Difference between revisions 1336183 and 1336185 on mrwiki{{साचा:मुखपृष्ठ सदर लेख उमेदवार}}{{माहितीचौकट साहित्यिक | नाव = अॅन फ्रँक | चित्र = Anne Frank.jpg | चित्र_रूदी = 200px | चित्र_शीर्षक = मे, इ.स. १९४२मधील अॅन फ्रँक | जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रँक (Annelies Marie Frank) | जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}} | जन्म_स्थान = [[फ्रांकफुर्ट|फ्रांकफुर्ट आम माइन]], [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]] (contracted; show full) == सुरुवातीचे दिवस == [[File:AnneFrankMerwedeplein.jpg|thumb|alt=A four story, brick apartment block showing the building's facade, with several windows and an internal staircase leading into the block.|इ.स. १९३४ ते इ.स. १९४२ पर्यंत फ्रँक कुटुंब राहत असलेली इमारत.]] अॅन फ्रँकचा जन्म १२ जून , इ.स.१९२९ रोजी [[फ्रँांकफुर्ट]], जर्मनी येथे झाला. ती [[ऑटो फ्रँक]]({{lang-en|Otto Frank}}; इ.स. १८८९ - इ.स. १९८०) व [[ईडिथ फ्रँक|ईडिथ फ्रँक-हॉलंडर]] ({{lang-en|Edith Frank-Holländer}}; इ.स. १९०० - इ.स. १९४५) व [[ईडिथ फ्रँक|ईडिथ फ्रँक-हॉलंडर]] यांची धाकटी मुलगी होती. तिच्या मोठ्या बहिणीचे नाव [[मार्गो फ्रँक]] ({{lang-en|Margot Frank}}; इ.स. १९२६ - इ.स. १९४५) होते. फ्रँक कुटुंब पुरोगामी विचारसरणीचे होते, ते ज्यूधर्माचे सर्व सण व रिवाज मानत नसत. ते राहत असलेल्या फ्रँांकफुर्टच्या भागात अनेक ज्यूधर्मीय वतसेच इतर धर्माचे लोक एकत्र राहत. ईडिथ जास्त श्रद्धाळू पालक होती तर ऑटो यांना विद्वत्प्रचूर<ref group="श">विद्वत्प्रचूर - ({{lang-en|scholarly}} - स्कॉलरली</ref> गोष्टींमध्ये जास्त रस होता. त्यांच्याजवळ अनेक विषयांवरील पुस्तकांचा संग्रह होता. दोन्ही पालकांनी मुलींना लेखन-वाचन करण्यास प्रोत्साहन दिले. [[१३ मार्च ]], [[इ.स. १९३३ मध्ये]] फ्रँांकफुर्ट नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. तंमध्याे [[ॲडॉल्फ हिटलर]]च्या [[नाझी पक्ष|नाझी पक्षाचा]] विजय झाला. त्यानंतर शहरात ज्यूविरोधी मोर्चे लगेचच चालू झाले. या वातावरणात आपण जर्मनीतच राहिलो तर आपले काय होईल याची भिती फ्रँक कुटुंबाला वाटू लागली. नंतर त्याच वर्षी ईडिथ मुलींना घेऊन ईडिथची आई रोझा हॉलंडर हिच्याकडे [[आखेन]] येथे राहण्यास गेली. ऑटो फ्रँक फ्रँांकफुर्टमध्येच राहिले. नंतर त्यांना अॅम्स्टरडॅममध्ये आपली कंपनी काढण्याचा एक प्रस्त्वाव मिळाला. त्यामुळे व्यवसायाची घडी नीट बसविण्यासाठी व कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी ते अॅम्स्टरडॅमला गेले. इ.स. १९३३ ते इ.स. १९३९च्या काळात सुमारे ३ लाख लोक जर्मनी सोडून निघून गेले. ऑटो फ्रँक यांनी ''ओपेक्टा वर्क्स'' कंपनीत काम सुरू केले. त्यांची कंपनी पेक्टिन नावाचा फळांचा अर्क विकत असे. त्यांनी अॅम्स्टरडॅममधील ''मेरवेडेप्लेइन'' (({{lang-en|Merwedeplein}} - मेरवेडे चौक) येथे घर घेतले. [[इ.स. १९३४]] च्या फेब्रुवारी महिन्यात मुली व ईडिथ अॅम्स्टरडॅमला आले. त्यांनी मार्गोला सार्वजनिक शाळेत दाखल केले आणि अॅनला माँटेसरी शाळेत घातले. मार्गोला गणितात रस होता तर अॅनला लेखन आणि वाचनात. त्या काळातील अॅनची मैत्रीण [[हन्नेली गोस्लर]] अॅनबद्दल सांगते की, अॅन नेहमी काहीतरी लिहित असे मात्र ते हाताने लपवून ठेवत असे व त्याबद्दल बोलत नसे. त्या दोघी बहिणी एकमेकांपासून खूप वेगळ्या होत्या. मार्गो सुसंकृत, अबोल आणि अभ्यासू होती तर अॅन स्पष्टवक्ती, उत्साही आणि बहिर्मुख होती. [[इ.स. १९३८]] मध्ये फ्रँकने ''पेक्टाकॉन'' नावाची दुसरी कंपनी सुरू केली. ही कंपनी औषधी वनस्पती, पिकलिंग साल्ट{{मराठी शब्द सुचवा}}खारवण्यासाठीचे मीठ आणि मसाल्याच्या पदार्थांची घाउक विक्री करत असे. मसाल्याच्या पदार्थांचा जाणकार म्हणून ऑटोने [[हर्मन व्हान पेल्स]] याला कंपनीत नौकरी दिली होती. तोसुद्धा जन्माने ज्यू होता व जर्मनीतील [[ओस्नाब्रुक]] येथून आपल्या कुटुंबासोबत पळून आला होता. [[इ.स. १९३९]] मध्ये ईडिथची आईपण त्यांच्यासोबत राहायला आली व जानेवारी, इ.स. १९४२मधील तिच्या मृत्यूपर्यंत ती तिथेच होती. मे, इ.स. १९४०मध्ये जर्मनीने नेदरलँड्सवर हल्ला केला व नेदरलँड्स पादांकृत केले. नवीन सरकारने अनेक भेदभावपूर्ण कायदे लागू करून ज्यूंचे छळ करणे चालू केले. त्यांना नावनोंदणी करणे बंधनकारक केले तसेच ज्यूंचे वांशिक विभक्तीकरण<ref group="श">[[वांशिक विभक्तीकरण]] - ({{lang-en|Racial segregation}} - रेशियल सेग्रीगेशन) - वंशानुसार लोकांचे विभाजन करणे.</ref> केले. फ्रँक बहिणींची शाळेत प्रगती होत होती, त्यांचे अनेक मित्र-मैत्रिणी बनले होते. मात्र ज्यू मुलांना केवळ ज्यू शाळेतच घातले पाहिजे, या शासनाच्या हुकुमनाम्यामुळे त्यांना त्यांच्या शाळांतून काढून ज्यूधर्मीय लायसियम (शाळा) मध्ये दाखल केले गेले. तिथे अॅनची [[जॅकलीन व्हान मार्सेन]]सोबत मैत्री झाली. एप्रिल, [[इ.स. १९४१]]मध्ये पेक्टाकॉन कंपनी एक ज्यू-कंपनी म्हणून जप्त केली जाऊ नये म्हणून ऑटोने पावले उचलली. त्यांनी त्यांचा पेक्टाकॉनमधील वाटा त्यांचा मित्र [[योहान्स क्लिमन]] ({{lang-en|Johannes Kleiman}}) याच्या नावावर हलवे केला आणि संचालकपदाचा राजीनामा दिला. काही काळानंतर कंपनी रद्बंद करून कंपनीची सर्व मालमत्ता [[जान खीस]] ({{lang-en|Jan Gies}}) याच्या ''गाइस आणि कंपनी'' मध्ये हलवला देउन टाकली. डिसेंबर, इ.स. १९४१मध्ये ऑटो यांनी ऑपेक्टा वाचविण्यासाठीपण हेच केले. यामुळे त्या दोन्ही कंपन्याचे काम चालू राहिले व ऑटो फ्रँक यांना थोडेसेच पण परिवार चालविण्यासाठी पुरेसे पैसे मिळत गेले. == दैनंदिनीत नोंदवलेला काळ == === लपण्याच्या आधी === (contracted; show full) {{आख्तरहाएसमधील व्यक्ती}} {{DEFAULTSORT:फ्रँक, अॅन}} [[वर्ग:होलोकॉस्ट]] [[वर्ग:ज्यू व्यक्ती]] [[वर्ग:अॅन फ्रँक|*]] [[वर्ग:इ.स. १९४५ मधील मृत्यू]] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1336185.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|