Difference between revisions 123759 and 126038 on mrwikisource

{{शीर्ष
 | शीर्षक      = निश्चयाचा महामेरु
 | साहित्यिक     = रामदास स्वामी
 | विभाग  =
 | मागील =   = [[शिवराजास आठवावें]]
 | पुढील       =
 | वर्ष       = 
 | टिपण      = 
(contracted; show full)आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कित्येक असती ।धन्य धन्य तुमचीं कीर्ति । विश्वी विस्तारली ॥

कित्येक दुष्ट संहारीले । कित्येकांस धाक सुटले ।
कित्येकांस आश्रयो जाले । शिवकल्याण राजा ॥

तुमचे देशी वास्तव्य केले । परंतू वर्तमान नाही घेतले ।ऋणानुबंधे विस्मरण जाहले । काय नेणो ॥

सर्वज्ञ मंड
ळी धर्ममूर्ति । काय सांगणे तुम्हांप्रती ।
परी धर्मस्थापनेची कीर्ति । सांभाळली पाहीजे ॥

उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागिले ।
प्रसंग नसतां लिहीले । क्षमा केली पाहिजे ॥

</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]
[[वर्ग:रामदास स्वामी यांचे साहित्य]]