॅंक यांना थोडेसेच पण परिवार चालविण्यासाठी पुरेसे पैसे मिळत गेले.

== दैनंदिनीत नोंदवलेला काळ ==
=== लपण्याच्या आधी ===
(contracted; show full)वर एक मोठी खोली व एक छोटी खोली होती. छोट्या खोलीत वर माळ्यावर<ref group="श">माळा ({{Lang-en|attic}} -अ‍ॅटिक)</ref> जाणारी एक शिडी होती. ''अ‍ॅख्टरह्युइस''चे प्रवेशद्वार एका पुस्तकांच्या अलमारीने झाकून ठेवले होते. ओपेक्टाची मुख्य इमारत जूनी, साधी व नजरेत न भरणारी होती. अ‍ॅम्स्टरडॅमच्या पश्चिम भागात वेस्टरकर्कजवळ ही इमारत होती.<!-- {{sfn|Westra et al.|2004|pp=45, 107–187}} -->

ओपेक्टाच्या कर्मचाऱ्यांमध्ये केवळ [[व्हिक्टर कुग्लर]] ({{lang-en|Victor Kugler}}), [[
ोहान्स क्लिमन]], [[मिइप गेइीप खीस]] ({{lang-en|Miep Gies}}) आणि [[बेप वोस्कुइल]] ({{lang-en|Bep Voskuijl}}) यांना कुटुंबाच्या लपण्याबद्दल माहित होते. ते चार जण, गेइसमीपचा नवरा [[जान गेइखीस]] आणि वोस्कुइलचे वडील ोहान्स हे फ्रॅंक कुटुंबाचे मदतनीस होते. त्यांच्याकडून फ्रॅंक कुटुंबाला बाहेरच्या जगाबद्दल, युद्धाबद्दल आणि राजकीय परिस्थितीबद्दल माहिती मिळत होती. त्यांनी परिवाराच्या सर्व गरजा पुरवल्या, त्यांच्या सुरक्षेची हमी घेतली आणि त्यांना अन्न पुरवले. हे काम दिवसेंदिवस अवघड होत गेले. अ‍ॅनने आपल्या दैनंदिनीमध्ये त्यांच्या निष्ठेचा आणि कठीणसमयी परिवाराचे मनोधैर्य वाढविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा उल्लेख केला आहे. त्या सर्व मदतनीसांना पुरेपूर माहित होते की, जर पकडले गेले तर ज्यूंना ठेऊन घेतल्याबद्दल त्यांना मृत्यूदंडा(contracted; show full) बेवारिंग''({{lang-de|Huis van Bewaring}}) या तुरुंगात पाठवले गेले. दोन दिवसांनंतर त्यांना [[वेस्टरबॉर्क संक्रमण छावणी]]त पाठवले गेले. या छावणीतून तेव्हापर्यंत जवळपास १ लाख डच व जर्मन ज्यू लोक इतर छळछावण्यात पाठवले गेले होते. लपून बसल्यामुळे त्यांना गुन्हेगार ठरवले गेले व त्यांना शिक्षेसाठी बनविलेल्या बराकींमध्ये सश्रम कारावासात<ref group="श">सश्रम कारावास ({{lang-en|hard labour}} - हार्ड लेबर)</ref> रहावे लागले. <!-- {{sfn|Müller|1999|p=233}} -->

व्हिक्टर कुल्गर आणि 
ोहान्स क्लिमन यांना अटक केली गेली आणि शासनाचे शत्रू म्हणून [[अ‍ॅमर्सफूर्ट]] येथे कैदेत टाकण्यात आले. क्लिमनला सात अठवड्यांनंतर सोडून दिले गेले मात्र कुल्गर युद्धाच्या शेवटापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सश्रम कारावासात होता.<!-- {{sfn|Müller|1999|p=291}} --> मेइप गेइीप खीस व बेप वोस्कुइजची उलटतपासणी घेण्यात आली व त्यांना धमकावले गेले मात्र त्यांना अटक झाली नाही. दुसऱ्या दिवशी ते ''अ‍ॅख्टरह्युइस''वर परत आले. तिथे त्यांना अ‍ॅनची दैनंदिनी सापडली, तसेच त्यांनी काही छायाचित्रे गोळा केले. अ‍ॅन परत आल्यावर आपण ते तिला परत करू असा निर्धार मेइपने केला. ७ ऑगस्ट, इ.स. १९४४ रोजी ती परत कार्ल सिल्बरबाउरला जाऊन भेटली व त्याला पैसे देऊन कैद्यांना सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्याला नकार दिला. <!--{{sfn|Müller|1999|p=279}} -->

== छळछावणीत रवानगी व मृत्यू ==

(contracted; show full)ब्रिटिश सेना छावणीपर्यंत पोहोचली व त्यांनी कैद्यांना मुक्त केले.<!--{{sfn|Stichting, "Typhus"|p=5}} --> साथीचा प्रसार रोखण्यासाठी छळछावणीच्या मुक्तीनंतर छावणीला पेटवून देण्यात आले. अ‍ॅन व मर्गोला ज्या सामुहिक कबरींमध्ये<ref group="श">सामुहिक कबर - ({{lang-en|mass grave}} - मास ग्रेव्ह)</ref> पुरण्यात आले होते, ती जागाही अद्याप अज्ञातच राहिली आहे.<!-- {{sfn|US Holocaust Memorial Museum}} -->

ऑटो फ्रॅंक आउश्वित्झच्या कैदेतून बचावले. अ‍ॅम्स्टरडॅमला परल्यावर जान व म
ेइप गेइीप खीसने त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले. त्यांनी आपल्या परिवाराला हुडकण्याचा प्रयत्न चालू केला. त्यांना कळाले की त्यांची पत्नी, एडिथ, आउश्वित्झमध्येच मरण पावली आहे. पण त्यांना मनोमन वाटत होते की, त्यांच्या मुली वाचल्या असाव्यात. पण काही अठवड्यांनंतर त्यांना कळाले की, अ‍ॅन व मर्गोही बर्गन-बेलसन छावणीत मरण पावल्या आहेत. अ‍ॅनच्या मैत्रिणींबद्दल माहिती काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना कळाले की, तिच्या अनेक मैत्रिणींनाही मारून टाकण्यात आले आहे. [[सुझान लेडरमन|सुझान ''सान्ने'' लेडरमन]](contracted; show full)[[tl:Anne Frank]]
[[tr:Anne Frank]]
[[uk:Анна Франк]]
[[vec:Ana Frank]]
[[vi:Anne Frank]]
[[wa:Anne Frank]]
[[war:Anne Frank]]
[[zh:安妮·弗蘭克]]